Numerology: ‘या’ ७ मूलांकांना वरदान काळ; लक्ष्मी-गणेश होतील प्रसन्न, गणेशोत्सवात लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2023 07:19 AM2023-09-18T07:19:00+5:302023-09-18T07:19:00+5:30

Numerology: गणेशोत्सवाचा काळ काही मूलांकांना उत्तम अनुकूल ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमचा मूलांक कोणता? सविस्तर जाणून घ्या...

Numerology: अवघ्या काही तासांत चैतन्याचा, उत्साहाने परिपूर्ण असणाऱ्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. अबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. तयारी जवळपास पूर्णत्वाकडे गेली असल्याने केवळ गणपती बाप्पाच्या आगमनाची आतुरता लागून राहिली आहे.

या गणेशोत्सवात अनेकविध शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. बुध मार्गी झाला आहे, सूर्य बुधाचे स्वामित्व असलेल्या कन्या राशीत विराजमान झाला आहे. तसेच सूर्याने आपलेच स्वामित्व असलेल्या स्वनक्षत्रात म्हणजेच उत्तरा नक्षत्रात प्रवेश केला आहे. एकूणच ग्रहस्थितीचा राशींसह मूलांकांवरही प्रभाव पडत असतो, असे म्हटले जाते.

ज्योतिषशास्त्राच्या अनेकविध शाखा आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंकशास्त्र. अंकशास्त्रात जन्मतारखेवरून मूलांक काढला जातो आणि या मूलांकांवरून भविष्यकथन केले जाऊ शकते. नवग्रहांना मूलांकांचे स्वामित्व बहाल केलेले आहे. ग्रहांच्या गोचराचा मूलांकांवरही प्रभाव असतो, असे सांगितले जाते. गणेशोत्सवारंभ होत असून, ग्रहस्थितीचा मूलांकांवरही प्रभाव आणि परिणाम दिसून येऊ शकेल. कोणत्या मूलांकांना आगामी काळ उत्तम अनुकूल ठरू शकेल? जाणून घेऊया...

ज्या व्यक्तींचा जन्म १, १०, २८ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक १ आहे. या मूलांकाचा स्वामी सूर्य आहे. आर्थिक लाभाची शुभ शक्यता आहे. इच्छेनुसार काम करायला आवडेल. विरोधकांवर विजय मिळवाल. गुंतवणुकीतून चांगले आर्थिक लाभ होतील. कामाच्या ठिकाणी प्रगतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना नवीन विषय जाणून घेण्याची, समजून घेण्याची आणि अभ्यासण्याची संधी मिळेल. कुटुंबातील सदस्य आणि जोडीदारासोबत चांगला वेळ घालवाल. कोणताही महत्त्वाचा निर्णय पुढे ढकलल्यास चांगले होईल.

ज्या व्यक्तींचा जन्म २, ११, २०, २९ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक २ आहे. या मूलांकाचा स्वामी चंद्र आहे. कार्यक्षेत्रात प्रगतीची शुभ शक्यता असून, काही प्रवासाचे शुभ परिणाम मिळतील. आर्थिक बाबींमध्ये हळूहळू सुधारणा होईल. करिअरमध्ये आवडीचे काम करू शकता. सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्तम राहील. एक नवीन सुरुवात जीवनात आनंद आणि समृद्धी येईल.

ज्या व्यक्तींचा जन्म ३, १२, २१, ३० या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ३ आहे. या मूलांकाचा स्वामी गुरु आहे. आर्थिक लाभासाठी शुभ राहील. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळेल. पैशाशी संबंधित प्रकरणांमध्ये एखाद्याची मदत मिळू शकते. कामाच्या ठिकाणी विनाकारण मतभेद निर्माण होऊ शकतात. जीवनशैलीत बरेच बदल दिसून येऊ शकतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ४, १३, २२, ३१ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ४ आहे. या मूलांकाचा स्वामी राहु आहे. समाजात प्रतिष्ठा वाढेल.कौटुंबिक जीवनात आनंद वाढेल. सर्जनशील कार्यातून आर्थिक लाभ मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी केलेले प्रकल्प यशाचा मार्ग मोकळा करतील. व्यवसायासाठी हा काळ चांगला असेल. कौटुंबिक व्यवसायाशी संबंधित असाल तर चांगले आर्थिक लाभ आणि यश मिळेल. आनंदी असाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ५, १४, २३ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ५ आहे. या मूलांकाचा स्वामी बुध आहे. प्रगती होईल. करिअरमध्ये प्रगतीसाठी अधिक शुभ संधी निर्माण होतील. महिलांकडून चांगला पाठिंबा मिळू शकेल. कामांत यशस्वी होऊ शकाल. आर्थिक लाभासाठी मजबूत परिस्थिती निर्माण होत असून गुंतवणुकीतून नफा वाढेल. वैवाहिक जीवनात चढ-उतार होतील. काही मुद्द्यावरून वाद होण्याची शक्यता आहे. कालांतराने जीवनाचा आनंद लुटू शकाल.

ज्या व्यक्तींचा जन्म ६, १५, २४ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ६ आहे. या मूलांकाचा स्वामी शुक्र आहे. मन धार्मिक कार्यात गुंतलेले असेल. सामाजिक वर्तुळ वाढवण्याचा प्रयत्न कराल. कामाच्या ठिकाणी संवादाने समस्या सोडवल्यास चांगले परिणाम दिसून येतील. आर्थिक दृष्टिकोनातून, वेळ अनुकूल असेल आणि आर्थिक लाभ होईल. परंतु ते अपेक्षेपेक्षा कमी असतील. आनंद आणि समृद्धीच्या शुभ संधी प्राप्त होतील.

ज्या व्यक्तींचा जन्म ७, १६, २५ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ७ आहे. या मूलांकाचा स्वामी केतु आहे. आगामी काळ अनुकूल राहील. नोकरीच्या ठिकाणी प्रगती होईल आणि मान-सन्मान वाढेल. यशाने आनंदी व्हाल. मात्र, खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा बजेट बिघडू शकते. मित्रांकडून सहकार्य मिळेल. कामात मदत होईल. संवाद कौशल्य सुधारेल. सासरच्यांशी संबंधात चढ-उतार येतील. वैवाहिक जीवनात आनंदी असाल. मुले आणि जोडीदारासोबत कुठेतरी बाहेर जाण्याची योजना कराल. एखाद्या गोष्टीची चिंता सतावू शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ८, १७, २६ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ८ आहे. या मूलांकाचा स्वामी शनी आहे. नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी अधिक मेहनत करावी लागेल. तरच यश मिळेल. एखाद्या मित्रासाठी आर्थिक मदत उभी करावी लागू शकते. आई-वडिलांची सेवा करण्याची संधी मिळेल. एखाद्या विषयावर चर्चा करू शकता. आर्थिक बाबींमध्ये जास्त खर्च होईल. परिस्थिती सुधारेल. जीवनात आनंददायी काळ येऊ शकेल.

ज्या व्यक्तींचा जन्म ९, १८, २७ या तारखांना झाला असेल, तर त्यांचा मूलांक ९ आहे. या मूलांकाचा स्वामी मंगळ आहे. प्रतिभा सिद्ध करण्याची संधी मिळेल. प्रयत्नातून यश मिळवाल. एखाद्या खास व्यक्तीसमोर मनातील भावना व्यक्त करण्यासाठी अनुकूल असेल. काही चांगली बातमी मिळू शकते. आदर वाढेल. गुंतवणुकीकडे लक्ष देण्याची गरज आहे. नोकरीत बदलाची योजना आखू शकाल. घरात सुख-शांततेचे वातावरण राहील. नवीन वाहन किंवा जमीन घेण्याचा विचार करत असाल तर तुमची इच्छापूर्ती होऊ शकेल. - सदर माहिती सामान्य गृहितके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, तुमच्या मूलांकाविषयी जाणून घेण्यासाठी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जाते.