Laxmi Pujan 2025 Wishes: लक्ष्मी पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Whatsapp Status द्वारा द्या मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2025 17:38 IST2025-10-20T17:16:37+5:302025-10-20T17:38:01+5:30

Laxmi Pujan 2025 Wishes in Marathi दिवाळीचा(Diwali 2025) मुख्य दिवस लक्ष्मीपूजेचा. २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजेच्या सायंकाळी घरोघरी लक्ष्मी मातेचे आगमन होणार आहेच, पण तिची कृपा आपल्यावर, आपल्या प्रियजनांवर, नातेवाईकांवर, मित्रपरिवारावर सदैव राहावी, यासाठी हे लक्ष्मी पूजन विशेष मराठी ग्रीटिंग्स त्यांना पाठवून, तसेच सोशल मीडियावर स्टेटसला ठेवून प्रेमळ सदिच्छा व्यक्त करा!

दिवाळी आहे खास, त्यात लक्ष्मीचा निवास… फराळाचा सुगंधी वास, सोबत दिव्यांची आरास… मनाचा वाढवी उल्हास, अशा दिवाळीच्या शुभेच्छा… तुमच्यासाठी खास !! ही दिवाळी तुम्हा सर्वांना सुखसमृध्दीची, भरभराटीची, आनंदाची जावो… लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या कुटुंब-परिवाराला सोनेरी शुभेच्छा.. लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

आली दिवाळी उजळला देव्हारा.. अंधारात या पणत्यांचा पहारा.. प्रेमाचा संदेश मनात रुजावा.. आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा.. लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

तुमच्या घरी होवो धनाची बरसात. होवो कोपराकोपऱ्यात लक्ष्मीचा वास, संकटांचा होवो नाश, शांतीचा होवो वास लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

घरात लक्ष्मीचा निवास, अंगणी दिव्यांची आरास, मनाचा वाढवी उल्हास, दिवाळी अशी खास. लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

महालक्ष्मीचे करुनी पूजन, लावा दीप अंगणी धनधान्य आणि सुख-समृद्धी, लाभेल तुम्हा जीवनी लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा

लक्ष्मीची होईल कृपा एवढी, सगळीकडे होईल नाव दिवसरात्र व्यापारात एवढे वाढेल तुमचे काम लक्ष्मी पूजेच्या शुभेच्छा