२१ ऑगस्टला बुधचा कन्या प्रवेश: ‘या’ ५ राशींना करिअरमध्ये भाग्योदयाची साथ; नशिबात धनलाभाचा योग!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2022 08:12 AM2022-08-18T08:12:58+5:302022-08-18T08:17:14+5:30

तुमची रास कोणती? बुधचा स्वराशीत होणार प्रवेश कोणत्या राशीच्या व्यक्तींना उत्तम ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, ऑगस्ट महिना महत्त्वाचा मानला गेला आहे. शुक्रचा कर्क प्रवेश, नवग्रहांचा सेनापती मानल्या गेलेल्या मंगळाचा वृषभ प्रवेश, नवग्रहांचा राजा सूर्याचा स्वराशीत म्हणजेच सिंह राशीत प्रवेश झाल्यानंतर आता नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध सूर्याचे स्वामित्व असलेल्या सिंह राशीतून स्वराशीत म्हणजेच कन्या राशीत प्रवेश करणार आहे. (Mercury Transit Virgo 2022)

ज्योतिषशास्त्रानुसार, या संपूर्ण महिन्यात गुरु आणि शनी आपापल्या राशींमध्ये वक्री आहेत. तर, २१ ऑगस्ट रोजी बुध आपलेच स्वामित्व असलेल्या कन्या राशीत प्रवेश करणार आहे. बुध ग्रह आकर्षक व्यक्तिमत्वाचे प्रतिक मानला जातो. बुद्धाचे हे संक्रमण आर्थिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील अनेक राशींसाठी खूप शुभ ठरणार आहे. (Budh Gochar in Kanya Rashi 2022)

कन्या राशीत बुधाचे आगमन झाल्यामुळे पाच राशीच्या लोकांना शिक्षण आणि करिअरच्या दृष्टीने खूप शुभ परिणाम मिळू शकतील, असे सांगितले जात आहे. या काळात भाग्य तुम्हाला साथ देईल. कोणत्या राशीसाठी बुधाचे गोचर खूप शुभ असणार आहे, ते जाणून घेऊया...

वृषभ राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश संकटमुक्तीचा ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. शैक्षणिक जीवनात काही अडचणी आल्या तर त्या सोडवता येतील. प्रेम जीवनातही सकारात्मक बदल होतील, तुम्ही तुमच्या बोलण्याने तुमच्या प्रिय जोडीदाराचे मन प्रसन्न करू शकता. यावेळी तुमची तर्कशक्ती विकसित होईल, ज्यामुळे तुम्ही सामाजिक स्तरावर वादविवादाच्या परिस्थितीत विजय मिळवू शकता. मात्र, या काळात संतुलित आहारावर भर देणे उपयुक्त ठरू शकेल.

मिथुन राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश भाग्यकारक ठरू शकेल. या काळात तुमचे कौटुंबिक जीवन चांगले राहील, आईशी तुमचे नाते सुधारेल. यासोबतच बुधचे हे गोचर व्यवसाय करणाऱ्यांसाठी विशेषतः कौटुंबिक व्यवसायासाठी फायदेशीर ठरू शकते. अनुभवी लोकांसह काही लोक स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात आणि तुम्हाला यश मिळू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश अनुकूल ठरू शकेल. काही लोकांना तुमचा स्पष्टवक्तेपणा आवडणार नाही, पण तुम्हाला भविष्यात त्याचा फायदा होईल. या काळात तुम्हाला सामाजिक स्तरावर प्रतिष्ठा मिळू शकते. जे लोक राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत त्यांना मोठा बदल दिसून येऊ शकेल. या राशीच्या व्यावसायिकांना वडिलोपार्जित व्यवसायातून फायदा होईल. सिंह राशीचे लोक त्यांच्या जवळच्या व्यक्तींना मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतात.

बुधचे कन्या राशीत होत असलेले आगमन या राशीच्या व्यक्तींना शुभ ठरू शकेल. तुम्ही भावनिकदृष्ट्या खूप मजबूत होऊ शकता. तुमचा आत्मविश्वास वाढेल, करिअर क्षेत्रात नवीन उंची गाठू शकता. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश मिळू शकते. आयटी क्षेत्राशी संबंधित असलेल्यांना इच्छित ठिकाणी नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या राशीच्या लोकांना वैवाहिक जीवनात चांगले परिणाम मिळू शकतात, या काळात तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू शकता.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना बुधचा कन्या प्रवेश लाभदायक ठरू शकेल. मोठ्या भावंडांचे सहकार्य मिळेल. करिअरबाबत संभ्रमात असलेल्यांनाही यावेळी स्पष्टता दिशा मिळू शकेल. या काळात कामाच्या ठिकाणी तुमचा दबदबाही वाढू शकतो. स्त्रिया एखाद्याच्या मदतीने आपला व्यवसाय सुरू करण्याचा विचार करू शकतात. प्रेमसंबंधांमध्ये आपल्या प्रिय जोडीदाराशी जवळीक वाढू शकते.

सूर्याच्या राशीसंक्रमणानंतर २१ ऑगस्ट रोजी बुध राशीपरिवर्तन करुन कन्या राशीत प्रवेश करेल. अगदी काही दिवसांसाठी सूर्य आणि बुध सिंह राशीत एकत्रितपणे विराजमान असतील. सूर्य आणि बुधाच्या युतीने शुभ असा बुधादित्य योग तयार होणार आहे. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.