शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

शुक्राचा उदय: ५ राशींना भाग्योदय काळ, धनलाभाचे योग; सुख-समृद्धी लाभेल, पद-प्रतिष्ठा वाढेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 07:07 IST

1 / 9
रोमान्स, कलात्मक प्रतिभा, शारीरिक व भौतिक जीवनाची गुणवत्ता, धन, आनंद, ललित कला, संगीत, नृत्य, चित्रकला, मूर्तिकला यांचा कारक मानला गेलेला शुक्र वक्री चलनाने कर्क राशीत विराजमान झाला आहे. कर्क राशीत प्रवेश करताना शुक्र अस्तंगत होता. अस्तंगत अवस्थेत असलेला शुक्राचा आता उदय झाला आहे.
2 / 9
ज्योतिषशास्त्राप्रमाणे, एखादा ग्रह सूर्यापासून अतिशय जवळच्या अंशांवर असतो. तेव्हा हा ग्रह पृथ्वीवरून दिसेनासा होतो. एखाद्या ग्रहाची ही स्थिती तयार होते, तेव्हा त्याला तो ग्रह अस्त किंवा अस्तंगत होतो, असे म्हटले जाते. तसेच हाच ग्रह सूर्यापासून लांबच्या अंशांवर जातो, त्यावेळी तो पृथ्वीवरून पुन्हा दिसू लागतो. ग्रह पुन्हा दिसू लागल्यामुळे सदर ग्रहाचा उदय झाला, असे म्हटले जाते.
3 / 9
वक्री चलनाने कर्क राशीत आलेला शुक्र ०४ सप्टेंबर रोजी मार्गी होत आहे. तत्पूर्वी, शुक्राचा उदय काही राशींसाठी भाग्योदयकारक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. करिअर, नोकरी, कार्यक्षेत्र, आर्थिक आघाडीवर उत्तम लाभ, संधी तसेच सुख-समृद्धीकारक ठरू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घेऊया...
4 / 9
मेष राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उदय शुभ ठरू शकेल. दीर्घकाळ भेडसावत असलेल्या समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल. आर्थिक बाबतीत लाभ होऊ शकेल. घरगुती प्रकरणांमध्ये सुरू असलेला तणाव दूर होऊ शकेल. जोडीदारासोबत वेळ चांगला जाईल. घराचे नूतनीकरण करू शकता. कुटुंबातील सदस्यांसह सहलीचे नियोजन केले जाऊ शकते.
5 / 9
वृषभ राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उदय लाभदायक ठरू शकेल. व्यावसायिक जीवनात प्रगती होईल. जे लोक संवाद क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना फायदा होईल. ज्यांना अभिनय आणि गायन क्षेत्रात करिअर करायचे आहे, त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू शकेल. गुंतवणूक फायदेशीर ठरू शकेल. या गुंतवणुकीचा भविष्यातही लाभ घेता येऊ शकेल. वडिलांसोबतचे नाते मजबूत होईल. कुटुंबातील सदस्यांशी संबंध सुधारतील. ऑफिसमध्ये कामाचे कौतुक होईल. चांगल्या कामाचे फळ नक्कीच मिळू शकेल.
6 / 9
मिथुन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उदय सकारात्मक ठरू शकेल. नात्यात ज्या समस्या येत होत्या त्या आता दूर होऊ शकतात. संवाद कौशल्य आणि पद्धतीत सुधारणा होऊ शकेल. लोकांशी संबंध पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होतील. करिअरच्या संदर्भात उत्कृष्ट संधी मिळू शकतील.
7 / 9
कर्क राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उदय शुभ परिणामकारक ठरू शकेल. आर्थिक लाभाच्या दृष्टीकोनातून हा काळ खूप चांगला जाणार आहे. मालमत्ता खरेदीमध्ये पैसे गुंतवण्याचा विचार करू शकता. कमाईतील काही भाग वाचवू शकाल. कौटुंबिक सदस्यांसोबत संबंध दृढ होतील. नातेवाईकांकडून काही चांगली बातमी मिळेल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर ही खूप चांगली संधी आहे. अशा कोणत्याही मालमत्तेचा व्यवहार करू शकता ज्यामध्ये भरपूर नफा मिळण्याची अपेक्षा आहे. जीवनाचा आनंद घेऊ शकाल. कुटुंबातील सदस्यांसोबत दर्जेदार वेळ घालवू शकाल.
8 / 9
मीन राशीच्या व्यक्तींना शुक्राचा उदय लाभदायक ठरू शकेल. राहणीमान सुधारू शकेल. भौतिक सुखसोयी वाढतील. काही लोक लव्ह लाइफबाबत मोठा निर्णय घेऊ शकतात. चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक नात्यात प्रेम आणि गोडवा वाढू शकेल.
9 / 9
शुक्राचा उदय हा महत्त्वाचा मानला गेला आहे. सुमारे ५६ दिवस शुक्र कर्क राशीत असेल, असे म्हटले जात आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्य