पंचग्रही योगात मेष संक्रांती: ‘हे’ उपाय नक्की करा, महिनाभर फायदा मिळवा; ७ राशींवर सूर्यकृपा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 15:39 IST2025-04-14T15:21:19+5:302025-04-14T15:39:59+5:30

सूर्याचे मंगळाचे स्वामित्व असलेल्या राशीत होत असलेले गोचर कोणत्या राशींना सर्वोत्तम सर्वोत्कृष्ट फल देणारे ठरू शकेल? कोणत्या राशींनी नेमके कोणते उपाय करणे शुभ लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या...

साधारण प्रत्येक महिन्याला नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य राशीपरिवर्तन करत असतो. सूर्याच्या या राशी संक्रमणाला संक्रांती म्हटले जाते. संपूर्ण वर्षभरात सूर्य प्रत्येक राशीतून भ्रमण करतो. हिंदू नववर्ष सुरू झाले असून, यंदाच्या वर्षातील सूर्याचे प्रथम गोचर मेष राशीत होत आहे. १४ एप्रिल २०२५ रोजी सूर्य मेष राशीत प्रवेश करत आहे.

मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. राशीचक्रातील पहिली मेष रास ही सूर्याची उच्च रास मानली जाते. याचाच अर्थ या राशीत सूर्य सर्वोत्तम फले देऊ शकतो, असे म्हटले जाते. मेष राशीतील सूर्याच्या संक्रमण काळाला मेष संक्रांती म्हटले जाईल. पुढील सुमारे महिनाभर सूर्य मेष राशीत असणार आहे.

सूर्याचा मेष राशीत प्रवेश होताना मीन राशीत पंचग्रही योग जुळून आलेला आहे. सूर्याची मेष संक्रांत काही राशींसाठी उत्तम ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. या आगामी महिन्यात काही उपाय करणे शुभ आणि फलदायी मानले गेले आहे. कोणत्या राशींवर सूर्याची कृपा राहू शकेल? कोणत्या राशींनी काय उपाय करणे लाभदायी ठरू शकेल? जाणून घ्या....

मेष: सूर्याचे हे गोचर भ्रमण याच राशीतून होत आहे. मेष संक्रांतिपासून एक महिन्यापर्यंत खूप उत्साहित असल्याचे दिसून येईल. वडिलांशी मतभेद होऊ शकतात. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. विद्यार्थ्यांना चांगले परिणाम मिळू शकतात. उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य द्यावे, लाभ होईल.

वृषभ: सूर्याचे मेष राशीतील भ्रमण चांगले राहील. उन्नतीचे नवीन मार्ग सापडतील. कोणत्याही प्रकारचे कर्ज घेऊ शकाल. परदेशाशी संबंधित कार्यात यशस्वी व्हाल. विरोधकांवर मात कराल. उपाय:- रोज सूर्याष्टकाचे पठन केल्याने लाभ होईल.

मिथुन: मेष राशीतील सूर्याचे गोचर भ्रमण चांगले राहील. विविध लाभ होतील. सामाजिक प्रतिष्ठा वृद्धिंगत होईल. सरकारी लोकांशी चांगले संबंध राहू शकतील. आत्मविश्वास उंचावेल. कार्यक्षेत्री कामगिरीचे कौतुक होईल. पदोन्नती संभवते. उपाय:- कार्यात यशस्वी होण्यासाठी वडिलधाऱ्यांचे आशीर्वाद अवश्य घ्यावेत.

कर्क: सूर्याचे मेषेतील भ्रमण लाभदायी होईल. उन्नतीचे मार्ग मोकळे होतील. नोकरी व व्यापारात लाभ होईल. जर सरकारी क्षेत्राशी संबंधित कार्य करू इच्छित असाल तर त्यात लाभ होईल. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करणे हितावह ठरेल.

सिंह: सूर्याचे मेषेतील भ्रमण मध्यम फलदायी आहे. नशिबाची साथ मिळेल. असे असले तरी कामावर संपूर्ण लक्ष केंद्रित करूनच कामे करावी लागतील. आत्मविश्वास उंचावेल. धार्मिक यात्रा संभवते. उपाय:- रोज गायत्री मंत्राचा एक माळ जप करणे लाभदायी होईल.

कन्या: सूर्याचे मेषेतील भ्रमण विशेष अनुकूल नसेल. अत्यंत सावध राहावे लागेल. इलेक्ट्रिक वाहन चालवताना सावध राहावे लागेल. आर्थिक गुंतवणूक करावयाची असेल तर ती विचारपूर्वक करावी लागेल. उपाय:- रोज शंकरास जलाभिषेक करावा, लाभ होईल.

तूळ: सूर्याचे मेषेतील भ्रमण विशेष असे लाभदायी नसेल. हा महिना त्रासदायी होऊ शकतो. वैवाहिक जोडीदाराशी मतभेद वाढू शकतात. इतरांच्या विचारांना महत्त्व देण्याचा सल्ला देण्यात येत आहे. उपाय:-सूर्य नमस्कार लाभदायी होईल.

वृश्चिक: सूर्याचे मेषेतील भ्रमण काहीसे अनुकूल राहील. विरोधकांपासून कोणताही धोका नसेल. विरोधक आपल्या बाजूने राहतील. परदेशाशी संबंधित एखादे काम चांगले होऊ शकते. उपाय:-सूर्यास कुंकू मिश्रित पाण्याने अर्घ्य देणे हितावह होईल.

धनु: सूर्याचे मेषेतील भ्रमण काहीसे त्रासदायी होऊ शकते. कार्यात मेहनत करावी लागेल. हा महिना काहीसा त्रासदायी होऊ शकतो. अध्ययनात मेहनत करावी लागेल व त्यामुळे लाभ होईल. उपाय:- गरजवंतास गहू दान केल्यास लाभ होईल.

मकर: सूर्याचे मेषेतील भ्रमण विशेष चांगले नसेल. हे दिवस चिंतायुक्त असू शकतात. वाहनाचा वापर आवश्यकतेपेक्षा जास्त करू नका. जमीन इत्यादींशी संबंधित कार्यात सावध राहावे लागेल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण लाभदायी होईल.

कुंभ: सूर्याचे मेषेतील भ्रमण अनुकूल असेल. आत्मविश्वास उंचावलेला दिसून येईल. कर्म करण्याचा व नशिबाच्या भरवशावर न बसण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कामाच्या ठिकाणी लक्षपूर्वक काम करावे लागेल. त्याचे योग्य फळ मिळेल. उपाय:- शंकरास जलाभिषेक करणे शुभ फलदायी होईल.

मीन: सूर्याचे मेषेतील भ्रमण सामान्य फलदायी होईल. कार्यात सावध राहावे लागेल. कोणत्याही प्रकारची आर्थिक गुंतवणूक करू नये. संपत्तीशी संबंधित विषयात अत्यंत सावध राहावे लागेल. कुटुंबियांशी संवाद साधताना संयमित राहावे लागेल. उपाय:- रोज गायत्री मंत्राचा जप करावा, लाभ होईल.