संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2026 12:29 IST2026-04-04T12:22:01+5:302026-04-04T12:29:29+5:30

Sankashti Chaturthi 2026: ५ एप्रिल २०२६ रोजी चैत्र महिन्यातील पहिली संकष्ट चतुर्थी(Sankashti Chaturthi 2026) आहे. नवीन वर्षाच्या या पहिल्या संकष्टीला गणरायाची आराधना करणे विशेष फलदायी मानले जाते. या दिवशी चंद्रोदय रात्री ९ वाजून ४७ मिनिटांनी होणार असून, त्यानंतरच अर्घ्य देऊन उपवास सोडावा.

हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी अनेक प्रकारचे विघ्न दूर करणारी ठरू शकते. यासाठी बाप्पाची उपासना आणि दिलेले उपाय लाभदायी ठरेल. त्यासाठी राशीनुसार दिलेले उपाय अवश्य करा.

१. मेष: मेष राशीच्या व्यक्तींसाठी हा दिवस ऊर्जावान असेल, रखडलेली कामे मार्गी लागतील. उपासना: बाप्पाला ५ लाल जास्वंदाची फुले अर्पण करून 'ॐ हेरम्बाय नमः' या मंत्राचा जप करावा. काय टाळावे: कामाच्या ठिकाणी घाईघाईत निर्णय घेऊ नका आणि रागाच्या भरात कोणाशीही वाद घालण्याचे टाळावे.

२. वृषभ : आर्थिक दृष्टीने हा दिवस प्रगतीकारक असून जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. उपासना: गणपतीला पांढरे चंदन लावून खडीसाखरेचा नैवेद्य दाखवावा. काय टाळावे: स्वतःच्या हट्टापायी घरातील शांतता भंग करू नका आणि आज कोणाकडूनही कर्ज घेणे टाळावे.

३. मिथुन : तुमच्या बुद्धिमत्तेचे आणि चातुर्याचे कौतुक होईल, नवीन संधी चालून येतील. उपासना: बाप्पाला २१ दुर्वांची जोडी 'गणाधिपाय नमः' म्हणत अर्पण करावी. काय टाळावे: एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करून गोंधळून जाऊ नका आणि बोलताना कोणाचाही अपमान होणार नाही याची दक्षता घ्या.

४. कर्क : कौटुंबिक सुखात वृद्धी होईल, मात्र मानसिक चंचलता वाढू शकते. उपासना: गणपतीला दुधाचा अभिषेक करावा किंवा दुध-साखरेचा नैवेद्य दाखवावा. काय टाळावे: अतिशय भावूक होऊन कोणताही व्यवहार करू नका आणि नकारात्मक विचारांपासून स्वतःला दूर ठेवावे.

५. सिंह: सामाजिक प्रतिष्ठा वाढेल आणि सरकारी कामात यश मिळण्याचे योग आहेत. उपासना: बाप्पाला गुळाचा नैवेद्य दाखवून 'ॐ गणाध्यक्षाय नमः' मंत्राचा जप करावा. काय टाळावे: अहंकाराला थारा देऊ नका, इतरांच्या कामात विनाकारण हस्तक्षेप करणे आज टाळावे.

६. कन्या : व्यावसायिक कामात तुमची प्रगती होईल, आर्थिक नियोजनासाठी दिवस उत्तम आहे. उपासना: बाप्पाला मोदक आणि विड्याच्या पानांचा नैवेद्य दाखवावा आणि संकटनाशन स्तोत्र वाचावे. काय टाळावे: इतरांच्या चुका काढण्यापेक्षा स्वतःच्या कामावर लक्ष द्या आणि प्रवासात मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या.

७. तूळ : भागीदारीच्या कामात यश मिळेल आणि जोडीदाराशी असलेले संबंध सुधारतील. उपासना: गणपतीला अष्टगंध लावून पांढऱ्या मिठाईचा नैवेद्य दाखवावा. काय टाळावे: आज कोणत्याही महत्त्वाच्या करारावर विचार न करता स्वाक्षरी करू नका आणि अनावश्यक खर्च टाळावा.

८. वृश्चिक : आरोग्यात सुधारणा होईल आणि शत्रूंवर विजय मिळवण्यात यशस्वी व्हाल. उपासना: बाप्पाला शेंदूर अर्पण करून लाल फुलांची माळ घालावी. काय टाळावे: मनात कोणाबद्दलही द्वेष भावना ठेवू नका आणि आज गुप्त गोष्टी कोणाशीही शेअर करणे टाळावे.

९. धनु : विद्यार्थ्यांसाठी आणि उच्च शिक्षण घेणाऱ्यांसाठी आजचा दिवस भाग्याचा ठरेल. उपासना: बाप्पाला पिवळी फुले अर्पण करून 'ॐ लंबोदराय नमः' मंत्राचा जप करावा. काय टाळावे: अतिआत्मविश्वासाने कामे बिघडू शकतात, त्यामुळे वरिष्ठांचा सल्ला घेण्यास टाळाटाळ करू नका.

१०. मकर : कष्टाचे फळ मिळेल, नवीन मालमत्ता खरेदीचे योग जुळून येऊ शकतात. उपासना: बाप्पाला काळे तीळ अर्पण करावेत आणि अथर्वशीर्षाचे पठण करावे. काय टाळावे: आळस झटका आणि वेळेचा अपव्यय करू नका, कामात टाळाटाळ करणे आज महागात पडू शकते.

११. कुंभ : सर्जनशील कामात रुची वाढेल आणि मित्रांचे सहकार्य लाभेल. उपासना: गणपतीच्या मंदिरात जाऊन प्रदक्षिणा घालाव्यात आणि मोदकाचा प्रसाद वाटावा. काय टाळावे: अनोळखी व्यक्तीवर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका आणि आर्थिक व्यवहारात पारदर्शकता ठेवावी.

१२. मीन : अध्यात्मिक प्रगती होईल आणि मनातील इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील. उपासना: बाप्पाला केशर मिश्रित चंदनाचा टिळा लावावा आणि पिवळे फळ अर्पण करावे. काय टाळावे: स्वप्नांच्या दुनियेत न रमता वास्तवाचा स्वीकार करा आणि कोणाचीही मधस्थी करणे टाळावे.