निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2024 02:05 PM2024-06-03T14:05:34+5:302024-06-03T14:05:48+5:30

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे.

Big decision of Election Commission! The next Lok Sabha election will end in April, because of heat wave in India | निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! पुढील लोकसभा निवडणूक एप्रिलमध्येच संपविणार

निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या निवडणुकीत प्रचार ते मतदान प्रक्रियेदरम्यान उष्णतेने सर्वांना हैराण केले होते. यामुळे ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करणाऱ्या आयोगावर टीका होत होती. यामुळे पुढील लोकसभा निवडणूक एक महिना आधीच घेण्याचा निर्णय आयोगाने जाहीर केला आहे. 

इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये आयोगाने निवडणूक काळात झालेल्या गोंधळावरून होत असलेल्या टीकेला प्रत्यूत्तर दिले आहे. सोशल मीडियावर सुरु असलेल्या 'लापता जेंटलमैन वापस आ गए' मीम्सवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी उत्तर दिले आहे. आम्ही कधीच बेपत्ता झालो नव्हतो, असे उत्तर राजीव कुमार यांनी विरोधकांना दिले आहे. तसेच आचारसंहिता काळात १० हजार कोटी रुपयांची कॅश, वस्तू जप्त करण्यात आल्याचेही आयुक्तांनी सांगितले.

तसेच ऐन उन्हाच्या कडाक्यात निवडणुका झाल्याचेही आयोगाने मान्य केले. पुढील लोकसभा निवडणुका एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत संपविण्यात येणार असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे. यंदाची निवडणूक १ जूनपर्यंत लांबली होती. ४ जूनला मतमोजणी होणार आहे. आयोगाच्या नव्या घोषणेनुसार भविष्यात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात किंवा एप्रिलच्या अखेरच्या आठवड्यात मतमोजणी होणार आहे. म्हणजेच मार्चमध्ये जाहीर झालेला निवडणूक कार्यक्रम जानेवारी अखेर किंवा फेब्रुवारीमध्ये जाहीर केला जाणार आहे. 

राजीव कुमार काय म्हणाले...
आम्ही भारतीय मतदारांचे उभे राहून आभार मानतो. ८५ वर्षांवरील मतदारांनी घरबसल्या मतदान केले. 1.5 कोटी मतदार आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी 135 विशेष गाड्या, 4 लाख वाहने आणि 1692 विमानांचा वापर करण्यात आला. मोठ्या ब्रँडपासून स्टार्टअपपर्यंत सर्वांनी स्वेच्छेने योगदान दिल्याचे राजीव कुमार यांनी स्पष्ट केले.  मतदान कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा देखील कुमार यांनी दाखला दिला आहे. मतदान कर्मचाऱ्यांना मतदानाला जाताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. जेव्हा त्यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते तेव्हा त्यांच्या अंतःकरणातून काय जात असेल याची कल्पना करा, असा सल्लाही निवडणूक आयुक्तांनी दिला. जम्मू-काश्मीरमध्ये 4 दशकात सर्वाधिक मतदान झाले आहे. खोऱ्यात ५८.५८% आणि जम्मूमध्ये ५१.०५% मतदान झाले. याच आधारावर पुढील विधानसभा निवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे, असेही ते म्हणाले. 
 

Web Title: Big decision of Election Commission! The next Lok Sabha election will end in April, because of heat wave in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.