२०२५ आरंभीच राजयोग: ९ राशींना सर्वोत्तम वरदान काळ, नवीन नोकरीचा लाभ; शेअर, लॉटरीतून नफा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 08:55 IST2024-12-27T08:45:45+5:302024-12-27T08:55:51+5:30
२०२५ या नववर्षाची सुरुवात अनेक राशींना सकारात्मक, अनुकूल तसेच भरभराटीची होऊ शकते, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

सन २०२५ सुरू होत आहे. या वर्षाच्या प्रारंभीच्याच जानेवारी महिन्यात ग्रह गोचरामुळे राजयोग जुळून येत आहेत. नवीन वर्ष २०२५ च्या सुरुवातीला नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध राशी परिवर्तन करणार आहे. गुरुचे स्वामित्व असलेल्या धनु राशीत बुध प्रवेश करणार आहे.
धनु राशीत नवग्रहांचा राजा सूर्य विराजमान आहे. त्यामुळे बुध आणि सूर्य यांचा बुधादित्य नामक राजयोग जुळून येत आहे. हा राजयोग शुभ मानला गेला आहे. जानेवारी २०२५ मध्ये बुध दोन वेळा गोचर करणार असून, कालांतराने बुध धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करेल. येथेही सूर्यासोबत बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.
तत्पूर्वी धनु राशीतील बुध ग्रहाचे गोचर अन् सूर्यासोबतच्या युतीने जुळून येत असलेला बुधादित्य राजयोग कोणत्या राशींना भरभराट, यश-प्रगती, वैभव-ऐश्वर्य प्राप्तीकारक तसेच उत्तम जाऊ शकेल, ते जाणून घेऊया...
मेष: प्रगती होण्याची शक्यता असते. कल अध्यात्माकडे असेल. बौद्धिक क्षमतेच्या जोरावर अनेक क्षेत्रात यश मिळवू शकता. कवी, लेखक आणि वक्ते म्हणून काम करणाऱ्या लोकांना खूप फायदा होऊ शकतो. अनेक आनंददायी घटना घडू शकतील. वडिलांच्या मदतीने यश मिळू शकते. करिअरच्या आघाडीवर काही मोठे यश मिळेल. मेहनतीचे फळ मिळेल. चांगला आर्थिक नफा मिळू शकतो. मुलांच्या शिक्षणात मोठे यश मिळू शकेल. मन प्रसन्न राहील.
मिथुन: बुधाचे गोचर विशेष फलदायी ठरेल. कुटुंब आणि जोडीदाराशी नाते अधिक घट्ट होतील. वरिष्ठांशी तुमचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरदार लोकांना फायदा तर होईल. व्यावसायिकांना भागीदारीत ज्या समस्यांना तोंड द्यावे लागत होते त्या सर्व समस्यांचे निराकरण मिळू शकेल.
सिंह: नशिबाची पूर्ण साथ मिळेल. करिअर, व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. शैक्षणिक क्षेत्रात प्रगती साधता येईल. जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनासाठी आनंददायी काळ असेल. नवीन नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. व्यवसायाच्या क्षेत्रात भरपूर नफा मिळू शकतो. चांगली रक्कम कमवू शकता. ट्रेंड आणि शेअर्सच्या माध्यमातून भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थिती चांगली राहील.
कन्या: बुधाचे गोचर फायदेशीर ठरू शकते. वाहन व मालमत्तेचे सुख मिळू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळू शकेल. जे लोक रिअल इस्टेट, प्रॉपर्टी डीलिंग किंवा प्रॉपर्टीशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांना चांगले फायदे मिळू शकतात. या काळात करिअरमध्ये फायदे मिळू शकतात. तसेच व्यावसायिकांना चांगला नफा मिळू शकतो.
तूळ: सन २०२५ ची सुरुवात आनंददायी ठरू शकेल. भावंडांचे पूर्ण सहकार्य मिळेल. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नवीन काम सुरू करायचे असेल तर हा काळ शुभ ठरू शकेल. आर्थिक स्थिती सुधारेल. करिअर आणि व्यवसायात यश मिळवू शकाल. व्यवसायाशी संबंधित लोकांना चांगला नफा मिळू शकेल. नोकरी करत असाल तर बढती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात सुख-शांती नांदेल.
धनु: बुध गोचर फायदेशीर ठरू शकते. आत्मविश्वास वाढेल. प्रयत्नांना गती द्याल ज्यामुळे करिअरच्या आघाडीवर काही मोठे यश मिळू शकाल. व्यापारी वर्गातील लोकांना मेहनतीचे फळ मिळेल. भागीदारीच्या कामात फायदा होईल. वैवाहिक जीवन यावेळी आनंदी असेल. आज्जीकडून एखादा मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. भाग्याची साथ लाभेल.
मकर: प्रदीर्घ प्रलंबित कामे पूर्ण होण्यासोबतच संपत्तीत वाढ होऊ शकते. अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कर्ज व्यवहारातून भरपूर पैसे कमवू शकता. भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायाच्या संदर्भात केलेले प्रवास फायदेशीर ठरू शकतील. खर्च होत असले तरी, बचत करण्यात यशस्वी होऊ शकाल.
कुंभ: जुन्या गुंतवणुकीतून फायदा शक्य. संपत्तीत वाढ शक्य. काम करण्याची क्षमता वाढेल. अवघड कामे सहज पूर्ण होतील. परदेशाशी संबंधित कामात यश मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काळ लाभदायक राहील. पैसे कमावण्याच्या नवीन संधी मिळतील. नवीन नोकरी किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी वेळ अनुकूल आहे. नवीन माध्यमातून पैसे कमवू शकता. नोकरीच्या ठिकाणी उत्तम कामामुळे आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यापार क्षेत्रात चांगला नफा मिळू शकेल. लॉटरीमधून पैसे मिळवू शकता.
मीन: कुटुंबासोबत जास्त वेळ घालवाल. ज्यांना नोकरी बदलायची आहे, त्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते. व्यावसायिक भागीदारांच्या सहकार्यामुळे अधिक लाभ मिळू शकतात. चांगली रक्कम मिळेल. मित्रांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. जोडीदाराच्या चांगल्या पाठिंब्याने नातेसंबंधात अधिक आनंद मिळू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.