२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2025 09:09 IST2025-07-22T08:54:06+5:302025-07-22T09:09:32+5:30

कोणत्या राशींना शत्रू ग्रहांच्या शुभ योगाचा लाभ मिळू शकेल? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

२५ जुलै २०२५ पासून व्रत-वैकल्यांचा राजा श्रावण सुरू होत आहे. सण-उत्सवांची रेलचेल असणाऱ्या चातुर्मासातील श्रावण महिना अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने विचार केल्यास जुलै महिन्यात अनेक राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. तर शनि, मंगळ यांचा षडाष्टक योग, तसेच राहु-केतु आणि मंगळ यांचा समसप्तक योग हे काही प्रतिकूल योगही कायम आहेत.

जुलै महिन्याची सांगता होताना अशुभ मानले जाणारे योग समाप्त होणार आहेत. तत्पूर्वी श्रावण महिना सुरू होताच शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत गुरु ग्रह विराजमान आहे. शुक्र आणि गुरु या दोन ग्रहांच्या युतीने शुभ राजयोग जुळून येत आहे. तसेच श्रावणाच्या सुरुवातीला चंद्र आणि मंगळ यांचा महालक्ष्मी राजयोगही जुळून येत आहे.

काही मान्यतांनुसार, गुरु आणि शुक्र हे एकमेकांचे शत्रू ग्रह मानले गेले आहेत. परंतु, असे असले तरी त्यांच्या युतीने जुळून येणारा गजलक्ष्मी राजयोग शुभ मानला गेला आहे. श्रावणाच्या सुरुवातीलाच हा योग जुळून येणे पुण्यफलदायी मानले गेले आहे. कोणत्या राशींना शत्रू ग्रहांच्या शुभ योगाचा लाभ मिळू शकेल? जाणून घेऊया...

वृषभ: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. संगीत, कला किंवा सर्जनशील कार्यात रस वाढेल. कुटुंबात शुभ कार्यक्रम होतील. अडकलेले पैसे मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. कुटुंबातील सदस्यांमधील सुरू असलेले मतभेद संपुष्टात येऊ शकतील. विद्यार्थी आत्मविश्वासाने पुढे जाऊ शकतील. काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते.

मिथुन: आर्थिक लाभ मिळू शकतात. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशात प्रवास करू शकता. काम आणि व्यवसायात प्रगती मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरी मिळू शकते. विद्यार्थ्यांना शिक्षण, करिअरमध्ये यश मिळेल. एखादे नवीन काम सुरू करायचे असेल तर या काळात ते करणे फायदेशीर ठरू शकते. वैवाहिक जीवनात आनंद राहील. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम कायम राहू शकेल.

कर्क: राजयोग फायदेशीर ठरू शकतात. या काळात तुमचे ज्ञान वाढेल. करिअरमध्ये अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ज्याचे फायदे लवकरच करिअरमध्ये दिसतील. या काळात नियोजित योजना यशस्वी होतील. आदर मिळेल. प्रतिष्ठा वाढेल.

सिंह: याच राशीत जुळून आलेला महालक्ष्मी राजयोग अनेक क्षेत्रात लाभ मिळवून देऊ शकतो. परिश्रम, कौशल्य आणि विवेकाने प्रगती होऊ शकेल. धन, कुटुंब आणि वाणीमध्ये शुभ परिणाम मिळू शकेल. सुख मिळू शकते. प्रशासन, राजकारण, माध्यम इत्यादी क्षेत्रात लोकांना लाभ मिळू शकतात. परदेश प्रवासाच्या संधी मिळू शकतात. ज्या कामात खूप काळापासून मेहनत घेत आहात त्यात यश मिळू शकते. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने नवीन वाहन, मालमत्ता इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायात मोठे यश मिळू शकते.

तूळ: नशिबाची प्रबळ साथ लाभू शकेल. धार्मिक कार्यांमध्ये आवड वाढू शकेल. जवळचे किंवा लांबचे प्रवास लाभदायक ठरू शकतील. वडिलांकडून किंवा गुरुकडून मदत मिळू शकते. प्रेम आणि वैवाहिक जीवनात गोडवा येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळू शकते.

धनु: राजयोग फायदेशीर ठरू शकतात. यावेळी विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत राहील. अविवाहित लोकांना या वेळी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. या काळात जोडीदाराला पदोन्नती मिळू शकते. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. गुरुच्या प्रभावामुळे कारकिर्दीत लाभ मिळतील. अधिकाऱ्यांशी ओळख वाढेल.

मकर: नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. त्याच वेळी व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा होऊ शकतो. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

कुंभ: मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले निकाल मिळू शकतील. प्रेमसंबंधात सुधारणा होऊ शकेल. आर्थिक स्थिती सुधारू शकेल. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. नशिबाची साथ मिळू शकेल. परदेशातही प्रवास करू शकता. बुद्धिमत्ता आणि नियोजन शत्रूंना पराभूत करण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकता.

मीन: चंद्र आणि मंगळाच्या संयोगाने निर्माण होणारा महालक्ष्मी राजयोग भाग्यकारक ठरू शकतो. जीवनात सुरू असलेल्या समस्या संपू शकतील. कामाच्या ठिकाणी किंवा घरात एखाद्या गोष्टीवरून वाद झाला तर या काळात तो सोडवता येईल. केंद्रात दोन शुभ ग्रहांची उपस्थिती आणि पाचव्या घरात बुधादित्य योगामुळे अनेक दोष दूर होऊ शकतील. मानसिक स्थितीत बरीच सुधारणा होऊ शकते. व्यवसायाबद्दल बोलायचे झाले तर परदेशातून चांगले उत्पन्न मिळू शकते. अविवाहित लोकांना लग्नाचे प्रस्ताव मिळू शकतात. कामाच्या ठिकाणी कामाचे कौतुक होईल. यासोबतच पदोन्नतीची शक्यता आहे.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.