गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2025 09:45 IST2025-07-19T09:34:28+5:302025-07-19T09:45:31+5:30

चातुर्मासातील कामिका एकादशीला अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. कोणत्या राशी ठरतील लकी? जाणून घ्या...

आषाढी एकादशीपासून चातुर्मास सुरू होतो. त्यानंतर येणारी कामिका एकादशी महत्त्वाची मानली जाते. सोमवार, २१ जुलै रोजी कामिका एकादशी आहे. उत्तर भारतीय पंचांगानुसार श्रावण मास सुरू झाल्याने श्रावणी सोमवारी कामिका एकादशी येत आहे. हा एक शुभ योग मानला जात आहे. महाराष्ट्रात श्रावण मास शुक्रवार, २५ जुलै २०२५ पासून सुरू होत आहे.

कामिका एकादशीला अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. चंद्र ग्रह आपल्या उच्च राशीत म्हणजेच वृषभ राशीत विराजमान असेल. त्यामुळे गौरी योग जुळून येत आहेत. तसेच शुक्र आपल्या स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत आहे. त्यामुळे मालव्य राजयोग जुळून आलेला आहे. तसेच शुक्र आणि चंद्र यांचा कलात्मक योग जुळून आलेला आहे.

कर्क राशीत सूर्य आणि बुध यांचा बुधादित्य राजयोग जुळून आलेला आहे. गुरु ग्रहाचा उदय झालेला आहे. तर शनि वक्री आहे. या ग्रह योगात आलेली कामिका एकादशी काही राशींना उत्तम लाभदायी ठरू शकते, असे म्हटले जात आहे. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: जुन्या मित्रांची भेट होऊ शकेल. मन आनंदी राहील. व्यावसायिकांना नफा मिळू शकतो. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकेल. कामाचे कौतुक केले जाऊ शकेल. घरगुती खर्च वाढू शकतात. एखादी समस्या अतिशय हुशारीने सोडवू शकाल. विद्यार्थ्यांसाठी हा काळ फायदेशीर ठरू शकेल.

कर्क: हा कालावधी शुभ फलदायी ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होऊ शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नतीची शक्यता आहे. हा काळ व्यावसायिकांसाठी चांगला आहे. गुंतवणुकीतून नफा मिळू शकेल. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळण्याची शक्यता आहे.

सिंह: काम आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. व्यावसायिकांना नफा मिळण्याची शक्यता आहे. परदेशी व्यापाराशी संबंधित लोकांना विशेष फायदा होऊ शकेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. कामाच्या ठिकाणी कनिष्ठ आणि वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो.

कन्या: नशिबाची साथ मिळू शकेल. या काळात कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी सहलीला जाऊ शकता. एखाद्या जुन्या मित्राची भेट होऊ शकते. या काळात देशांतर्गत आणि परदेशात प्रवास करू शकता. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ शकता. विवाहित लोकांना कुटुंबाकडून पाठिंबा मिळू शकेल.

वृश्चिक: एखादी इच्छा पूर्ण होऊ शकते. कामाच्या ठिकाणी सकारात्मक परिणाम मिळू शकतील. नवीन ओळख, प्रसिद्धी मिळू शकेल. नवीन नोकरीचा शोध पूर्ण होऊ शकेल. व्यापारी वर्गातील लोकांसाठी फलदायी काळ ठरू शकेल. एखादी मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर लाभ मिळू शकेल. स्पर्धा परीक्षेशी संबंधित काही चांगल्या बातम्या ऐकायला मिळू शकतात. समस्यांवर उपाय मिळू शकेल.

धनु: सर्जनशीलता आणि ज्ञान वाढू शकते. दीर्घकाळ प्रलंबित काम पूर्ण होऊ शकते. संपत्तीत वाढ होऊ शकते. कामात येणारे अडथळे दूर होऊ शकतात. कुटुंबात सुरू असलेला कलह संपू शकतो. भागीदारीत कोणताही व्यवसाय करत असाल, तर गैरसमज आता संपू शकतात. मुलांकडून काही चांगली बातमी मिळू शकते.

मकर: आव्हाने संपुष्टात येऊ शकती. नवीन नोकरी मिळविण्यात यश मिळू शकते. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना सकारात्मक बातमी कळू शकते. या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे फायदेशीर ठरू शकते. उत्पन्न वाढवण्यासाठी केलेले प्रयत्न फलकारक ठरू शकतील. नशिबाची साथ मिळू शकते. परदेशात नोकरी, परदेशी कंपनी किंवा बहुराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळू शकते. बचतीच्या योजना यशस्वी ठरू शकतील.

कुंभ: लॉटरी किंवा शेअर मार्केटद्वारे पैसे कमवू शकता. नोकरीतून लाभ मिळू शकतो. नशिबाची साथ मिळू शकते. कौटुंबिक व्यवसायात नफा होऊ शकतो. अध्यात्माकडे कल असेल. धार्मिक बाबींमध्ये मोठ्या उत्साहाने भाग घ्याल. वडिलधाऱ्यांचे सहकार्य मिळू शकते. ध्येय साध्य करू शकता.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.