३० दिवस उत्तम! ७ राशींना धनलाभ, नव्या नोकरीची ऑफर; व्यापारात नफा, त्रिग्रही योगाचा शुभ काळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 02:26 PM2023-10-10T14:26:27+5:302023-10-10T14:41:46+5:30

सूर्याच्या तूळ राशीतील प्रवेशाने जुळून येत असलेला त्रिग्रही योग काही राशींना सर्वोत्तम लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या...

१७ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करेल. सूर्याच्या तूळ राशीतील संक्रमणाला तूळ संक्रांत असे संबोधले जाते. सूर्य एखाद्या राशीत सुमारे महिनाभर विराजमान असतो. सूर्याच्या तूळ गोचरानंतर त्रिग्रही योग जुळून येत आहे.

आताच्या घडीला तूळ राशीत मंगळ आणि केतु ग्रह विराजमान आहेत. सूर्य गोचरानंतर सूर्य, मंगळ आणि केतु यांचा त्रिग्रही योग जुळून येत आहे. याशिवाय सूर्याचा गुरु आणि राहु या दोन ग्रहांशी समसप्तक योग जुळून येत आहे. गुरु आणि राहु मेष राशीत आहेत.

राहु हा सूर्याचा शत्रू ग्रह मानला जातो. त्यामुळे हे दोन ग्रह समसप्तक स्थानी असणे फारसे शुभ मानले जात नाही. तूळ ही सूर्याची नीच रास आहे. म्हणजेच या राशीत सूर्य अनुकूल, सकारात्मक फल देतोच असे नाही. मात्र, ७ राशी अशा आहेत, ज्यांना सूर्य गोचराचा उत्तम लाभ मिळू शकेल.

सूर्याचे गोचर अनेकार्थाने महत्त्वाचे मानले गेले आहे. कोणत्या ७ राशींना सूर्य गोचराच्या तूळ संक्रांतीचा लाभ मिळू शकेल. नोकरी, व्यवसाय, आर्थिक आघाडी, बिझनेस, व्यापार, व्यवसाय, कुटुंब या आघाड्यांवर सूर्य गोचराचा प्रभाव कसा असू शकेल? जाणून घेऊया...

मिथुन राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर शुभ फलदायी ठरू शकेल. प्रेमसंबंध घट्ट होतील. नवीन नोकरीच्या शोधात असाल तर नवीन नोकरीची ऑफर येऊ शकते. मिथुन राशीचा स्वामी बुध आहे. सूर्य आणि बुध यांच्यात खूप चांगले संबंध आहेत त्यामुळे हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे.

कर्क राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर शानदार ठरू शकेल. प्रेमात असलेल्या व्यक्तींना चांगला काळ ठरू शकेल. चांगली बातमी मिळू शकेल. मालमत्तेद्वारे नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच नोकरदारांना प्रमोशनची संधी प्राप्त होऊ शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर यशकारक ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी कामावर खूप आनंदी राहतील. सूर्य गोचर खूप दमदार ठरू शकेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर अनुकूल ठरू शकेल. त्रिग्रही योगाने अनेक शुभ संधी मिळतील. आर्थिक स्थिती चांगली असेल. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. वकिली क्षेत्रात आपले करियर करायचे आहे, त्यांचा काळ खूप चांगला जाईल.

धनु राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर सकारात्मक ठरू शकेल. करिअरमध्ये प्रगती होईल. मेहनतीने सर्व कामे पूर्ण करू शकाल. तीर्थस्थळी जाण्याची संधी मिळू शकते. खूप आर्थिक लाभ मिळू शकेल. आर्थिक स्थिती उत्तम राहील.

कुंभ राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर खूप शुभ ठरू शकेल. शुभ संधी प्राप्त होऊ शकतील. परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी काळ चांगला राहील. कामाच्या ठिकाणी उच्च पद मिळू शकते. याशिवाय सामाजिकदृष्ट्याही खूप लोकप्रिय होणार आहात.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्य गोचर खूप शानदार ठरू शकेल. कौटुंबिक आनंद राहील. तसेच नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करू शकता. आनंद द्विगुणित करणाऱ्या घटना घडू शकतील.

सूर्यानंतर १८ ऑक्टोबर रोजी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे ऑक्टोबर महिना संपेपर्यंत तूळ राशीत चतुर्ग्रही योग जुळून येईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.