Gajkesari Rajyog 2023: मीन राशीत गुरू चंद्राच्या युतीनं बनेल गजकेसरी योग, वर्षभर या राशींना होणार लाभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 10:54 AM2023-03-20T10:54:25+5:302023-03-20T11:16:28+5:30

Gajkesari Rajyog 2023 in Meen: हिंदू नववर्ष म्हणजे २२ मार्च गुढीपाडव्यापासून मीन राशी गुरू चंद्राच्या युतीनं गजकेसरी राजयोग निर्माण होईल.

ग्रह आणि नक्षत्रांच्या गोचरामुळे शुभ आणि अशुभ योग तयार होतात, ज्याचा सर्व राशींवर परिणाम होतो. काही राशींसाठी ग्रहांचा राशीबदल शुभ ठरतो तर काहींसाठी त्याचा अशुभ प्रभावही पडतो.

ज्योतिषशास्त्रात राशी बदल आणि ग्रहांची युती महत्त्वाची मानली जातो. गुरु आणि चंद्राच्या युतीमुळे लवकरच गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. २२ मार्च २०२३ रोजी मीन राशीत गुरू आणि चंद्राच्या युतीनं गजकेसरी राजयोग तयार होईल.

ज्योतिषशास्त्रानुसार गजकेसरी राजयोगाचा सर्व राशींवर प्रभाव पडेल. पण चार राशीच्या लोकांसाठी ते खूप शुभ राहील. या राशीच्या लोकांना वर्षभर या राजयोगाचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. जाणून घेऊया या राशींबद्दल.

कर्क - कर्क राशीच्या लोकांसाठी हा योग शुभ सिद्ध होण्याची शक्यता आहे. या काळात तुम्हाला परदेशवारीचा योग निर्माण होऊ शकतो. दुसरीकडे, असे लोक जे अभ्यास करत आहेत किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करत आहेत, त्यांनाही नशिबाची पूर्ण साथ मिळण्याची शक्यता आहे. एखादे काम खूप दिवसांपासून रखडले असेल तर तेही या काळात पूर्ण होऊ शकते.

तूळ - हा कालावधी तूळ राशीच्या लोकांसाठी आर्थिक बाबतीतक उत्तम ठरू शकतो. तुमची ध्येय तुम्ही पूर्ण करू शकाल, तसंच वडिलधाऱ्यांचीही साथ मिळेल. रखडलेली कामं मार्गी लागण्याची शक्यता आहे. तुमचे शत्रू माघार घेतील.

धनु - या काळात धनु राशीच्या लोकांना अनपेक्षितपणे धनलाभ होऊ शकतो. नोकरी-व्यवसायातही फायदा होण्याची शक्यता आहेय. जर तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. नोकरीसंदर्भातील कोणत्याही व्यवहारासाठीही वेळ उत्तम आहे. मीडिया, फिल्म, मार्केटिंग क्षेत्राशी निगडित अशा लोकांनाही फायदा मिळण्याची शक्यता आहे.

मीन- मीन राशीच्या लोकांवर या गजकेसरी योगाचा शुभ प्रभाव अधिक दिसून येऊ शकतो. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग मिळण्याची शक्यता आहे. नवीन नोकरी करण्यासाठी किंवा नवीन स्टार्टअप सुरू करण्यासाठी ही वेळ अनुकूल ठरू शकते. यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता आहे.