४ ग्रहांचे गोचर: ८ राशींना जुलै जबरदस्त, यश-प्रगतीची अपार संधी; धनलाभाचे योग, अनुकूल काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 03:13 PM2024-06-25T15:13:00+5:302024-06-25T15:13:00+5:30

जुलै महिना काही राशींना अनुकूल, सकारात्मक आणि लाभदायक ठरू शकतो. जाणून घ्या...

जून महिन्याप्रमाणे जुलै महिन्यात नवग्रहांपैकी महत्त्वाच्या ग्रहांचे गोचर होणार असून, विविध प्रकारचे योग, युती जुळून येऊ शकेल. जुलै महिन्यात ४ ग्रहांचे गोचर होणार आहे. सूर्य, बुध, मंगळ आणि शुक्र हे ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.

शुक्र मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुधाच्या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून येणार आहे. मंगळ मेष राशीतून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य मिथुन राशीतून कर्क राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. तर शुक्र पुन्हा एकदा राशीपरिवर्तन करणार असून सिंह राशीत प्रवेश करणार आहे.

या ग्रहांच्या राशीपरिवर्तनाचा काही राशींना उत्तम लाभ मिळू शकतो, असे सांगितले जात आहे. नोकरी, व्यवसाय, करिअर, कुटुंब, आर्थिक आघाडीवर जुलै महिना अनुकूल फलदायी ठरू शकतो. कोणत्या ८ राशींना सकारात्मक परिणाम मिळू शकतील? ते जाणून घेऊया...

मेष: अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. आदर वाढेल. प्रतिष्ठित लोकांशी संवाद वाढेल. त्याचा थेट फायदा करिअरमध्ये मिळेल. कुटुंबात काही शुभ घटना घडू शकतात. आनंद वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. हुशारीने काम करा.

वृषभ: आर्थिक लाभाच्या अनेक आकर्षक संधी मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. नोकरदारांना नवीन नोकरीसाठी चांगल्या ऑफर मिळू शकतात. उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण होऊ शकतात. जुन्या स्रोतातून पैसा मिळू शकेल. एकंदरीत जुलै महिना शुभ ठरू शकेल.

मिथुन: जुलै महिना खूप खास असेल. मेहनत केल्याचे फल मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. व्यवसायात व्यस्त राहू शकाल. विनाकारण कोणावरही रागावू नका. कुटुंबात काही पूजा किंवा शुभ कार्याचे आयोजन केले जाऊ शकते.

कर्क: जुलै महिन्यात कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते. नवीन नोकरीच्या ऑफर मिळण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास वाढेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. मन प्रसन्न राहील. रखडलेली कामेही पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सिंह: जुलै महिना आनंदाने भरलेला ठरू शकेल. धार्मिक कार्यात सहभागी होऊ शकाल. सरकारी क्षेत्रात तुम्हाला मान-सन्मान मिळेल. अधिकारी वर्गातील लोकांकडून सर्व प्रकारचे सहकार्य मिळेल. करिअरमध्ये नवीन आणि चांगल्या संधी मिळण्याची शक्यता आहे. मित्रांसोबत सावधगिरी बाळगा. कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवू नका.

कन्या: करिअरमध्ये यश मिळू शकते. नशिबाची उत्तम साथ लाभू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. काही कठीण कामात यश मिळवू शकता.

तूळ: हा काळ वरदानापेक्षा कमी नाही. नोकरीत बढती आणि व्यावसायिकांना व्यवसायात फायदा होऊ शकतो. या काळात काही स्वप्ने पूर्ण होऊ शकतात. आर्थिक स्थितीत प्रचंड बदल होण्याची शक्यता आहे.

मकर: जुलै महिना सुखसोयींनी भरलेला असेल. या महिन्यात आनंदी जीवन जगाल. आनंदात वाढ होईल. सुखाचे आगमन होईल. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.