लक्ष्मी नारायण मालव्य राजयोग: ९ राशींना सर्वोत्तम, लाभच लाभ; भरघोस नफा, भरभराटीचा शुभ काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 14:31 IST2025-03-08T14:20:30+5:302025-03-08T14:31:45+5:30
आगामी काळात अनेक शुभ राजयोग जुळून येत आहेत. अनेक राशींवर याचा शुभ प्रभाव पाहायला मिळू शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार, मार्च महिना अतिशय महत्त्वाचा मानला गेला आहे. कारण मार्च महिन्याची सांगता होताना नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनि ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीत प्रवेश करणार आहे. शनिचा राशीपालट अतिशय महत्त्वाचा मानला जातो. याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडतो. तत्पूर्वी, मार्चच्या मध्यावर अनेक शुभ राजयोग जुळून येत आहे.
मार्च महिन्यात नवग्रहांपैकी सहा ग्रह मीन राशीत येणार आहेत. आताच्या घडीला बुध, शुक्र, राहु आणि नेपच्युन हे ग्रह विराजमान असून, चतुर्ग्रही योग जुळून आला आहे. तसेच बुध आणि शुक्र यांच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आलेला आहे. मीन रास ही शुक्राची उच्च रास मानली गेली आहे. त्यामुळे मालव्य नामक राजयोगही जुळून आलेला आहे.
१३ मार्च २०२५ रोजी शुक्र आणि मंगळ ग्रहाचा शतांक योग जुळून येत आहे. मीन राशीत असलेला बुध १४ मार्च २०२५ रोजी वक्री होत आहे. वृषभ राशीत असलेल्या गुरुची चंद्रावर शुभ दृष्टी पडून गजकेसरी योग तयार होणार आहे. तसेच एकादशी, होलिका दहन, फाल्गुन पौर्णिमा, धुलिवंदन होळी सण साजरा केला जाणार आहे. कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतो? कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकतो? जाणून घेऊया...
मेष: बेरोजगारांना नोकरी मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलोपार्जित व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळू शकतो. गुंतवणुकीच्या दृष्टीनेही हा काळ शुभ आहे. फायदेशीर सौद्यांची संधी मिळू शकते. कारकिर्दीत चांगल्या संधी मिळतील. अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. सर्व कामे सहजपणे पूर्ण करू शकाल.
वृषभ: उत्पन्नात वाढ होऊ शकते. नवीन मार्गांनी पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत पगार वाढ किंवा बोनस मिळू शकतो. नवीन काम करण्याचा विचार मनात येईल. यश मिळवू शकाल. आत्मविश्वास पूर्वीपेक्षा जास्त वाढेल. ज्या लोकांचे काम, व्यवसाय निर्यात आणि आयातीशी संबंधित आहे, त्यांना चांगला नफा मिळू शकतो. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकेल.
मिथुन: अनुकूल ठरू शकेल. जमीन, मालमत्ता, वाहन, घर इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न या काळात पूर्ण होऊ शकतात. घर, वाहन किंवा प्लॉट विकायचे असेल तर या काळात भरपूर नफा मिळू शकतो. गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर ते ठराविक कालावधीसाठी केल्याने फायदा होईल.
सिंह: आर्थिक संकटातून मुक्तता मिळू शकते. पैशाशी संबंधित समस्या सुटू शकेल. आर्थिक व्यवस्थापनाबाबत काही निर्णय घेऊ शकता. परदेशी व्यापारात गुंतलेल्या लोकांना आर्थिक फायदा होऊ शकतो. अनावश्यक खर्च कमी करण्यात यशस्वी होऊ शकता. चांगली रक्कम वाचवू शकता. शेअर बाजारात पैसे गुंतवून फायदा होऊ शकतो. हरवलेले किंवा अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना खूप फायदे मिळू शकतात. कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते.
तूळ: भाग्याची साथ मिळेल. तसेच या काळात काही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. घर किंवा इतर कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक करू शकता.
धनु: मेहनतीचे योग्य फळ मिळेल. कारकिर्दीत प्रगती होईल. शुक्राच्या प्रभावामुळे आरोग्य चांगले राहू शकेल. या काळात, अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. व्यावसायिकांना नवीन ग्राहक मिळू शकतात, ज्यामुळे व्यवसायात चांगला नफा होईल.
मकर: जीवनात आनंददायी घटना घडू शकतात. मन शांत राहील. योग्य निर्णय घेऊ शकाल. जे काही काम सुरू करायचे आहे ते करू शकाल. व्यवसाय असो किंवा इतर कोणतेही काम, त्यात यश मिळवू शकता. नवीन नोकरी करायची असेल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. घरी कोणतेही धार्मिक विधी करायचे असतील किंवा धार्मिक यात्रेला जायचे असेल तर या काळात बरेच फायदे मिळू शकतात.
कुंभ: बोलण्यात सकारात्मकता दिसून येईल. इतरांना आकर्षित करण्यात यशस्वी व्हाल. शिक्षण, उद्योग, विक्री आणि विपणन क्षेत्राशी संबंधित किंवा सल्लागार असलेल्यांसाठी हा काळ शुभ राहील. या काळात गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली असेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते. मन खूप आनंदी होईल.
मीन: मोठे निर्णय घेण्यास कोणतीही अडचण येणार नाही. शुभचिंतकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. बऱ्याच काळापासून व्यवसायात नुकसान होत आहे त्यांना नफा होण्याची शक्यता आहे. वैयक्तिक आयुष्यातही खूप आनंद असेल. जुने वाद मिटू शकतील. वैयक्तिक आयुष्याशी संबंधित गोष्टींवर उपाय शोधण्यातही यशस्वी व्हाल. संवादातून अनेक गोष्टी साध्य करून घेऊ शकाल.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.