२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:06 IST2025-06-26T14:56:43+5:302025-06-26T15:06:28+5:30

मंगळ आणि राहु-केतु यांचा योग फारसा चांगला मानला गेला नसला, तरी काही राशींना तो लाभदायक, शुभ फलदायी ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. जाणून घ्या...

ज्योतिषशास्त्रानुसार आताच्या घडीला काही शुभ तर काही अशुभ योग जुळून आलेले आहेत. त्याचा केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर प्रभाव पडू शकेल, असे सांगितले जात आहे. यामध्ये मंगळ, शनि आणि राहु-केतु या चार ग्रहांशी संबंधित अशुभ योग तयार झालेला आहे. पुढील सुमारे महिनाभर म्हणजेच २८ जुलै २०२५ पर्यंत ही स्थिती कायम राहणार असल्याचे म्हटले जात आहे.

सद्यस्थितीला राहु आणि केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत आहेत. तर शनि मीन राशीत आहे. मंगळ ग्रह सिंह राशीत आहे. राहु आणि केतु एकमेकांपासून कायम समसप्तक स्थानी असतात. त्यामुळे सिंह राशीतील मंगळावर राहुची दृष्टी आणि कुंभ राशीतील राहु ग्रहावर मंगळाची दृष्टी असून, मंगळ आणि राहु यांचा समसप्तक योग जुळून येत आहे.

तर मीन राशीत असलेल्या शनि ग्रहाशी मंगळाचा षडाष्टक योग जुळून आलेला आहे. ही सर्व स्थिती फारशी चांगली मानली गेलेली नाही. असे असले तरी ८ राशी अशा आहेत, ज्यांना या स्थितीचा लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे. जाणून घेऊया...

वृषभ: शुभ आणि फलदायी ठरू शकतो. या काळात नोकरीत पदोन्नती मिळू शकते. व्यवसाय करत असाल तर नवीन करार आणि नफा मिळण्याच्या संधी उपलब्ध होऊ शकतील. मित्र आणि सहकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे काम सोपे होईल. मोठी ध्येये साध्य करण्यासाठी आणि नवीन योजना आखण्यासाठी हा एक उत्तम काळ आहे. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक स्थिती सुधारू शकेल.

मिथुन: हा काळ सकारात्मक ठरू शकतो. काम आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. लेखन, पत्रकारिता किंवा अध्यापनाशी संबंधित असाल तर हा काळ सुवर्ण संधी घेऊन येऊ शकतो. संवाद कौशल्याची आणि बुद्धिमत्तेची सर्वत्र चर्चा होऊ शकेल. व्यावसायिकांना चांगले पैसे मिळू शकतात. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो.

कर्क: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी वरिष्ठ सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. कामाचे कौतुक होईल. पदोन्नती किंवा नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांना कर्ज मिळू शकते. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. बोलण्याचा प्रभाव वाढू शकेल.

सिंह: या काळात आत्मविश्वास वाढू शकेल. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकेल. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. व्यवसाय किंवा गुंतवणुकीत गुंतलेल्या लोकांना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. आदर मिळू शकतो. मान-सन्मान प्राप्त होऊ शकतात.

तूळ: उत्पन्न आणि गुंतवणुकीच्या बाबतीत हा काळ फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. नवीन संधी प्राप्त होऊ शकतील. उत्पन्नात सतत वाढ होण्याची शक्यता आहे. पूर्वी घेतलेले निर्णय आता फायदे देऊ लागतील. सन्माननीय स्थान मिळेल. गुंतवणुकीतून नफा होईल. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.

वृश्चिक: आगामी काळ सकारात्मक ठरू शकतो. नशिबाची साथ लाभू शकेल. कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकेल. करिअरशी संबंधित नवीन योजना राबवाल. एक नवीन प्रकल्प किंवा भागीदारी सुरू करू शकता, जी भविष्यात फलदायी ठरू शकेल. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

धनु: आगामी काळ लाभदायक ठरू शकेल. यश मिळू शकते. तीर्थयात्रेला जाऊ शकता. ध्यान आणि प्राणायामवर लक्ष द्यायला हवे. कामाच्या ठिकाणी बदली होऊ शकते किंवा दुसऱ्या ठिकाणी नोकरीची ऑफर मिळू शकते. कुटुंबाकडून पूर्ण पाठिंबा मिळू शकतो.

मकर: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. धैर्य आणि शौर्य वाढू शकते. करिअर नवीन उंची गाठेल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रम फळाला येतील. कामाचे कौतुक होऊ शकेल. निर्णय योग्य ठरू शकतील. उच्च अधिकाऱ्यांकडून प्रशंसा होईल. भूतकाळात केलेली गुंतवणूक किंवा प्रयत्न खूप फायदे देऊ शकतील.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.