Numerology: ‘या’ ६ मूलांकांना अधिक मासाची सांगता शुभ, धनलाभ योग; सूर्य-मंगळाची अपार कृपा!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 02:01 PM2023-08-14T14:01:14+5:302023-08-14T14:11:17+5:30

Numerology: अधिक मासाची सांगता आणि सूर्य-मंगळाचे गोचर कोणत्या मूलांकांना फायदेशीर ठरू शकेल? तुमचा मूलांक कोणता? सविस्तर जाणून घ्या...

Numerology: यंदाच्या चातुर्मासातील विशेष आणि अनन्य साधारण महत्त्व असलेला अधिक मास समाप्त होत आहे. १७ ऑगस्टपासून निज श्रावण मास सुरू होत आहे. अधिक मासाची सांगता झाल्यानंतर नवग्रहांचा राजा सूर्य आणि नवग्रहांचा सेनापती ग्रह मंगळ राशीपरिवर्तन करणार आहेत. यंदाच्या अधिक मासात अनेकविध शुभ योग जुळून आले होते. आता सुमारे अडीच ते तीन वर्षांनी अधिक मास येईल.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. अधिक मासाची सांगता आणि दोन ग्रहांचे गोचर महत्त्वाचे मानले गेले असून, याचा मूलांकांवरही प्रभाव आणि परिणाम दिसून येऊ शकेल.

अधिक मासाची सांगता झाल्यावर सूर्य स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश करत आहे. तर लगेच दुसऱ्या दिवशी मंगळ ग्रह कन्या राशीत प्रवेश करत आहे. याचा काही मूलाकांना अतिशय शुभ लाभ मिळू शकेल, असे म्हटले जात आहे. कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना अधिक मासाची सांगता उत्तम शुभ, लाभदायक ठरू शकेल? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. शांतता लाभेल. सरकारी योजनांचा लाभ मिळेल. परदेशात जाण्याची इच्छा पूर्ण होऊ शकेल. खर्चाकडे जरूर लक्ष द्यावे. विद्यार्थ्यांना अभ्यासात काही अडचणी येऊ शकतात. परंतु शिक्षकांचे सहकार्य मिळेल. वैवाहिक जीवन चांगले होईल. कामाच्या ठिकाणी समस्या वाढू शकतात. निष्काळजीपणा न केल्यास चांगले परिणाम दिसून येतील.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचा आशिर्वाद मिळतील. नोकरदारांना अधिकाऱ्यांमुळे काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाबाबत कुटुंबात चर्चा होऊ शकते. जोडीदारासोबत एखाद्या गोष्टीवरून वाद होऊ शकतो. घरातील वातावरण बिघडू शकते. कोणाच्या सहकार्याने जीवनात सुख-समृद्धीचे योगायोग घडतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. कामाच्या ठिकाणी समतोल राखला तर चांगले परिणाम दिसून येतील. आर्थिक संपत्ती आणि समृद्धीचे योग जुळून येतील. गुंतवणुकीतून लाभ होतील. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. जमीन व वाहन खरेदीची इच्छा पूर्ण होईल. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. भावंडांच्या मदतीने कामे पूर्ण होतील. व्यवसायात फायदेशीर बदल होतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. शुभ योग घडतील. सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शुभ परिणाम मिळतील. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल पण कोणालाही जास्त सल्ले देणे टाळा. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल राहील. आर्थिक लाभासाठी शुभ संयोग घडत राहतील. कामाच्या ठिकाणी सुधारणा दिसून येईल. मन प्रसन्न राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहील. पैसाही मिळेल. उधारीचे व्यवहार टाळा, अन्यथा पैसे परत मिळण्याची शक्यता कमी आहे. नोकरदारांनी कामाच्या ठिकाणी अनावश्यक वादविवाद टाळले तर बरे होईल. अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अनेक कामे पूर्ण होतील. चर्चेद्वारे परिस्थिती हाताळल्यास चांगले होईल. मान-सन्मान वाढेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. कामाच्या ठिकाणी प्रगती होईल. यश मिळेल. आर्थिक बाबतीत वेळ अनुकूल असेल. अडकलेले पैसे प्राप्त होतील. व्यावसायिक प्रवास फायदेशीर ठरतील. नोकरदारांना उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळतील. मिळकत वाढेल. मित्रांसोबत सहलीला जाण्याचा बेत आखाल. वैवाहिक जीवन चांगले राहील.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. कामाच्या ठिकाणी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी हा काळ शुभ राहील. कामे वेळेवर पूर्ण होतील. यशस्वी व्हाल. खूप दिवसांनी जुन्या मित्राला भेटून आनंद होईल. शैक्षणिक क्षेत्रात चांगल्या निकालासाठी विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीची गरज आहे. खर्चात वाढ होऊ शकेल. पालकांच्या आशीर्वादाने नवीन कार्य सुरू करू शकता.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. शांत राहून कोणताही निर्णय घेतलात तर बरे होईल. आई-वडिलांच्या आशीर्वादाने अनेक कामे पूर्ण होतील. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. कामकाजात अडचणी येतील. सरकारी अधिकाऱ्याच्या मदतीने अडकलेले पैसे मिळतील. परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने अनुकूल होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. आर्थिक दृष्टीकोनातून अनुकूल राहील. धनलाभ होईल. कामाच्या ठिकाणी समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. अधिक प्रयत्न करावे लागतील. चातुर्याचा योग्य वापर केल्यास यश मिळेल. धार्मिक कृत्याने मन शांत राहील. नवी दिशा मिळेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.