Raksha Bandhan 2021 : यंदा रक्षाबंधनाच्या मुहूर्ताला बाराही राशींना लागणार लॉटरी; जुळून येतोय शुभयोग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2021 04:33 PM2021-08-19T16:33:17+5:302021-08-19T18:32:13+5:30

Raksha Bandhan 2021 : आपल्याकडे गमतीने असे म्हटले जाते, की रक्षा बंधनाचा दिवस म्हणजे भावांसाठी खर्चाचा आणि बहिणीसाठी कमाईचा दिवस असतो. मात्र गमतीचा भाग वगळता त्या दिवशी जुळून येणाऱ्या योगामुळे बाराही राशींचे भाग्य उघडणार आहे. कारण त्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र व शोभन योग जुळून आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिक वाढले आहे. विशेषतः मेष, कर्क, तूळ, मकर आणि कुंभ राशीला त्याचा अधिक फायदा होणार आहे. तसेच अन्य राशींच्या वाट्याला काय येणार आहे तेही जाणून घेऊ...

येत्या काळात तुमच्या उत्पन्नात वाढ होणार आहे. तसेच हाती घेतलेल्या कार्यात यश प्राप्त होईल. त्यासाठी कुटुंबियांचे व मित्रपरिवाराचे सहकार्य मिळेल.

या राशीच्या लोकांना कामातून फुरसत मिळणार नाही, तसेच नवनव्या संधी चालून येतील. कुटुंबियांचे प्रेम आणि सहवास मिळेल.

बऱ्याच काळापासून अडलेली अनेक कामे मार्गी लागतील. दरम्यान प्रवास योग असल्याने तीर्थयात्रा केल्यास त्या यशस्वी होतील.

कामात व्यस्त रहाल. मनासारख्या संधी चालून येतील. नवीन क्षेत्रात स्वतःला आजमावून पहाल.

हितशत्रूंवर मात कराल. मुलांची प्रगती होईल. त्यांच्याकडून आनंदवार्ता कळतील. कोणाशीही वादविवाद टाळा

कन्या राशीसाठी रक्षाबंधन अधिक लाभदायी ठरणार आहे. येत्या काळात त्यांना मानसन्मानाच्या संधी प्राप्त होतील आणि विरोधक नमते घेतील.

मुलांकडून आनंद वार्ता समजतील. उत्पन्नात वाढ होईल. कामाच्या संधी येतील. आगामी काळात कार्यमग्न राहाल.

येत्या काळात कामाचा ताण असेल, परंतु कोणत्याही प्रकारे घाई गडबड करू नका, नुकसान होईल. मन लावून, जिद्दीने काम केलेत, तर आगामी काळ तुमचाच आहे असे समजा!

तुमच्यावरील जबाबदाऱ्या वाढणार आहेत. त्या कामासंदर्भात असतील नाहीतर प्रापंचिक असू शकतील. त्या जबाबदाऱ्या पेलण्यासाठी तुम्ही तयारीत राहा. त्यातून निश्चितच चांगले घडणार आहे.

अनेक दिवसांपासून भेडसावत असलेली आर्थिक समस्या दूर होईल. उत्पन्न वाढेल आणि लवकरच मोठ्या कार्यात, क्षेत्रात यशस्वी व्हाल!

बृहस्पतीच्या कृपेने तुमच्या अडलेल्या कामाला गती मिळेल आणि उत्पन्नात वाढ होईल. सरकारी कामात यश मिळेल.

मीन राशीच्या आर्थिक अडचणी दूर होऊन कामाच्या नवीन संधी प्राप्त होणार आहेत. मनाची चंचलता बाजूला ठेवून शांत चित्ताने निर्णय घेतल्यास ते खूप लाभदायक ठरतील.