Hanuman Jayanti 2026 Wishes: हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा हनुमंताचा जन्मोत्सव!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 16:43 IST2026-04-01T16:38:55+5:302026-04-01T16:43:51+5:30
Hanuman Jayanti Wishes in Marathi: चैत्र पौर्णिमेच्या मंगल मुहूर्तावर अवतरलेल्या महाबली हनुमानाच्या जन्मोत्सवानिमित्त (Hanuman Jayanti 2026 Wishes) आम्ही खास शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत, जे तुमच्या दिवसात सकारात्मक ऊर्जा भरतील. मारुतीरायाचा हा भक्तीचा गजर आणि आशीर्वाद सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे संदेश आपल्या मित्र-परिवाराला आवर्जून शेअर करा. तुमच्या व्हॉट्सॲप स्टेटसवर हे संदेश ठेवून आणि प्रियजनांना पाठवून हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह द्विगुणित करा.

Hanuman Jayanti Wishes in Marathi
भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना || श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Chya Hardik Shubhechha
मनोजवम् मारुततुल्यवेगम्, जितेन्द्रियम् बुदि्धमताम् वरिष्ठम् ।। वातात्मजम् वानरयूथमुख्यम्, श्रीरामदूतम् शरणम् प्रपद्ये ।। श्री हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Hanuman Jayanti Status in Marathi
अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण परिवाराला श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Chya Shubhechha
जय हनुमान ज्ञान गुन सागर। जय कपीस तिहुं लोक उजागर।। रामदूत अतुलित बल धामा। अंजनि-पुत्र पवनसुत नामा।। श्री हनुमान जयंतीच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Quotes in Marathi
आरक्त देखिलें डोळां, ग्रासिले सूर्यमंडळा । वाढतां वाढतां वाढे, भेदिलें शून्यमंडळा ।। श्री हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Messages in Marathi
ज्याच्या मनात आहे श्रीराम, ज्याच्या तनी मनी वसतो राम, अशा वीरांच्या वीराला माझा प्रणाम! हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!

Hanuman Jayanti Status in Marathi
रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोय दाणादाण, तुझ्या हृदयात फक्त सीताराम, अशा बजरंग बलीला आमचे कोटी-कोटी प्रणाम! हनुमान जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!

Hanuman Jayanti Chya Shubhechha in Marathi
सत्राणे उड्डाणे, हुंकार वदनी, करी डळमळ भूमंडळ, सिंधुजळगगनी... हनुमान जयंतीच्या शुभेच्छा!

















