मंगळ गोचराने ५ ग्रहांशी नवमपंचम योग: ९ राशींना मंगलमय, कामात यश; प्रगतीची संधी, शुभ-लाभ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 13:54 IST2025-04-02T13:42:54+5:302025-04-02T13:54:07+5:30
मंगळ ग्रहाच्या गोचराने जुळून आलेल्या योगांचा कोणत्या राशींवर शुभ प्रभाव पाहायला मिळू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार या काळात विविध योग जुळून आले आहे. मीन राशीत पंचग्रही योग जुळून आला आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, शनि, बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान आहेत. मीन राशीतील ग्रहांच्या स्थितीमुळे विविध प्रकारचे ५ राजयोग जुळून आलेले आहेत.
तर याच काळात मंगळ कर्क राशीत विराजमान होत आहे. मंगळाचा कर्क राशीत प्रवेश झाल्यानंतर मीन राशीत असलेल्या सर्व ग्रहांशी नवमपंचम योग जुळून येत आहे. यापैकी काही ग्रहांचे मंगळाची मैत्रीचे संबंध असून, काहींशी संमिश्र संबंध असल्याचे सांगितले जात आहे.
तसेच काहीच दिवसांनी मंगळ पुष्य नक्षत्राच्या पुढील चरणात प्रवेश करत आहे. या सर्व ग्रह गोचरांचा आणि जुळून आलेल्या राजयोग तसेच नवमपंचम योगाचा काही राशींना अनुकूल, सकारात्मक परिणाम प्राप्त होऊ शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घेऊया...
मेष: दैनंदिन उत्पन्न वाढू शकते. कामाच्या ठिकाणी परिस्थिती बाजूने असेल. कठोर परिश्रमावर लक्ष केंद्रित करा. कामात पुढे जाऊ शकाल. आर्थिक लाभ, गुंतवणुकीसाठी हा काळ शुभ राहील. कुटुंबातही शांती आणि आनंद राहील. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. काम पूर्ण होईल. नियोजित योजना यशस्वी होतील.
मिथुन: करिअरमध्ये फायदे मिळू शकतात. गुरु, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक यांचे पूर्ण सहकार्य मिळू शकते. करिअर उत्तम प्रकारे पुढे जाऊ शकते. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. कामाचे कौतुक होईल. एखादे बक्षीस मिळू शकते. परदेशात प्रवास करू शकता. आयात-निर्यात व्यवसायात भरपूर नफा मिळू शकेल.
कर्क: शनि गोचराने या राशीला ढिय्या प्रभावापासून मुक्तता मिळाली आहे. तर आता मंगळाच्या पाच ग्रहांशी जुळून येत असलेल्या नवमपंचम योग लाभदायक ठरू शकेल. यशासोबतच आर्थिक लाभ होऊ शकतो. समाजात आदर, सन्मान वाढू शकतो. नफा कमवू शकता. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. जीवनात आनंद येऊ शकतो.
सिंह: काही लोकांसाठी चांगले परिणाम आणेल तर काहींसाठी सरासरी परिणाम देईल. रिअल इस्टेटच्या बाबतीत यश मिळू शकेल. परदेशात जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या लोकांसाठी हे संक्रमण फायदेशीर ठरू शकते. एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचे बेत ठरू शकतात. खबरदारी घेतल्यास अनुकूल परिणाम मिळू शकतात. व्यवसायाच्या बाबतीतही मोठी रक्कम मिळू शकते.
कन्या: व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. फक्त कठोर परिश्रम करत राहावे लागेल. मंगळाच्या प्रभावामुळे आत्मविश्वास वाढेल. नवीन योजना राबवण्याची संधी मिळेल. करिअरमध्ये पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प सुरू होण्याची शक्यता आहे. विविध मार्गांनी संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंदी वातावरण असेल, ज्यामुळे खूप प्रशंसा होईल.
तूळ: मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. यामुळे आयुष्यातील अनेक अडचणी दूर होऊ शकतात. आत्मविश्वास आणि दृढनिश्चय वाढेल. स्पर्धा परीक्षा किंवा सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या लोकांना बरेच फायदे मिळू शकतात. कायदेशीर बाबींमध्येही यश मिळू शकते. संपत्ती आणि मालमत्तेत लक्षणीय वाढ दिसून येऊ शकते.
वृश्चिक: मनामध्ये अध्यात्म आणि सकारात्मक विचारांचा विस्तार होईल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल. नोकरीत पदोन्नती मिळू शकते. सरकार आणि प्रशासनाशी संबंधित लोकांकडून लाभ मिळतील. मुलांशी आणि शिक्षणाशी संबंधित बाबींकडेही लक्ष द्यावे लागेल. इच्छित परिणाम साध्य करता येतील. सकारात्मक विचारसरणीने काम अधिक चांगल्या प्रकारे करू शकाल. काही चांगली बातमी मिळू शकते.
मकर: धैर्य आणि शौर्य वाढेल. व्यवसायात किंवा कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाचे फळ मिळेल आणि नवीन यश मिळेल. लोकप्रिय व्हाल. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती आणि पगारवाढ मिळू शकते. नवीन संधी मिळू शकतात. या काळात मित्रांसोबत किंवा कुटुंबासोबत कुठेतरी प्रवास करण्याची योजना आखू शकता.
कुंभ: नोकरी करणाऱ्यांना फायदे मिळू शकतात. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तसेच सहकाऱ्यांकडून पूर्ण सहकार्य मिळू शकेल. ध्येय साध्य करण्यात यशस्वी होऊ शकता. व्यवसायाच्या क्षेत्रात नफा मिळू शकतो. तयार केलेल्या रणनीतीमुळे चांगला फायदा करून घेऊ शकता. भौतिक सुखे मिळू शकतात. सौभाग्यकारक काळ राहू शकेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.