Numerology Ram Navami 2023: श्रीराम नवमीला शुभ-लाभ: ‘या’ ५ मूलांकांना अपार यश, प्रगतीची संधी; पद-पैसा-प्रतिष्ठा वृद्धी!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 07:07 AM2023-03-28T07:07:07+5:302023-03-28T07:07:07+5:30

Numerology Ram Navami 2023: श्रीराम नवमीचा काळ कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींसाठी उत्तम संधींचा, लाभाचा, यशकारक ठरू शकेल? जाणून घ्या...

देशभरात चैत्री नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जात आहे. श्रीराम नवमीच्या दिवशी चैत्री नवरात्राची सांगता होईल. प्रभू श्रीराम हे देशाचे आराध्य असल्याचे सांगितले जाते. संपूर्ण देशभरात रामजन्माचा सोहळ्या उत्साहात साजरा केला जातो. एप्रिल महिन्यातही अनेकविध महत्त्वाचे सण-उत्सव साजरे केले जाणार असून, ज्योतिषशास्त्रानुसार, सूर्य, गुरु, बुधासह अनेक ग्रह राशीपरिवर्तन करणार आहेत.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून काढल्या जाणाऱ्या मूलांकाच्या माध्यमातून भविष्यकथन केले जाते. एखाद्या व्यक्तीबाबत त्या व्यक्तीच्या मूलांकावरून अंदाज बांधता येऊ शकतात. नवग्रहांना जसे राशींचे स्वामित्व देण्यात आले आहे, तसेच नवग्रहांना मूलांकांचेही स्वामित्व प्रदान करण्यात आले आहे. मार्चच्या अखेरीस चैत्री नवरात्राची सांगता आणि श्रीराम नवमीचा शुभ योग जुळून आला आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, गुरु स्वराशीत म्हणजेच मीन राशीत अस्तंगत होत आहे. तर बुध अस्तंगत अवस्थेत असताना मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करत आहे. याशिवाय श्रीराम नवमीच्या दिवशी अनेकविध शुभ योग जुळून येत आहेत. या ग्रहस्थितीचा कोणत्या मूलांकाच्या व्यक्तींना शुभ लाभ मिळू शकेल, कोणत्या मूलाकांच्या व्यक्तींना नोकरी, करिअर, आर्थिक आघाडीवर उत्तमोत्तम संधी मिळू शकतील? ते जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. नोकरदारांना अधिकार्‍यांची स्तुती ऐकून बळ तर मिळेलच. कार्यक्षमताही शिखरावर असेल. वैवाहिक जीवनातील गोंधळ संयमाने आणि सहनशीलतेने सोडवला जाईल. शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. दुसऱ्यांच्या चुकीमुळे वा निष्काळजीपणामुळे तुमच्या कामावर परिणाम होऊ शकतो. बुद्धिमत्ता आणि कौशल्याने बिघडलेले काम सुधारत जाईल. मित्रांचे सहकार्य सहज उपलब्ध होईल. तुम्हीही मदत करण्यास तयार असाल. व्यावसायिक निर्णय घेताना योग्य तारतम्य ठेवणे गरज आहे.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. अतिविचार कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतो. पूर्ण शक्ती कामावर केंद्रीत केली जाऊ शकेल. लेखन आणि कायदेशीर कामात विशेष यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या आर्थिक बाबी ज्या त्रास देत होत्या, त्या समस्या संपतील अशी अपेक्षा आहे. अनोळखी लोकांचे सहकार्य मिळेल. रखडलेले कामही पूर्ण होऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. आगामी काळ सावधगिरी बाळगण्याचा आहे. प्रयत्नांना फळ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्त्रोत मिळू शकतील. आर्थिक प्रश्न कार्यक्षमतेने सोडवले जातील. कपडे आणि सौंदर्यप्रसाधनांशी संबंधित लोकांसाठी लाभाचा काळ राहू शकेल. आरोग्याची काळजी घेणे हिताचे ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. बोलताना विशेष काळजी घ्यावी. नोकरदारांसाठी काळ अनुकूल आहे. पदोन्नतीची शक्यता निर्माण होत आहे. मेहनत आणि नशीब कार्यक्षेत्रात यश आणि प्रसिद्धी दोन्ही मिळवून देऊ शकेल. वकिली व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगली संधी मिळू शकते. विशेष लाभ होतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. वैवाहिक जीवनात छोट्या-छोट्या गोष्टींवरून वाद झाल्याने मन खिन्न होऊ शकते. व्यावसायिक निर्णय घेताना योग्य तारतम्य ठेवणे गरज आहे. भावनिक निर्णय घेऊन कोणतेही नवीन काम सुरू करू नये. ध्यानधारणा आणि प्राणायाम करणे मानसिक शांततेसाठी हिताचे ठरू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. करिअरमधील स्पर्धेने मनाची चलबिचल होऊ शकते. मन पूर्णपणे एकाग्र करून काम पूर्ण करणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत कोणावरही जास्त विश्वास ठेवू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. द्विधा मनस्थितीत कोणताही निर्णय घेऊ नका. काळजी घ्यावी.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. वर्तमानातील कार्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. आर्थिक निर्णय स्वतः घेतल्यास फायदा होईल. वैयक्तिक अहंकारामुळे जुन्या नात्यात वाद होऊ शकतात, ते टाळावे.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. नवीन कल्पना आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होऊ शकेल. कामे यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकतील. कार्यकुशलता वाढू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.