Solar Eclipse 2022: दिवाळीत सूर्यग्रहण: ४ ग्रहांचा अद्भूत योग; ‘या’ ४ राशींना अत्यंत शुभ, अपार सुख-समृद्धी पैसा!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 12:08 PM2022-10-19T12:08:30+5:302022-10-19T12:21:01+5:30

Solar Eclipse 2022: सूर्यग्रहण फारसे चांगले मानले जात नसले तरी चार ग्रहांच्या शुभ संयोगामुळे काही राशीच्या व्यक्तींना लाभ मिळू शकेल? जाणून घ्या...

अंध:काराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दीपोत्सव. धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन हे दिवाळीचे मुख्य दिवस. हे दिवस व्यापारी लोकांसाठी विशेष महत्त्वाचा मानले जातात; कारण धनप्राप्तीसाठी लक्ष्मीदेवीचे पूजन केले जाते. मात्र, यंदाच्या दिवाळीला सूर्यग्रहण लागणार आहे. (Solar Eclipse 2022)

यंदाचे दुसरे सूर्यग्रहण ऑक्टोबर महिन्यात लागणार आहे. भारतात दिसणारे हे पहिले सूर्यग्रहण असणार असून, ऐन दिवाळीत हे खंडग्रास पद्धतीने सूर्यग्रहण दिसेल. २५ ऑक्टोबर रोजी हे सूर्यग्रहण आहे. हे सूर्यग्रहण अतिशय महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. ऐन दिवाळीत सूर्यग्रहण असल्याने याचा प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पडेल, असे म्हटले जात आहे.

हे सूर्यग्रहण तूळ राशीत होणार असून, ग्रहणाचा कालावधी ४ तास ३ मिनिटे असणार आहे. या सूर्यग्रहणाचा तूळ राशीच्या व्यक्तींवर अधिक दिसू शकेल. आताच्या घडीला तूळ राशीच्या व्यक्तींवर शनीचा ढिय्या प्रभाव आहे. या सूर्यग्रहणाचा मोक्ष भारतात दिसणार नाही, असे सांगितले जात आहे.

दिवाळीत लागणाऱ्या सूर्यग्रहणावेळी तूळ राशीत चार ग्रहांचा संयोग होणार असून, सूर्याबरोबरच केतू, शुक्र आणि चंद्रही तूळ राशीत असतील. सूर्यग्रहणाची घटना शुभ मानली जात नसली तरी काही राशींसाठी हे सूर्यग्रहण आनंददायी आणि लाभदायक ठरू शकते. नेमक्या कोणत्या राशीच्या व्यक्तींना हे सूर्यग्रहण शुभ ठरू शकेल, ते जाणून घेऊया...

कर्क राशीच्या व्यक्तींना दिवाळीतील सूर्यग्रहण यशकारक ठरू शकेल. रखडलेल्या योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. करिअरच्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते. तुम्हाला नशिबाची साथही मिळू शकेल. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकेल. कौटुंबिक जीवनात चांगले वातावरण राहील. वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत असाल तर तुमच्या कामाला नवी ओळख मिळू शकते. तुम्हाला मित्र किंवा कुटुंबातील सदस्यांकडून सरप्राईज गिफ्ट मिळण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या व्यक्तींना दिवाळीतील सूर्यग्रहण लाभदायक ठरू शकते. ४ ग्रहांच्या शुभ संयोगामुळे धनलाभ होण्याची शक्यता आहे. या काळात अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरदार लोकांच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे. लहान भावंडांच्या माध्यमातून लाभ होऊ शकतो.सरकारी क्षेत्रातूनही लाभ मिळू शकतात.

धनु राशीच्या व्यक्तींना दिवाळीतील सूर्यग्रहण अनुकूल ठरू शकेल. तुम्हाला अनेक स्त्रोतांकडून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या व्यक्तिमत्वातही चांगले बदल होऊ शकतात. स्पर्धात्मक परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्यांना चांगले यश मिळू शकते. तुमच्या उणिवांवर काम करून तुम्ही प्रगतीच्या मार्गावर जाल. जवळच्‍या लोकांना योग्य मार्गाने मार्गदर्शन करू शकता. नवीन लोकांशी मैत्री करू शकता. पूर्वी गुंतवणूक केली होती, त्यातून आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन राशीच्या व्यक्तींना दिवाळीतील सूर्यग्रहण सकारात्मक ठरू शकेल. शत्रूंपासून सावध राहावे लागेल. तुमचे प्रतिस्पर्धी काम बिघडवण्याचा प्रयत्न करू शकतात. योग्य नियोजन करून पुढे गेल्यास ते तुमच्यासाठी चांगले राहील. गूढ विषयांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. तुम्ही संयम ठेवला तर तुमच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होऊ शकतात, असे सांगितले जात आहे.

सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकेल. ग्रहणानंतर लगेचच गहू, गूळ, मसूर, तांबे या गोष्टींचे दान करणे तुमच्यासाठी शुभ ठरू शकेल. याशिवाय आदित्य हृदयस्तोत्राचे पठण करू शकता. यासोबतच गुरुमंत्राचा जप करणेही तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, संबंधित विषयासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.