चतुर्ग्रही योगात माघी गणेश जयंती २०२६: ८ राशींना लाभच लाभ, मनासारखे यश; गणपतीची अनंत कृपा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 05:05 IST2026-01-22T05:05:05+5:302026-01-22T05:05:05+5:30
Maghi Vinayak Chaturthi Ganesh Jayanti Utsav 2026: माघी गणेश जयंतीच्या दिवशी अनेक शुभ योग जुळून आले आहेत. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

Shree Ganesh Jayanti 2026: गुरुवार, २२ जानेवारी २०२५ रोजी श्री गणेश जयंती आहे. मराठी वर्षात गणेशाचे तीन जन्म मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. गणपतीच्या वेगवेगळ्या अवतारांपैकी तीन जन्मदिवस अत्यंत महत्त्वाचे मानले आहेत. माघ महिन्यातील चतुर्थी म्हणजेच गणेश जयंती. माघ महिन्यातील ही विनायक चतुर्थी तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी या नावानेही ओळखले जाते.

Maghi Shree Ganesh Jayanti 2026: शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. यामुळे ४ मोठे राजयोग जुळून आलेले आहेत. माघ महिन्यातील विनायक चतुर्थी म्हणजेच माघी श्री गणेश जयंतीला असे योग जुळून येणे शुभ मानले गेले आहे.

Maghi Vinayak Chaturthi Ganesh Jayanti Utsav 2026: माघी श्री गणेश जयंतीच्या काळात जुळून आलेल्या शुभ योगांचा नेमक्या कोणत्या राशींना लाभ होऊ शकेल. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घेऊया...

मेष: मनासारखे यश मिळेल. एखाद्या नवीन कामात गर्क राहाल. त्यातून चांगले लाभ होतील. घरातील कामांसाठी नेहमीपेक्षा जास्त वेळ द्यावा लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. सहकारी वर्गाशी गोडीत बोलून कामे करून घ्यावी. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. आर्थिक व्यवहार जपून करा. कुणाला उसने पैसे देताना विचार करा. शुक्रवार, शनिवार काही अनपेक्षित अडचणी येऊ शकतात.

वृषभ: मान-सन्मान मिळेल. अतिशय गतिमान काळ आहे. हातून मोठी कामे होतील. कामाची प्रशंसा केली जाईल. काहींना पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत अचानक एखादी नवीन जबाबदारी मिळेल. त्यादृष्टीने परिस्थितीवर लक्ष ठेवून राहा. शुक्रवार, शनिवार प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. मात्र, कामाचा ताण राहील. शांत चित्ताने आपली नेहमीची कामे करत राहा.

मिथुन: काही अडचणी असतील. थोडी सावधगिरी बाळगली पाहिजे. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. कुणाला आश्वासने देऊन शब्दात अडकू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. त्यातील बारकावे समजून घेणे आवश्यक राहील. काही सहकारी विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. घरी पाहुणे मंडळी येतील. महिला वर्गाची धांदल उडेल.

कर्क: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. व्यवसायात भरभराट होईल. अनपेक्षित फळे मिळतील. जीवनसाथीचे चांगले सहकार्य मिळेल. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. मात्र, क्रोधाला आवर घातला पाहिजे. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. वाहन हळू चालवा. अडून राहिलेली कामे गती घेतील. उत्साह वाढेल.

सिंह: योजना गुप्त ठेवा. साधकबाधक परिस्थिती राहील. फार मोठ्या योजना आखाल. मात्र, बोलण्यावर नियंत्रण ठेवा. गुपिते लोकांना सांगत बसू नका. काही लोक अडचणीत आणण्याचा प्रयत्न करतील. कागदोपत्री पूर्तता करताना काटेकोरपणा बाळगायला हवा. खाण्या-पिण्याचे पथ्य पाळा. एखाद्या उलाढालीत नुकसान होऊ शकते. ओळखीचा फायदा होईल. वाहने जपून चालवा. मूल्यवान वस्तू, कागदपत्रे सांभाळा.

कन्या: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. या काळात कामे झटपट आटोपून घ्यावी. सामाजिक कार्यात मोठी जबाबदारी राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. शुक्रवार, शनिवार व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जीवनसाथीशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

तूळ: चंद्र भ्रमणामुळे अनुकूल फळे मिळतील. नोकरीत अचानक नवीन संधी मिळेल. त्यामुळे जबाबदारीत वाढ होईल. पगारवाढ व सोयी-सुविधा वाढवून मिळतील. सहकारी वर्गाशी जुळवून घेणे योग्य ठरेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. त्यानिमित्ताने लोकांची ये-जा चालू राहील. वास्तूशी संबंधित कामे वेळच्या वेळी करा. जीवनसाथीशी वाद टाळा. व्यवहार जपून करा.

वृश्चिक: सतत व्यस्त राहाल. महत्त्वाच्या व्यक्ती भेटतील. त्यामुळे फायदा होईल. भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. व्यवसायात चलती राहील. मात्र, अति आत्मविश्वास बाळगू नका. घाईघाईत घेतलेला एखादा व्यावसायिक निर्णय चुकूही शकतो. नोकरीत नवीन जबाबदारी मिळेल. घराच्या देखभालीसाठी वेळ द्यावा लागेल. मुलांशी संवाद ठेवा. त्यांच्या मनात काय चालू आहे, याचा अंदाज घ्यावा. त्यांच्यावर अपेक्षांचे ओझे लादू नका.

धनु: जबाबदारीने वागा. वडिलोपार्जित संपत्तीची कामे करताना सावधपणे वागण्याची गरज आहे. कुठेही सही करताना भावनिक न होता, कागदपत्रे नीट वाचून घ्यावी. व्यवसायात सतत व्यस्त राहाल. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. भावंडांशी काही कारणाने वाद होऊ शकतात. जवळच्या प्रवासाचा योग येईल. प्रवासात सतर्क राहा. अनोळखी व्यक्तींना गोपनीय माहिती देऊ नका. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल.

मकर: काही अडचणी असतील. आरोग्याची काळजी घ्यावी. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. थोडा संयम बाळगल्यास परिस्थिती आटोक्यात येईल. ज्यांचा विवाह रखडलेला आहे, त्यांना दिलासा मिळेल. मालमत्तेची कामे, व्यावसायिक उलाढाली यात चांगली फळे मिळतील. कुठलेही निर्णय घाईघाईत घेऊ नका. जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा.

कुंभ: ओळखीचा फायदा होईल. आर्थिक आवक चांगली राहील. खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. संयम सोडू नका. कायद्याची बंधने पाळण्यात हयगय करू नका. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. अनुकूलता बाजूने राहील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीशी गैरसमज होऊ शकतात.

मीन: काही कटू तर काही गोड अनुभव येतील. मनात उत्साह राहील. नवीन संधी मिळेल. कार्यक्षेत्रातील महत्त्व वाढेल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. भेटवस्तू व आर्थिक लाभ होईल. सावधपणे वागण्याची गरज आहे. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















