वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2024 02:29 PM2024-05-03T14:29:55+5:302024-05-03T14:39:05+5:30

सूर्याची वृषभ संक्रांती काही राशींना उत्तम ठरू शकते, असे सांगितले जात आहे.

मे महिन्यात नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्याचे हे राशीसंक्रमण वृषभ संक्रांती म्हणून ओळखले जाणार आहे. सुमारे महिनाभर सूर्य वृषभ राशीत असेल. अलीकडेच गुरु ग्रहाने वृषभ राशीत प्रवेश केला होता. यामुळे वृषभ राशीत गुरु आणि सूर्याचा युती योग जुळून येऊ शकेल.

मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीतून १४ मे २०२४ रोजी सूर्य ग्रह शुक्राचे स्वामित्व असलेल्या वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु आणि सूर्याचा युती योग चांगला मानला जातो. कुंडलीत सूर्याची स्थिती मजबूत असेल, तर अशा व्यक्तींना भाग्याची आणि नशिबाची साथ मिळते, अशी मान्यता आहे.

सूर्याच्या वृषभ राशीतील प्रवेशाचा काही राशींना उत्तम फायदा मिळू शकतो. करिअर, नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडी यांमध्ये लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...

मेष: सूर्याच्या वृषभ संक्रांतीचा फायदा होऊ शकेल. हा काळ पैशाच्या दृष्टीने चांगला ठरू शकेल. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतील. पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. करिअरमध्ये प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन लागू शकेल. कामगिरी चांगली करता येऊ शकेल. ध्येय साध्य करण्यासाठी जे काही कष्ट कराल ते यशस्वी होईल.

वृषभ: सूर्य वृषभ संक्रांती शुभ फलदायी ठरू शकेल. सरकारी नोकरीची तयारी करत असाल, तर प्रयत्न वाढवावे. वेळ अनुकूल आहे. अपेक्षित परिणाम मिळू शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे. यश मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. सर्व प्रलंबित कामे चांगल्या प्रकारे पूर्ण करू शकाल. अनेक सकारात्मक परिणाम मिळतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. नोकरदारांना प्रमोशन आणि पगार वाढ मिळू शकते.

कर्क: आर्थिक प्रगतीची शुभ संधी प्राप्त होऊ शकते. नोकरीत बढती मिळू शकते. पगार वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळविण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. मान-सन्मान वाढेल. नवीन कामातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. अलीकडे कुठे गुंतवणूक केली असेल तर फायदा होईल. मित्राच्या मदतीने घरी लग्नाचा प्रस्ताव येऊ शकतो. कुठेतरी बराच काळ अडकलेला पैसा परत मिळू शकतो.

सिंह: करिअरच्या दृष्टिकोनातून सूर्याची वृषभ संक्रांती चांगली ठरू शकेल. नोकरी-व्यवसायात स्थिरता व ताकद राहील. प्रभाव वाढेल. कीर्ती आणि वैभव वाढेल. पद आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिक लोक नवीन नातेसंबंध निर्माण करतील. कार्य विस्तारण्यास मदत होईल. आत्मविश्वास वाढेल. आदर वाढेल. वडिलांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो.

कन्या: नोकरदारांना प्रवास करावे लागू शकतात. करिअरमध्ये प्रगती अपेक्षित आहे. व्यापारी वर्गातील लोक नवीन योजना राबवू शकतात. फायदा होईल. भागीदारीचे प्रस्ताव मिळू शकतात. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. नवीन काम पैसा आणि प्रसिद्धी देऊ शकते.

धनु: वाहन सुख मिळू शकेल. करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळू शकते. ज्याची खूप दिवसांपासून वाट पाहत होता. अनेक मोठ्या ऑफर्स मिळू शकतात. कौटुंबिक जीवन आनंदी राहील. वडिलांशी चांगले संबंध ठेवा, त्यांचा आदर करा.

कुंभ: योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय आणि नोकरी सुरू करण्यासाठी हा खूप चांगला काळ आहे. करिअरमध्ये नवीन संधी उपलब्ध होतील. आर्थिक समृद्धी येईल. मान-सन्मान मिळू शकेल. नवीन संधी मिळतील. सर्जनशील क्षेत्राशी संबंधित लोकांना फायदा होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.