Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या मुली असतात निसर्गतः देखण्या आणि आकर्षक
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 16:29 IST2026-01-03T16:26:15+5:302026-01-03T16:29:06+5:30
Numerology: सौंदर्य हे केवळ बाह्य स्वरूपात नसते, तर ते व्यक्तीच्या स्वभावात आणि आत्मविश्वासातही असते. परंतु, अंकशास्त्रानुसार (Numerology) काही विशिष्ट अंकांच्या ऊर्जेमुळे काही मुलींमध्ये उपजतच एक वेगळे आकर्षण आणि सौंदर्य असते. ग्रहांच्या प्रभावामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक 'मॅग्नेटिक' ओढ असते.

सध्याच्या बनावट दुनियेत मेक अप करून कोणाचाही चेहरा मोहरा पालटता येतो. मात्र अंकशास्त्रानुसार काही जन्मतारखा अशा आहेत, ज्याचे वलय, तेज त्या तारखेला जन्मलेल्या व्यक्तीला, विशेषतः मुलींना लाभते आणि त्या निसर्गतः सुंदर आणि आकर्षक दिसू लागतात. जाणून घेऊया कोणत्या मूलांकाच्या मुली अंकशास्त्रानुसार सर्वात सुंदर आणि प्रभावी मानल्या जातात.

मूलांक १ (जन्म तारीख: १, १०, १९, २८) : मूलांक १ चा स्वामी 'सूर्य' (Sun) आहे. सूर्य हा तेज आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. या मुलींच्या चेहऱ्यावर एक वेगळेच तेज (Glow) असते. त्यांचे सौंदर्य हे त्यांच्या 'रॉयल' लूकमुळे आणि जबरदस्त आत्मविश्वासामुळे अधिक उठून दिसते. त्यांची नजर अतिशय प्रभावी असते आणि त्या गर्दीतही उठून दिसतात.

मूलांक २ (जन्म तारीख: २, ११, २०, २९) : मूलांक २ चा स्वामी 'चंद्र' (Moon) आहे. चंद्र हा शीतलता आणि कोमलतेचा कारक आहे. या मुलींचे सौंदर्य अतिशय साधे पण मनमोहक असते. चंद्रासारखी शीतलता आणि निरागसता त्यांच्या चेहऱ्यावर असते. त्यांच्या डोळ्यांत एक प्रकारची खोली असते, जी समोरच्याला लगेच भावते. स्वभावाने अत्यंत मृदू असल्याने त्या सर्वांना आपल्याशा वाटतात.

मूलांक ५ (जन्म तारीख: ५, १४, २३) : मूलांक ५ चा स्वामी 'बुध' (Mercury) आहे. बुध हा बुद्धिमत्ता आणि चातुर्याचा कारक आहे. या मुलींचे सौंदर्य त्यांच्या 'यंग' लूकमुळे ओळखले जाते. त्या वयाने कितीही मोठ्या झाल्या तरी तरुण दिसतात. त्यांचे हसू आणि बोलण्याचे चातुर्य हेच त्यांचे खरे आकर्षण असते.

मूलांक ६ (जन्म तारीख: ६, १५, २४) : अंकशास्त्रात मूलांक ६ चा स्वामी 'शुक्र' (Venus) आहे. शुक्र हा सौंदर्य, प्रेम आणि लक्झरीचा कारक मानला जातो. या मूलांकाच्या मुली अतिशय देखण्या आणि फॅशनेबल असतात. त्यांना टापटीप राहायला आणि स्वतःला प्रेझेंट करायला खूप आवडते. त्यांच्या बोलण्यात आणि वागण्यात एक प्रकारची नजाकत असते, जी कोणालाही आकर्षित करू शकते.

















