तुमच्या राशीनुसार इष्टदेवता कोणती? उपासना-उपाय करा; भरघोस भरभराट लाभ, काही कमी पडणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 14:17 IST2026-02-27T14:01:58+5:302026-02-27T14:17:58+5:30

राशीनुसार कोणत्या इष्टदेवतेचे पूजन करणे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश, प्रगती, सुख, समृद्धी, भरभराट देणारे ठरू शकेल? जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्र हे अत्यंत व्यापक आणि सखोल आहे. २७ नक्षत्रांच्या मिळून १२ राशी तयार झालेल्या आहेत. प्रत्येक राशीचे स्वतःचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक राशीवर एका स्वामी ग्रहाचे नियंत्रण असते, ज्याचा त्याच्या व्यक्तीवर अपरिहार्यपणे परिणाम होतो.

याशिवाय प्रत्येक राशीचे स्वतःचे अधिष्ठाता देवता असते. तुमच्या राशीनुसार त्या इष्टदेवतेची पूजा केल्याने विशेष आशीर्वाद मिळू शकतात. तसेच कुंडलीतील त्या-त्या ग्रहाचे स्थान बळकट होऊ शकते, असे सांगितले जाते.

प्रत्येक राशीचा स्वामी वेगळा आहे. राशीच्या तत्त्वानुसार तसेच स्वामीनुसार काही इष्टदेवतेची उपासना करणे, उपाय करणे अत्यंत लाभदायक, शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. तुमची रास कोणती? कोणत्या इष्टदेवतेचे पूजन करणे जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश, प्रगती, सुख, समृद्धी, भरभराट देणारे ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. मंगळ ग्रह धैर्य, शक्ती आणि उर्जेचे प्रतिनिधित्व करतो. या राशीच्या लोकांनी भगवान हनुमानाची पूजा करावी. असे केल्याने मंगळ दोषापासून मुक्तता मिळू शकते, मंगळाचा प्रतिकूल प्रभाव कमी होऊ शकतो.

वृषभ: वृषभ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह प्रेम, कला, संपत्ती आणि विलासाचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी देवीचे पूजन करावे. यामुळे कुंडलीत शुक्र बळकट होऊ शकतो. धन-धान्य, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव तसेच संपत्तीत वाढ होऊ शकते.

मिथुन: मिथुन राशीचा स्वामी ग्रह बुध आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. कुंडलीत बुधाची मजबूत स्थिती कुशल संवाद कौशल्य, गणित आणि व्यवसायात यश प्रदान करते. या राशीच्या लोकांनी भगवान गणेशाची पूजा करावी. यामुळे करिअरमध्ये यश मिळू शकते.

कर्क: कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी भगवान शिवाचे पूजन करावे. सोमवारी शिवलिंगावर जलाभिषेक केल्यास सर्व प्रकारचा ताण, भयनाश होऊन भरभराट होऊ शकते.

सिंह: सिंह राशीचा स्वामी सूर्य ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार सूर्य नवग्रहांचा राजा मानला गेला आहे. सूर्य ग्रह सन्मान, नेतृत्व आणि आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो. या राशीच्या लोकांनी सूर्याचे पूजन, उपासना, उपाय करावे. यामुळे कुंडलीत सूर्य बळकट होऊन अनेक प्रकारच्या ताण-तणावातूनही दिलासा मिळू शकतो.

कन्या: कन्या राशीचा स्वामी बुध आहे. ज्योतिषशास्त्रात बुधाला ग्रहांचा राजकुमार म्हटले जाते. कुंडलीत बुधाची मजबूत स्थिती कुशल संवाद कौशल्य, गणित आणि व्यवसायात यश प्रदान करते. या राशीच्या लोकांनी भगवान गणेशाचे पूजन करावे. बुधवारी हिरव्या वस्तू दान करावे. दुर्वा अर्पण कराव्यात. विवाह, करिअर आणि व्यवसायातील अडथळे दूर होऊ शकतात.

तूळ: तूळ राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. शुक्र ग्रह प्रेम, कला, संपत्ती आणि विलासाचा कारक मानला जातो. या राशीच्या लोकांनी लक्ष्मी देवीचे पूजन करावे. यामुळे कुंडलीत शुक्र बळकट होऊ शकतो. धन-धान्य, सुख-समृद्धी, ऐश्वर्य-वैभव तसेच संपत्तीत वाढ होऊ शकते.

वृश्चिक: वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे. ज्योतिषशास्त्रात मंगळाला ग्रहांचा सेनापती मानले जाते. मंगळ ग्रह धैर्य, शक्ती आणि उर्जेचे प्रतिनिधित्व करतो. मंगळवारी भगवान हनुमानाची पूजा करावी. बुंदी अर्पण करावी. यामुळे कुंडलीत मंगळाची स्थिती मजबूत होते आणि सर्व समस्या दूर होतात.

धनु: धनु राशीचा स्वामी ग्रह गुरू आहे. ज्योतिषशास्त्रात गुरू हा सर्वात शुभ ग्रह मानला जातो. या राशीच्या लोकांनी गुरुवारी गुरूची पूजा करावी. याव्यतिरिक्त, पिवळ्या वस्तूंचे दान करावे.

मकर: मकर राशीचा स्वामी शनि आहे. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला न्यायाधीश मानले जाते. या राशीच्या लोकांनी शनि पूजन करावे. शनिवारी काळ्या वस्तू दान कराव्यात. शनि मंदिरात जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनि दोषाचा प्रभाव कमी होऊ शकतो.

कुंभ: मकर राशीचा स्वामी शनि आहे. ज्योतिषशास्त्रात शनि ग्रहाला न्यायाधीश मानले जाते. या राशीच्या लोकांनी शनिवारी काळे तीळ दान करावे आणि पिंपळाच्या झाडाची पूजा करावी.

मीन: मीन राशीचा स्वामी ग्रह गुरु आहे. या राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा करावी. गुरुवारी उपवास करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे आर्थिक लाभ, ज्ञान, वैवाहिक आनंद मिळू शकतो. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.