राहु-केतु-शनी गोचर: ५ राशींना महापरिवर्तनाची लॉटरी, धनलाभ योग; यश-प्रगतीसह बदलांचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 02:51 PM2023-09-23T14:51:31+5:302023-09-23T14:59:27+5:30

राहु-केतु आणि शनी ग्रहाच्या शुभ प्रभावामुळे उपन्न वाढीसह नोकरी, करिअर, बिझनेसमध्ये सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते.

ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिल्यास ऑक्टोबर महिना अतिशय वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे. या महिन्यात छाया ग्रह मानले गेलेले राहु आणि केतु राशीपरिवर्तन करणार आहेत. याच महिन्यात चंद्रग्रहण आहे.

राहु आणि केतु अनुक्रमे मेष तसेच तूळ राशीत विराजमान आहेत. ऑक्टोबर महिन्याच्या उत्तरार्धात ते अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत वक्री चलनाने प्रवेश करतील. राहु आणि केतु यांच्यासह शनी ग्रहाचे चलनबदल होणार असल्याचे सांगितले जाते.

राहु आणि केतु ग्रहांचे होत असलेले गोचर अतिशय महत्त्वाचे मानले जाते. सुमारे १८ महिने राहु आणि केतु एकाच राशीत विराजमान असतात. ते एकमेकांपासून समसप्तम स्थानी असतात. नवग्रहातील राहु-केतु आणि शनी हे ग्रह अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या तीनही ग्रहांचा प्रभाव विशेष मानला जातो.

राहु-केतुचे गोचर तसेच शनीचे स्थानपरिवर्तन ५ राशींसाठी विशेष मानले जात आहे. आर्थिक आघाडी, करिअर, बिझनेस, नोकरी यांवर या महापरिवर्तनाचा सकारात्मक प्रभाव पडू शकेल. जीवनात अनेक बदल दिसून येऊ शकतील. विविध आघाड्यांवर लाभ मिळू शकतात, असे सांगितले जात आहे. पाहुया...

मेष राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनीचे महापरिवर्तन विशेष लाभदायक ठरू शकेल. उत्पन्न वाढेल आणि उत्पन्नाचे नवे स्रोत मिळू शकतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. राहु गोचरामुळे गुरु चांडाल योगापासून मुक्तता मिळेल. जीवनात सुख-समृद्धी वाढेल. व्यवसाय पुढे नेण्याची संधी मिळेल. करिअरशी संबंधित नवीन कल्पना सुचतील.

मिथुन राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनीचे महापरिवर्तन भाग्यकारक ठरू शकेल. ज्या कामासाठी बराच काळ प्रयत्न करत होता ते पूर्ण होऊ शकते. या काळात कोणत्याही स्पर्धात्मक परीक्षेला बसणार आहेत त्यांना पूर्ण यश मिळेल. भूतकाळात केलेल्या कोणत्याही गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याचा विचार करू शकतात. शक्य असेल तर दररोज हनुमंतांची सेवा केल्याने चांगले फळ मिळू शकेल.

कर्क राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनीचे महापरिवर्तन सकारात्मक ठरू शकेल. व्यवसायात मोठे यश मिळेल, अशी अपेक्षा करू शकता. कोणतीही प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवून कोणतेही काम करावे. अन्यथा तुमची परिस्थिती बिघडू शकते. हुशारीने काम केले तर करिअरमध्ये मोठे यश मिळवू शकाल. कोणताही निर्णय घेताना ज्येष्ठांचा सल्ला अवश्य घ्या. शक्य असल्यास दर शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

सिंह राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनीचे महापरिवर्तन जीवनात अनेकविध बदलांचे ठरू शकते. व्यवसाय वाढेल. नोकरदारांना प्रमोशन मिळू शकेल. अडकलेला पैसा परत मिळ शकतो. प्रलंबित कामे मार्गी लागू शकतात. यश मिळेल. कौटुंबिक वातावरणही आनंददायी राहील. इतरांची मदत करून मानसिक शांतता लाभेल. कठोर परिश्रमाने पूर्ण कराल त्यात यश मिळेल. करिअरशी संबंधित काही मोठी बातमी मिळू शकते.

तूळ राशीच्या व्यक्तींना राहु-केतु-शनीचे महापरिवर्तन लाभदायक ठरू शकेल. वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल आणि सर्व संबंध सुधारतील. मुलाच्या करिअरकडे लक्ष देण्याची गरज आहे. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. ग्रहांच्या शुभ प्रभावामुळे मोठी लॉटरी लागू शकते. आर्थिक आघाडी सक्षम ठरू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.