गुरु आदित्य योग: ७ राशींना भाग्यकारक, येणी वसूल होतील; व्यवसायात नफा, नोकरीत पद-पगार वाढ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2024 01:51 PM2024-05-09T13:51:31+5:302024-05-09T13:58:03+5:30

गुरु आदित्य योग कसा तयार होतो? कोणत्या राशींना या योगाचा फायदा मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. १४ रोजी सूर्य वृषभ राशीत विराजमान होणार असून, आगामी काळ वृषभ संक्रांती म्हणून ओळखला जाईल. सुमारे १२ वर्षांनी वृषभ राशीत गुरु आणि सूर्य यांचा युती योग जुळून येत आहे.

मे महिन्याच्या सुरुवातीलाच गुरु ग्रह वृषभ राशीत विराजमान झाला आहे. गुरु ग्रह एका राशीत सुमारे वर्षभर राहतो. सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशानंतर गुरु आदित्य योग जुळून येणार आहे. हा योग अतिशय शुभ आणि लाभदायी मानला जातो.

सूर्य हा सौम्य ग्रह गुरूशी युती योगात असतो तेव्हा त्याचे तेज आणि शुभ प्रभाव आणखी वाढतात, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. गुरु आणि सूर्याच्या या गुरु आदित्य योगाचा कोणत्या राशींना फायदा होऊ शकेल, ते जाणून घेऊया...

मेष: नशिबाची अन् भाग्याची साथ लाभू शकेल. सर्व स्वप्ने हळूहळू पूर्ण होऊ शकतात. कुटुंबातही आनंदाचे वातावरण असू शकते. चांगले पैसे कमवण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकाल. कामाचे खूप कौतुक होईल. समाजात मान आणि प्रतिष्ठा मिळेल.

कर्क: चांगल्या वागणुकीमुळे समाजात सन्मान वाढू शकतो. घरात मुलांसोबत चांगला वेळ घालवता येईल. उत्पन्नही वाढू शकते. नोकरदारांचा पगारही वाढू शकतो. व्यवसायात प्रगतीची शक्यता आहे. करिअरमध्ये यश मिळेल.

सिंह: लवकरच एखादी चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो. उधारी किंवा उसने दिलेले पैसे परत मिळू शकतात. कृती योजना खूप यशस्वी होतील.

तूळ: घरात आनंददायी वातावरण असू शकेल. ऑफिसमधील बॉस कामाने प्रभावित होऊन प्रशंसा करू शकतात. हरवलेले पैसेही परत मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: पैसे कमावण्यासोबतच पैसे वाचवण्यात यश मिळेल. जीवनात प्रगतीचे नवीन मार्ग तयार होऊ शकतील. आरोग्याची काळजी घ्या. नवीन गुंतवणुकीचा फायदा होईल. नवीन व्यवसायात यश मिळेल.

मकर: एखाद्यासोबत रिलेशनशिपमध्ये असाल, विवाहासाठी पुढे जायचे असल्यास हा कालावधी अनुकूल ठरू शकतो. दोन्ही कुटुंब या विवाहाला सहमती देऊ शकतात. नोकरदारांचे पगार वाढू शकतात.

मीन: शुभ प्रभावात आणखी वाढ होऊ शकेल. व्यवसायात फायदा होऊ शकेल. गुंतवणुकीत यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ फायदेशीर आहे. मुलाची कारकीर्द प्रगतीपथावर आहे, हे पाहून आनंद आणि समाधान वाटेल. वडिलोपार्जित संपत्तीतूनही मोठा लाभ मिळू शकेल. करिअरमध्ये अनेक उत्तम संधी मिळतील. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.