शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

त्रिग्रही योग: ९ राशींची संक्रांत संपेल, १ महिना फक्त लाभ; रोज १ उपायाने भाग्योदय, मंगल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 10:31 IST

1 / 15
Sun Transit October 2025: नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य प्रत्येक महिन्यात राशी परिवर्तन करत असतो. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे राशी संक्रमण हे संक्रांत म्हणून ओळखले जाते. त्यामुळे पुढील महिन्याभराचा काळ हा तूळ संक्रांत म्हणून ओळखला जाईल.
2 / 15
आताच्या घडीला तूळ राशीत नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध आणि नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह विराजमान आहे. राजा असलेल्या सूर्याच्या प्रवेशाने तूळ राशीत त्रिग्रही योग जुळून येणार आहे. पुढील काही दिवस हा योग कायम राहील.
3 / 15
सूर्याच्या तूळ राशीतील गोचरानंतर बुधादित्य, मंगल आदित्य असे दोन राजयोगही जुळून येत आहेत. सूर्याशी संबंधित काही उपाय महिनाभर करणे अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
4 / 15
मेष: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण मिश्र फलदायी असू शकते. नात्यात समन्वय साधा. वैवाहिक जोडीदाराशी शांतपणे चर्चा करण्याची गरज आहे. गोचराच्या प्रभावामुळे मतभेद वाढू शकतात. आर्थिक स्थिती सामान्य राहील. मान - सन्मान व यश प्राप्ती होऊ शकते. खर्च वाढतील. त्यावर लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास करू शकता. उपाय:-कुंकू मिश्रित पाण्याने सूर्यास अर्घ्य द्यावे.
5 / 15
वृषभ: हे राशी परिवर्तन शुभ फलदायी होऊ शकते. ह्या दरम्यान लाभदायी संधी मिळू शकते. विरोधकांची संख्या कमी होईल. परदेशाशी संबंधित कामात फायदा होऊ शकतो. गोचराच्या ह्या कालखंडात प्रकृती चांगली राहील. एखाद्या जुनाट आजारापासून दिलासा मिळू शकतो. उपाय:-रोज गायत्री चालिसाचे पठण करावे, लाभ होईल.
6 / 15
मिथुन: तूळ राशीतील सूर्याचे भ्रमण सामान्याहून चांगले फलदायी होईल. नोकरीत नवीन संधी मिळेल. ह्या दरम्यान वाहन किंवा घराच्या अंतर्गत सजावटीस लागणाऱ्या वस्तूंची खरेदी करू शकता. मान-सन्मानात वाढ होईल. असे असले तरी क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. अशा वेळी धीर धरावा व विचारपूर्वक निर्णय घ्यावेत. विद्यार्थ्यांसाठी हा कालखंड उत्तम आहे. उच्च शिक्षणात ते यशस्वी होतील. धार्मिक कार्यासाठी एखादा दूरवरचा प्रवास संभवतो. उपाय:-आदित्य हृदय स्तोत्राचे पठण लाभदायी होईल.
7 / 15
कर्क: तूळ राशीतील सूर्याचे हे भ्रमण काहीसे त्रासदायी होऊ शकते. कौटुंबिक कलह होण्याचे संकेत मिळत आहेत. कारकिर्दीत समस्या होऊ शकते. नोकरीत स्थान परिवर्तन होऊ शकते. अचानक धनलाभ होऊ शकतो. त्यामुळे आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. असे असले तरी खर्चांवर नियंत्रण ठेवावे लागेल. जीवन सामान्यच राहील. उपाय:- सूर्याष्टकाचे पठण शुभ फलदायी ठरेल.
8 / 15
सिंह: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण लाभकारी होऊ शकते. कुटुंबीयांचे सहकार्य मिळेल. नशिबाची साथ मिळेल. आत्मविश्वास चांगला असेल. एखादा प्रवास करू शकता. मात्र, त्यात सावध राहावे लागेल. धाडस व पराक्रम वृद्धिंगत होतील. कामगिरी उंचावेल. व्यापारात प्रगती होईल. कारकिर्दीत मात्र थोडा त्रास होऊ शकतो. ऊर्जेचे प्रमाण थोडे कमी होईल. उपाय:-गायत्री मंत्राचा एक माळ जप करणे फलदायी होईल.
9 / 15
कन्या: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण सामान्य फलदायी राहील. कुटुंबियांसह बाहेर फिरावयास जाण्याचा कार्यक्रम आखू शकता. दीर्घ काळापासून स्थगित झालेली कामे पूर्णत्वास जाऊ शकतात. सरकारी लाभ होऊ शकतो. वरिष्ठांची मदत मिळू शकते. असे असले तरी कार्यस्थळी काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. एखाद्या नवीन नोकरीचा शोध घेऊ शकता. खर्चात वाढ होऊ शकते. सध्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. उपाय:-रोज सूर्यास अर्घ्य द्यावे, लाभ होईल.
10 / 15
तूळ: सूर्य आपल्या राशीतून भ्रमण करत आहे. अशा वेळी सावध राहावे. अहंभाव वाढू शकतो. व्यावसायिक भागीदाराशी मतभेद वाढू शकतात. अशा वेळी सावध राहावे लागेल. प्राप्तीत वाढ होऊ शकते. कामानिमित्त प्रवास होऊ शकतात. असे असले तरी ह्या दरम्यान रागाच्या भरात कोणतेही काम करू नये, अन्यथा त्रास होऊ शकतो. उपाय:- गोमातेस गहू व गूळ खाऊ घालणे लाभदायी होईल.
11 / 15
वृश्चिक: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण सामान्याहून चांगले राहील. असे असले तरी भागीदाराशी असलेल्या नात्यात कटुता येऊ शकते. ही कटुता टाळण्यासाठी नात्यात समन्वय राखावा. शत्रू कमकुवत होतील. विरोधकांवर मात कराल. कामात कोणत्याही प्रकारे निष्काळजीपणा करू नका, अन्यथा सोनेरी संधी हातून जाऊ शकते. कोणालाही उसने पैसे देऊ नये. खर्चात वाढ होऊ शकते. खर्चातील वाढीमुळे आर्थिक दबाव येऊ शकतो. प्रकृतीची सुद्धा काळजी घ्यावी लागेल. उपाय:-सूर्याष्टकाचे पठण शुभ फलदायी ठरेल.
12 / 15
धनु: सूर्याचे हे राशी परिवर्तन चांगले आहे. सामाजिक वर्तुळ विस्तारित होईल. मान-सन्मानात वाढ होईल. नाते संबंध सुदृढ होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील. प्राप्तीचे नवीन स्रोत होतील. खर्च होतील, परंतु प्राप्ती चांगली झाल्यामुळे कोणत्याही समस्येस सामोरे जावे लागणार नाही. नोकरी करणाऱ्यांच्या प्राप्तीत वाढ संभवते. ह्या दरम्यान प्रकृती उत्तम राहील. उपाय:- शंकराची पूजा करणे लाभदायी ठरेल.
13 / 15
मकर: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण सामान्य फलदायी आहे. व्यक्तिगत जीवनात जोडीदाराशी बोलताना सतर्क राहावे. चुकीच्या शब्दांचा वापर करू नये. नोकरीत उन्नती होईल. व्यापार उत्तम चालेल. धनलाभाची संधी मिळेल. परंतु लोभापासून दूर राहा. लोभ करून एखादे नुकसान करून बसाल. व्यावसायिक भागीदाराशी वाद संभवतो. कुटुंबियांच्या प्रकृती संबंधी त्रास होऊ शकतो. अशा वेळी त्यांच्याकडे लक्ष द्यावे लागेल. उपाय:-माता-पित्यांना नमस्कार करून दिवसाची सुरुवात करावी.
14 / 15
कुंभ: सूर्याचे तूळ राशीतील भ्रमण अनुकूल आहे. भाग्योदय संभवतो. जोडीदाराची साथ मिळेल. त्यामुळे नाते सुखद होईल. ह्या दरम्यान आत्मविश्वास उंचावेल. अपूर्ण कामे पूर्ण होऊ शकतील. व्यापारात चांगला लाभ होईल. एखाद्या मंगल कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. एखादी तीर्थयात्रा करण्याची संधी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठी हे दिवस अनुकूल आहेत. परीक्षेत यश प्राप्त होईल. उपाय:- दर रविवारी उपवास करून व गाईस गूळ खाऊ घातल्याने लाभ होईल.
15 / 15
मीन: सूर्याचे हे गोचर भ्रमण काहीसे त्रासदायी व आव्हानात्मक असू शकते. जोडीदाराशी समन्वय साधावा. सावध राहावे लागेल. आर्थिक बाबींकडे लक्ष द्यावे लागेल. वाहन चालवताना सावध राहावे लागेल. कोणाशीही वाद होण्याची संभावना आहे. मौन राहून हा वाद टाळणे हिताचे होईल. कर्ज घेण्यात यशस्वी होऊ शकता. प्रकृतीची काळजी घ्यावी. उपाय:- सूर्याष्टकाचे पठण करणे लाभदायी होईल.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यspiritualअध्यात्मिक