श्रावणी शुक्रवार: सर्वार्थ सिद्धीचा शुभ-लाभ, ५ राशींवर लक्ष्मी होईल प्रसन्न; भाग्याची साथ!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 07:07 AM2023-08-25T07:07:07+5:302023-08-25T07:07:07+5:30

Shravani Shukrawar 2023: दुसऱ्या श्रावणी शुक्रवारी सर्वार्थ सिद्धी नामक शुभ योग जुळून येत आहे.

शुक्रवार हा दिवस धन-धान्य-वैभवाची देवी लक्ष्मी माता तसेच ज्योतिषशास्त्रातील संपत्ती व समृद्धीचा स्वामी शुक्र यांना समर्पित आहे. २५ ऑगस्ट रोजी दुसरा श्रावणी शुक्रवार आहे. श्रावणी शुक्रवारी ज्येष्ठ नक्षत्र आणि सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ संयोग तयार होत आहे.

चंद्र वृश्चिक राशीत असेल. सर्वार्थ सिद्धी या शुभ योगात केलेल्या सर्व कार्यात इच्छित परिणाम प्राप्त होतात आणि व्यक्ती धनवान बनते, अशी मान्यता आहे. शुक्रवारी ज्येष्ठ नक्षत्राच्या प्रभावाने ५ राशींना विशेष लाभ मिळण्याची अपेक्षा आहे.

लक्ष्मीच्या कृपेने धनाची प्राप्ती होईल आणि सर्व कार्यात यश मिळेल. जीवन आनंदी बनवण्यासाठी या राशींसाठी काही उपाय सांगण्यात आले आहेत. हे उपाय केल्याने त्याच्या कुंडलीतील शुक्राची स्थिती मजबूत होऊ शकेल. कुंडलीत शुक्र बलवान असेल तेव्हा व्यावसायिक जीवनात तसेच प्रेम जीवनात आनंद वृद्धिंगत होऊ शकतो, असे म्हटले जाते.

दुसरा श्रावणी शुक्रवार असून, या दिवशी जरा-जिवंतिका पूजन आणि अतिशय शुभ-लाभदायी मानले गेलेले वरदलक्ष्मी व्रत केले जाणार आहे. दुसरा श्रावणी शुक्रवार कोणत्या ५ राशींसाठी शुभ ठरू शकेल? नशीब साथ देईल आणि संपत्तीत वाढ होऊ शकेल? जाणून घेऊया...

मेष राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शुक्रवार विशेष लाभदायी ठरू शकेल. सर्वार्थ सिद्धी योगाचा शुभ प्रभाव दिसू शकेल. कामे वेळेवर पूर्ण होऊ शकतील. विद्यार्थ्यांना या योगाचा विशेष लाभ होईल. कौटुंबिक सदस्यांसोबत दिवस चांगला जाईल. कार्यालयीन कामात अधिकाऱ्यांची साथ मिळेल. सर्वजण कामाचे कौतुक करतील. लक्ष्मीच्या कृपेने उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचा विचार करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही यश मिळेल. जीवनात यश आणि आनंद मिळवण्यासाठी शुक्रवारी पांढर्‍या वस्तूंचे दान करावे. लक्ष्मीला पांढऱ्या रंगाचा समावेश असलेली मिठाई अर्पण करावी.

वृषभ राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शुक्रवार शानदार ठरू शकेल. लक्ष्मीच्या आशीर्वादाने सर्व रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. काही शिकण्याची संधी मिळेल. जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होईल. सर्वार्थ सिद्धी योगामध्ये कोणत्याही क्षेत्रात पैसे गुंतवलेत तरी नफा मिळू शकेल. व्यावसायिकांना विशेष यश मिळेल. घरातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. मित्रांच्या मदतीने काही प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी गायत्री मंत्राचा यथाशक्ती जप करावा. शक्य असल्यास गोसेवा करावी.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शुक्रवार अनुकूल ठरू शकेल. करिअरशी संबंधित काही चांगल्या बातम्या अपेक्षित आहेत. अधिक चांगल्या संधी मिळतील. घरी पाहुणे येऊ शकतात. व्यवसाय करणाऱ्यांना लक्ष्मीच्या कृपेने चांगला नफा कमावण्याची संधी मिळेल. भविष्यासाठी काही पैसे वाचवता येतील. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. केलेले सर्व नियोजन पूर्ण होऊ शकेल.

धनु राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शुक्रवार शुभ ठरू शकेल. सर्वार्थ सिद्धी योगाच्या शुभ प्रभावामुळे एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून धनाची प्राप्ती होऊ शकेल. पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर दिवस चांगला आहे. ही गुंतवणूक भविष्यात चांगले परिणाम देऊ शकेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला सलोखा निर्माण होईल. कार्यक्षेत्रातील प्रत्येक कार्य अपेक्षेनुसार परिणाम देईल. मेहनत आणि समर्पण पाहून बॉसकडून प्रशंसा ऐकायला मिळेल. ज्येष्ठ नक्षत्राच्या शुभ मुहूर्तावर मालमत्तेशी संबंधित व्यवहार करत असाल तर हा व्यवहार फायदेशीर ठरू शकतो. मुलांच्या भविष्याबाबत मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. हा निर्णय तुमच्या कुटुंबात समृद्धी आणणारा ठरू शकेल. शक्य असेल तर दानधर्म करावा.

मीन राशीच्या व्यक्तींना दुसरा श्रावणी शुक्रवार अनुकूल ठरू शकेल. सर्वार्थ सिद्धी योगात जे काही काम पूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणाने कराल त्यात यश मिळेल. लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपत्ती वाढेल. नोकरदारांची प्रगती होईल. ऑफिसमधील सहकारी, अधिकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. छान सहलीचे नियोजन करू शकतात. व्यवसायिकांना लक्ष्मीच्या कृपेने खूप दिवसांपासून अडकलेला मोठा मोबदला मिळू शकतो. तुळशीसमोर तुपाचा दिवा लावावा. घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घ्यावेत. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.