शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 11:34 IST

Maharashtra Election Result 2025 Date: नगर परिषदचा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबरला लागणार आहेत.

Maharashtra Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल २१ डिसेंबर रोजी एकत्र जाहीर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेश दिला आहे. २० डिसेंबरच्या निवडणुकीपर्यंत आचारसंहिता लागू राहील आणि कोणालाही एक्झिट पोल प्रसिद्ध करता येणार नसल्याचे असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

कुठे EVM मशिन बंद, कुठे बोगस मतदार, तर कुठे लांबच लांब रांग; नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू

दोन दिवसापूर्वी निवडणूक आयोगाने राज्यातील काही नरगपरिषदा आणि नगर पंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या. आज राज्यात नगरपरिषदा आणि नगर पंचायतीसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार होते. पण, आता या निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी लागणार आहेत.

निवडणूक पारदर्शक राहिली पाहिजे यासाठी हा निर्णय देण्यात आला आहे. उद्या लागणाऱ्या निकालामुळे पुढच्या निवडणुकीवर परिणाम होऊ शकतो. निकाल पुढे ढकलण्याबाबत याचिका दाखल केली होती. याबाबत कोर्टाने आज निकाल दिला आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने सुरुवातीला ४ नोव्हेंबर रोजी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार राज्यातील २४६ नगरपालिका व ४२ नगरपंचायतींच्या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार होत्या व त्याचा निकाल ३ डिसेंबरला जाहीर केला जाणार होता. परंतु, निवडणूक आयोगाने सदस्यपदाच्या उमेदवारांविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहेत तिथे केवळ संबंधित प्रभागांच्या आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांविरोधात याचिका दाखल आहेत तिथे संपूर्ण नगरपालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

त्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी नवीन कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार संबंधित नगरपालिका व नगरपंचायती आणि प्रभागांमध्ये २० डिसेंबर रोजी मतदान घेतले जाणार आहे तर, २१ डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्याविरुद्ध वर्धा जिल्ह्यातील देवळी येथील उमेश कामडी व इतर दोघे आणि वरोरा येथील सचिन चुटे यांच्यासह इतर काहीजनांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या होत्या. त्यावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यापुढे सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने हे आदेश दिले.

प्रशासनावरचा ताण वाढणार

आज होणाऱ्या मतदानाचे सर्व ईव्हीएम मशिन २१ तारखेपर्यंत ठेवावे लागणार आहेत. यामुळे प्रशासनावर ताण येणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Municipal Election Results Postponed; Counting Unified, Outcome on December 21

Web Summary : The Bombay High Court ordered unified counting for Maharashtra's municipal elections on December 21. Re-polling necessitated the postponement. Voting ongoing amidst reports of irregularities; re-elections in 20 districts were previously delayed. This decision aims for transparent elections, averting influence on subsequent polls.
टॅग्स :Electionनिवडणूक 2024Result Dayपरिणाम दिवसMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक