Shani Mangal Yuti 2025: ५ एप्रिल रोजी महाशक्तीशाली नवपंचम राजयोग बदलणार 'या' राशींचे भाग्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 16:51 IST2025-04-04T16:26:42+5:302025-04-04T16:51:56+5:30
SHani Magal Yuti 2025: मार्च महिना सगळ्याच राशींसाठी कष्टप्रद ठरला, मात्र एप्रिलमध्ये होणारे ग्रह गोचर सकारात्मक परिणाम करणारे ठरणार आहे. अशातच शनी आणि मंगळ यांच्या समवेत नवपंचम योग तयार होत आहे, जो काही राशींसाठी अनुकूल ठरणार आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार मंगळ धैर्य आणि शौर्याचा कारक आहे, तर शनि कठोर परिश्रम, संघर्ष आणि परिणामांचा कारक आहे. अशा परिस्थितीत या दोघांच्या मिळून तयार होत असलेल्या या नवपंचम योगाचा पुढील राशींसाठी भाग्यकारक ठरणार आहे. हा योग महाशक्तिशाली योग म्हणून ओळखला जातो, त्यामुळे या योगाचे लाभार्थीदेखील आपापल्या क्षेत्रात महाशक्तिशाली होऊ शकतात असे भाकीत वर्तवले जात आहे.
मेष :
मंगळ आणि शनीने तयार होत असलेल्या या नवपंचम योगाचा मेष राशीच्या लोकांवर शुभ प्रभाव पडेल. मंगळाच्या प्रभावामुळे मेष राशीच्या लोकांमध्ये ऊर्जा आणि आत्मविश्वास वाढेल. नुकतीच मेष राशीची साडेसाती सुरु झाली आहे, तरीदेखील हा योग तुमच्यासाठी शुभ फळ देणार आहे. आर्थिक स्थितीत सतत वाढ आणि सुधारणा होण्याची शक्यता आहे.
मेष राशीचे लोक जे व्यवसायात आहेत किंवा एखादा उद्योग करतात त्यांना चांगला व्यावसायिक प्रस्ताव मिळू शकतो, ज्याचा त्यांना दीर्घकाळ फायदा होईल. मेहनतीचे चांगले फळ या काळात मिळेल आणि आर्थिक लाभाचे मार्ग खुले होतील.
कर्क :
कर्क राशीच्या लोकांसाठी शनि आणि मंगळाची ही स्थिती खूप फायदेशीर ठरू शकते. या राशीच्या लोकांची अलीकडेच शनीच्या तावडीतून सुटका झाली आहे, त्यामुळे या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात भरघोस यश मिळू शकेल. आर्थिक लाभ तसेच मान-सन्मान वाढण्याचे सर्व मार्ग खुले होतील.
मंगळाच्या प्रभावामुळे कर्क राशीच्या लोकांना त्यांच्या आंतरिक शक्तीची जाणीव होईल आणि शनीच्या प्रभावामुळेआजवर केलेल्या कष्टाचे चीज होईल. व्यवसायात नफा आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेम वाढेल. जीवनातील समस्यांचा अंतही जवळ आला आहे. आनंदपर्वाची ही सुरुवात आहे असे म्हणता येईल.
तूळ :
तूळ राशीच्या लोकांना मंगळ आणि शनीच्या स्थितीमुळे नवपंचम राजयोगाचा शुभ प्रभाव दिसून येईल. हीच वेळ असेल जेव्हा या राशीच्या लोकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कौटुंबिक तणाव संपुष्टात येईल आणि तुम्हाला तुमच्या जीवनसाथीकडून पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीतील अडचणींचा अंत होईल आणि यशाचा मार्ग सुकर होईल.
शनिदेवाच्या कृपेने तूळ राशीच्या लोकांचा आत्मविश्वास वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगली कामगिरी केल्यास सरकारी नोकरीची इच्छा पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा होईल. कायदेशीर बाबींमध्ये लोक इतरांवर वर्चस्व गाजवू शकतील. प्रेम जीवनात मोठा आणि सकारात्मक बदल होऊ शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकते.
कुंभ :
कुंभ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. स्थानिकांना वरिष्ठांचे पूर्ण सहकार्य मिळेल. अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. यशाचे मार्ग सर्वत्र खुले होतील.
कुंभ राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा फायदा होऊ शकतो. काही जुने फंडे पुनर्वापरात आणून यश मिळवता येईल. शनि आणि मंगळाची स्थिती कुंभ जातकांना खूप फायदे देऊ शकते. संपत्ती आणि भौतिक सुखसोयींमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.