Shukra Gochar 2025:मंगळवारी मालव्य राजयोगात होणार शुक्र गोचर; बाराही राशींना येणार कडू-गोड अनुभव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2025 12:50 IST2025-01-27T12:44:02+5:302025-01-27T12:50:39+5:30
Shukra Gochar 2025: नवीन वर्ष २०२५ सुरु होऊन पहिला महिना जानेवारी संपतही आला. काही संकल्प सिद्धीस गेले असतील, तर काही संकल्प सुरु होताच बारगळले असतील. ते काहीही असो, पण एकूणच ज्यांना बरे वाईट अनुभव त्यांच्यासाठी जानेवारी एन्ड आशादायी चित्र घेऊन येत आहे. मंगळवार दिनांक २८ जानेवारी रोजी मालव्य राजयोगात (Malavya Rajyog 2025) शुक्र गोचर (Shukra Gochar 2025) होत आहे. त्याचा परिणाम बाराही राशींवर होणार आहे. कसा ते जाणून घेऊ.

मीन राशीत शुक्राच्या संक्रमणामुळे मालव्य राजयोग तयार होईल. मीन रास हे शुक्राचे श्रेष्ठ चिन्ह मानले जाते. जेव्हा शुक्र त्याच्या उच्च राशीत संक्रमण करतो तेव्हा मालव्य राजयोग तयार होतो. मालव्य राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ आणि तूळ राशीसह अनेक राशींचे भाग्य उजळेल. आहे. व्यवसायात तुम्हाला अचानक लाभ होण्याची शक्यता आहे. कुठून तरी अडकलेला पैसा मिळवून तुम्ही श्रीमंत व्हाल. मात्र हेच चित्र इतर राशींच्याही बाबतीत दिसणार का?
२८ फेब्रुवारीला शुक्र मीन राशीत प्रवेश करेल. शुक्र हा आनंद, विलास आणि सुखाचा कारक मानला जातो. याशिवाय शुक्राचा थेट परिणाम प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनावर होतो. मालव्य राजयोगाच्या अनेक राशीच्या लोकांच्या आयुष्यात प्रगतीची शक्यता निर्माण होत आहे. सुखसोयी वाढतील आणि तुमचे जीवन ऐषोरामात व्यतीत होईल. मात्र काही राशींना सावध पवित्रा घ्यावा लागेल अशीही चिन्ह आहेत. त्याचा सविस्तर खुलासा करून घेऊ.
मेष :
मेष राशीच्या लोकांना खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल आणि भविष्यातील योजनांवर काम करावे लागेल. नोकरदार लोक आणि व्यापारी यांच्यासाठी शुक्राचे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. या काळात उत्पन्नात वाढ आणि पदोन्नतीची शक्यता आहे. व्यावसायिकांना परदेशाशी संबंधित काही चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल आणि त्यांच्या भावनांचा आदर कराल.
वृषभ :
वृषभ राशीच्या लोकांच्या उत्पन्नाशी संबंधित इच्छा पूर्ण होतील आणि त्यांचे ध्येय साध्य करण्यात ते यशस्वी होतील. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल आणि तुम्ही चैनीच्या वस्तूंवर चांगला खर्च कराल. नोकरदारांच्या पगारात वाढ होईल आणि व्यावसायिकांनाही चांगला नफा मिळण्याची शक्यता वाढेल. जर तुम्ही कोणत्याही आजाराने ग्रस्त असाल तर संक्रमण काळात तुमचे आरोग्य सुधारू शकते.
मिथुन :
मिथुन राशीच्या लोकांच्या करिअर आणि सन्मानात वाढ होईल आणि त्यांना प्रगतीच्या नवीन संधीही मिळतील. जर तुम्ही कोणत्याही परदेशी संस्थेशी संबंधित असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. नोकरदार लोकांची अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल आणि कामाच्या ठिकाणी चांगली कामगिरीही होईल. आर्थिक नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंददायी घटना घडतील.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांना कर्तृत्त्व सिद्ध करण्याची संधी मिळेल. मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल आहे. वडील किंवा गुरू यांचे सहकार्य मिळाल्याने तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. संक्रमण कालावधीत तुम्ही कुटुंबासोबत बाहेर जाण्याची योजना करू शकता. प्रेम विवाह जुळण्याची, होण्याची शक्यता आहे. नात्यामध्ये समजूतदारपणा वाढेल आणि संबंध सुधारतील.
सिंह :
सिंह राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी काही चढ-उतारांना सामोरे जावे लागू शकते. तसेच तुमचे काही सरकारी काम अडू शकते. करिअरमधील यशासाठी सुरुवातीपासूनच सजग आणि जबाबदार राहिल्यास यश मिळवता येते. संक्रमण कालावधीत तुमचे खर्च वाढू शकतात, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. येत्या काळात सासरच्या लोकांकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे.
कन्या:
कन्या राशीचे लोक जे भागीदारीत व्यवसाय करत असतील, त्यांना चांगला नफा मिळेल आणि व्यवसायाच्या विस्तारासाठी योजना आखता येतील. व्यावसायिक तसेच नोकरीच्या संबंधित सहली, दौरे देखील चांगला नफा देतील. कर्तृत्त्व सिद्ध होऊन प्रसिद्धी मिळण्याची शक्यता आहे. जर तुम्ही एखाद्या गोष्टीत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला शुभ परिणाम मिळतील. भेटतील. वैवाहिक जीवनात सुरू असलेले गैरसमज आणि वाद मिटतील.
तूळ :
तूळ राशीच्या राशीच्या लोकांना, विशेषत: दैनंदिन व्यापार करणाऱ्यांना नफा मिळविण्यासाठी अधिक कष्ट करावे लागतील, कारण त्यांना अपेक्षित परिणाम मिळविण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील. कोणत्याही योजनेवर काम करण्यासाठी, तुम्हाला संक्रमण कालावधीत तुमचे कौशल्य वापरावे लागेल. संक्रमण काळात वाद विवादापासून दूर राहणे फायदेशीर ठरेल, अन्यथा गैरसमज निर्माण होऊन अनेक प्रकारचे अडथळे येऊ शकतात.
वृश्चिक :
वृश्चिक राशीच्या लोकांच्या शिक्षणाशी संबंधित प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन संधी निर्माण होईल. नोकरदार लोकांनी सहकाऱ्यांसोबत कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर राहून कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण हीच वेळ आहे, स्वतःला सिद्ध करण्याची! यशप्राप्ती होऊ शकते. अनैतिक मार्गाने येणारा पैसा टाळा, मेहनत करत राहा, आर्थिक स्थिती सुधारेल.
धनु :
धनु राशीचे लोक त्यांच्या करिअरमध्ये चालू असलेल्या प्रगतीचा आनंद घेतील आणि कामाच्या ठिकाणी चांगले परिणाम मिळवून त्यांना मानसिक शांती देखील मिळेल. संक्रमण कालावधीत सुखसोयी आणि चैनीच्या वस्तू मिळतील आणि तुम्ही भौतिक वस्तूंच्या खरेदीवर लक्ष केंद्रित कराल. आपण आपल्या घराचे नूतनीकरण करण्याचा विचार करत असल्यास आगामी काळ शुभ राहील. कुटुंब आणि मित्रांसोबतही चांगला वेळ घालवाल.
मकर :
मकर राशीच्या लोकांचे भावा-बहिणींशी सौहार्दपूर्ण संबंध राहतील आणि त्यांच्या गरजांची काळजी घेतली जाईल. कामाच्या ठिकाणी तुमचे सहकाऱ्यांसोबत चांगले संबंध निर्माण होतील आणि त्यांच्या मदतीने तुम्ही प्रत्येक काम पूर्ण करू शकाल, ज्यामुळे तुम्हाला भविष्यात चांगले परिणाम मिळतील. संक्रमण काळात भाग्योदयाची लक्षणे आहेत. ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. प्रवासाचे आनंददायी योग आहेत.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि करिअरच्या दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. शुक्रदेवाच्या कृपेने तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल आणि तुमच्या मनोकामनाही पूर्ण होतील. प्रगती करण्यासाठी, तुम्ही तुमच्या ध्येयाकडे सतत वाटचाल कराल, पण खर्चही वाढू शकतो. तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. वैवाहिक जीवनात प्रेम संबंध दृढ होतील.
मीन :
शुक्र मीन राशीत भ्रमण करत आहे. या काळात तुम्ही व्यवसायात चांगला नफा मिळवू शकाल आणि व्यवसाय विस्ताराच्या योजनांवरही काम कराल. विवाहित लोकांचे त्यांच्या जोडीदाराशी दृढ संबंध होतील आणि एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करून योग्य निर्णय घेतील. खानपान तसेच आरोग्य यादृष्टीने हा काळ आनंदाचा ठरेल, तसेच येत्या काळात प्रवास योग अविस्मरणीय अनुभव देईल.