गजकेसरी योगात शुक्र प्रदोष २०२६: ८ राशींचे कल्याण, वैभव-सुख; पद-पैसा-प्रतिष्ठा, मंगलमय काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2026 07:39 IST2026-01-29T07:24:16+5:302026-01-29T07:39:05+5:30
Gajkesari Yog Shukra Pradosh January 2026: जानेवारी महिन्यातील दुसरे शुक्र प्रदोष व्रत आणि जुळून आलेले शुभ योग याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Gajkesari Yog Shukra Pradosh January 2026: ३० जानेवारी २०२६ रोजी प्रदोष आहे. सन २०२६ च्या जानेवारी महिन्यातील हे तिसरे प्रदोष व्रत आहे. तर, दुसरे शुक्र प्रदोष व्रत आहे. प्रदोष व्रत महादेवांना समर्पित व्रत आहे. हे व्रत शुभ पुण्य फलदायी सांगितले गेले आहे. जानेवारी २०२६ महिन्यातील दुसऱ्या प्रदोष व्रतावेळी अनेक उत्तम योग जुळून आलेले आहेत.

शनिचे स्वामित्व असलेल्या मकर राशीत रवि, मंगळ, बुध, शुक्र आणि प्लुटो यांचा पंचग्रही योग जुळून आलेला आहे. तर मिथुन राशीत गुरू आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून आलेला आहे. त्यामुळे शुक्र प्रदोष हे व्रत अधिक शुभ लाभदायी ठरणार आहे.

जानेवारी महिन्यातील दुसरे शुक्र प्रदोष व्रत आणि जुळून आलेले शुभ योग याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? तुमच्यासाठी शुक्र प्रदोष व्रत कसे ठरू शकेल? जाणून घेऊया...

मेष: इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. थोडा ताण राहील. विविध आघाड्यांवर सफलता मिळेल. इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. बरेच दिवस वाट पाहत असलेले एखादे महत्त्वाचे काम होईल. विवाहेच्छूसाठी अनुकूल वातावरण राहील. व्यवसायात भरभराट होईल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भावंडांशी सख्य राहील. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल.

वृषभ: अनुकूल वातावरण राहील. एखाद्या उलाढालीत फायदा होईल. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. विवाहेच्छूकांना अनुकूल परिणाम दिसून येतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. प्रेमात असणाऱ्यांनी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. अनेक उत्तम लाभ होतील.

मिथुन: धनलक्ष्मीची कृपा राहील. अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. त्यामुळे कामाचा ताण वाढेल. मात्र, त्यातून फायदा होईल. हाती आलेला पैसा खर्च करण्याकडे कल राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. तसेच कायद्याची बंधने पाळा. इतरांच्या भानगडीत पडू नका. चांगले दिवस असतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील.

कर्क: नोकरीत नवीन संधी मिळेल. इच्छा, आकांक्षा पूर्ण होतील. एखादी चांगली बातमी कळेल. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या उलाढालीत फायदा होईल. त्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. मात्र, संयमाने वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. सार्वजनिक ठिकाणी पटकन प्रतिक्रिया देणे टाळा.

सिंह: विविध लाभ होतील. चंद्राचे भ्रमण काळात अनुकूल अनुभव येतील. मौजमजा, पर्यटन, सामाजिक मान-सन्मान, नोकरीतील बदल, धनलाभ इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. मात्र, कार्यक्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्यासाठी बरीच खटपट करावी लागेल. काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. अचानक पाहुणे मंडळी येतील. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. विविध प्रकारचे लाभ होतील.

कन्या: अधिक अनुकूलता जाणवेल. काही अडचणी असतील. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. चोरी, फसवणूक यापासून सावध राहा. अडचणी दूर होण्यास सुरुवात होईल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नातेवाइकांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत महत्त्व वाढेल.

तूळ: संमिश्र ग्रहमान राहील. चंद्राचे भ्रमणात सावधपणे वागण्याची गरज आहे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता पाळली पाहिजे. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. नोकरीत वर्चस्व राहील. अनुकूलता बाजूने राहील. एखाद्या सार्वजनिक कार्यात सहभागी व्हाल. प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल, मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल, कलाकार मंडळींचे कौतुक होईल.

वृश्चिक: प्रेमात गैरसमज होतील. संयमाने वागण्याची गरज आहे. काही लोक विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. माणसे पारखून घेण्याची गरज आहे. भागीदारी व्यवसायातील करार-मदार करताना खबरदारी घ्यावी. अचानक धनलाभ होऊ शकतो. गुंतवणूक फायदेशीर ठरेल. मात्र, या काळात वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे.

धनु: परीक्षेत यश मिळेल. अनुकूल वातावरण राहील. एखादा नवीन प्रस्ताव राहील. त्यातून आर्थिक फायदा होणार असला तरी कामाची दगदग होईल. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना चांगली बातमी कळेल. योजना गुप्त ठेवा. आरोग्याची काळजी घ्यावी. अडचणी दूर होतील. मनात आनंदी विचार राहतील. विवाहेच्छूंसाठी अनुकूल काळ आहे.

मकर: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. त्यामुळे कामे अपेक्षेपेक्षा लवकर होतील. आवडत्या लोकांच्या सहवासात मजेत वेळ जाईल. व्यवसायात भरभराट होईल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी विचार केला जाईल. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. एखादी चांगली बातमी कळेल. काहींना अचानक प्रवास करावा लागेल, प्रवास कार्यसाधक ठरतील. फार दगदग होईल, अशी कामे करू नका. महत्त्वाच्या योजना गुप्त ठेवा.

कुंभ: अनेक आघाड्यांवर यश मिळेल. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. हाती पैसा खेळता राहील. मात्र, मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. त्यादृष्टीने थोडे संयमाने वागा. नोकरीत काही अचानक बदल होऊ शकतात. घरी एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. लोकांची ये-जा चालू राहील. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. वाहन जपून चालवा. मुलांच्या यशाच्या वार्ता कळतील. एखादे महत्त्वाचे काम होईल.

मीन: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. तसेच रवि, मंगळ, बुध, शुक्र, प्लूटो यांची लाभ स्थानातील युती अनेक उत्तम लाभ देईल. थोरामोठ्यांच्या ओळखीचा फायदा होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. मात्र, भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. पगारवाढ व उच्च पदप्राप्ती होईल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

















