मालव्य राजयोगात शुक्र मार्गी: तुमची रास कोणती? ‘या’ राशींना अनुकूल, बक्कळ लाभ; पद-पैसा वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:43 IST2025-04-04T19:23:54+5:302025-04-04T19:43:31+5:30
आताच्या घडीला अनेक शुभ योग, राजयोग जुळून आले असून, कोणत्या राशींसाठी हा काळ वरदानासारखा ठरू शकेल? जाणून घ्या...

एप्रिल महिना ज्योतिषीय दृष्टिकोनातून अनेक शुभ योगांचा ठरणार आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे ५ राजयोग जुळून आलेले आहेत. तर, एप्रिल महिन्यात सूर्य मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे.
शुक्र मीन राशीत विराजमान असून, मीन ही शुक्राची उच्च रास आहे. म्हणजेच या राशीत शुक्राची फले सर्वोत्तम आणि सर्वोत्कृष्ट असू शकतात. याच शुक्राचा शुभ मानला गेलेला मालव्य राजयोग जुळून आलेला आहे. १३ एप्रिल २०२५ रोजी शुक्र मीन राशीत मार्गी होणार आहे.
मंगळाचा कर्क राशीत प्रवेश झाल्यानंतर मीन राशीत असलेल्या सर्व ग्रहांशी नवमपंचम योग जुळून येत आहे. तसेच १२ एप्रिल २०२५ रोजी मंगळ पुष्य नक्षत्रात प्रवेश करणार आहे. बुध, शुक्राचा लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. अशा विविध शुभ योगांचा काळ कोणत्या राशींना कसा ठरू शकतो? जाणून घेऊया...
मेष: अपेक्षित यश मिळू शकेल. विद्यार्थ्यांना मोठे यश मिळू शकते. कुटुंब आणि करिअरमध्ये काही जबाबदाऱ्या देण्यात येतील. वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. उत्पन्न आणि खर्चाचे बजेट बनवावे लागेल. वैवाहिक जीवन खूप आनंदी राहणार आहे. कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवू शकाल.
वृषभ: व्यवसाय करणाऱ्यांना अचानक आर्थिक फायदा होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळतील. सरकारशी संबंधित प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. मन खूप आनंदी होईल. परदेशात व्यवसाय करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे अडथळे दूर होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्याशी जोडण्याची संधी मिळेल.
मिथुन: जीवनात सर्जनशीलता वाढेल. यासोबतच प्रेम जीवनही सकारात्मक बदल पाहायला मिळू शकतात. या काळात तुम्हाला नोकरीत पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक प्रतिमा सुधारू शकेल. बॉस आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. वडिलांसोबतचे तुमचे नाते अधिक घट्ट होईल. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
कर्क: भाग्याची साथ मिळू शकते. नातेसंबंधांमध्येही चांगले परिणाम मिळू शकतात. व्यवसायिक असाल तर नवीन करारांचा फायदा होऊ शकतो. विवाहित लोकांचे संबंध सुधारू शकतात. कामाच्या किंवा व्यवसायाच्या संदर्भात प्रवास करू शकता. या काळात एखाद्या धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.
सिंह: इच्छा पूर्ण होऊ शकेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होईल. कामाच्या ठिकाणी कौतुक होईल. वरिष्ठ अधिकारी मोठी जबाबदारी सोपवू शकतात. व्यवसाय वाढवण्याच्या योजना प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. भौतिक सुखसोयी वाढू शकतील.
कन्या: सकारात्मक बदल दिसून येऊ शकतील. आवडत्या ठिकाणी बदली होण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना काही नवीन जबाबदारी दिली जाऊ शकते. परदेशात काम करणाऱ्या किंवा बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अपेक्षित फायदे मिळू शकतात. कौटुंबिक जीवनही आनंददायी राहू शकेल. कामानिमित्त परदेश प्रवास होण्याची शक्यता आहे.
तूळ: नोकरीत पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची अपेक्षा आहे. सार्वजनिक प्रतिमा सुधारण्याची शक्यता आहे. ज्युनियर आणि सीनियर्सकडूनही पाठिंबा मिळेल. सामाजिकदृष्ट्या वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. व्यवसाय वाढू शकतो.
वृश्चिक: व्यावसायिकांचा नफा वाढेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. ज्यांची स्वतःची दुकाने आहेत, त्यांचा नफा वाढेल. दुकानदारांना त्यांचे अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होतील. या काळात मालमत्तेच्या व्यवहारातून नफा होऊ शकतो.
धनु: सुखसोयी वाढतील. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. कोणतीही गुंतवणूक कराल, त्याचा पूर्ण फायदा मिळू शकेल. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. आई आणि सासू-सासऱ्यांशी असलेले नाते अधिक घट्ट होण्याची शक्यता आहे.
मकर: धैर्य आणि शौर्य वाढेल. जे निर्णय घ्याल ते योग्य असल्याचे सिद्ध होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नतीसह नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. सार्वजनिक प्रतिमा सुधारेल. बॉस आणि वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. मोठ्या लोकांशी संबंध निर्माण होतील, जे भविष्यात फायदेशीर ठरू शकेल.
कुंभ: अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. पैशाची कमतरता राहणार नाही. सामाजिकदृष्ट्या वाढ होऊ शकते. लोकप्रियता वाढेल. आदरही मिळू शकेल. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. यश मिळेल. प्रयत्नांना योग्य ती मान्यता मिळू शकेल.
मीन: अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. तसेच, या काळात इच्छा पूर्ण होतील. विद्यार्थ्यांना याद्वारे अभ्यासात यश मिळू शकते. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळण्याची अपेक्षा आहे. जीवनात सर्जनशीलता वाढेल. नियोजित योजना यशस्वी होऊ शकतात. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.