First Solar Eclipse of 2023 in India: २० एप्रिलला सूर्यग्रहण: भारतात कुठे दिसणार? ‘असा’ असेल प्रभाव; ‘या’ ७ राशींना संमिश्र काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 10:15 AM2023-04-04T10:15:14+5:302023-04-04T10:29:27+5:30

First Solar Eclipse of 2023 in India: सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण लागत असून, ग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले गेले आहेत. जाणून घ्या...

सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल रोजी लागणार आहे. सूर्यग्रहणाच्या काहीच दिवस आधी नवग्रहांचा राजा सूर्य गुरुचे स्वामित्व असलेल्या मीन राशीतून मंगळाचे स्वामित्व असलेल्या मेष राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे हे ग्रह मेष राशीत लागणार आहे. याशिवाय सूर्यग्रहणावेळी सूर्य अश्विनी नक्षत्रात असेल.

सूर्यग्रहणावेळी मेष राशीत चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. सूर्यग्रहणाच्या दिवशी मेष राशीत गुरु, सूर्य, बुध आणि राहु हे ग्रह विराजमान असतील. २० एप्रिल रोजी लागणारे सूर्यग्रहण सकाळी ०७ वाजून ०४ मिनिटांनी सुरू होईल आणि दुपारी १२ वाजून २९ मिनिटांनी समाप्त होईल. हे सूर्यग्रहण खग्रास प्रकारातील असणार आहे.

सन २०२३ मधील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावास्येला लागत असून, या दिवसापासून सौर ग्रीष्म ऋतुला प्रारंभ होत आहे. वास्तविक पाहता भारतातून सूर्यग्रहण दिसणार नाही. त्यामुळे या दिवशी वेधादि नियम पाळू नयेत, असे सांगितले जात आहे. भारतातून सूर्यग्रहण दिसणार नसले तरी, देश-दुनियेसह १२ राशींवर या सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार असल्याचे सांगितले जात आहे.

सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्यामुळे सूतक काळ पाळू नये, असे सांगितले जात आहे. मात्र, या सूर्यग्रहणाचा ७ राशींवर संमिश्र प्रभाव पडू शकेल, असे म्हटले जात आहे. काही राशीच्या व्यक्तींना या कालावधीत चढ-उतारांचा, समस्या-अडचणींचा सामना करावा लागू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत, त्या राशी? जाणून घेऊया...

मेष राशीतच सूर्यग्रहण लागत असून, चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. या राशीच्या व्यक्तींना हा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आगामी काळात आरोग्याची विशेष काळजी घ्यावी. आर्थिक बाबींमध्ये निर्णय घेणे तुम्हाला कठीण जाऊ शकेल. द्विधा मनस्थिती होऊ शकेल. आपण एक पाऊल पुढे टाकल्यास आपण दोन पावले मागे जातोय, असे वाटेल. कोणत्याही प्रकारच्या बदलाचा विचार करू नका. गोष्टी आहेत तशा राहू द्याव्यात, असा सल्ला दिला जात आहे. शक्य असल्यास दररोज सूर्याला अर्घ्य आणि लाल फूल अर्पण करावे.

वृषभ राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. एकावेळी अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकेल. चिडचिड वाढू शकेल. मात्र, रागावर नियंत्रण ठेवणे हिताचे ठरू शकेल. तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. इतरांना आर्थिक मदत करावी लागू शकेल. तणाव वाढू शकेल. शक्य असल्यास दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे.

कन्या राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आरोग्याची काळजी घ्यावी. कुटुंबात तणाव वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना नुकसान सोसावे लागू शकते. नोकरदारांना कामाच्या ठिकाणी अडचणींचा सामना करावा लागू शकतो. बॉस आणि सहकाऱ्यांसोबत तणाव असू शकतो. लाभाची अपेक्षा होती, तिथून तुम्हाला उलट परिणाम मिळू शकेल. शक्य असल्यास दर रविवारी सूर्याला अर्घ्य द्यावे.

तूळ राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. आर्थिक बाबतीत अडचणी येऊ शकतात. गुंतवणुकीतून अपेक्षित परिणाम मिळतील असे नाही. वडिलांसोबतच्या नातेसंबंधावर परिणाम होऊ शकतो. मतभेद होऊ शकतात. नोकरीत पैशाशी संबंधित समस्या येऊ शकतात. खर्च जास्त राहतील. मुलांना आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. करिअरमध्ये प्रतिकूल परिणाम मिळाल्याने मन निराश होऊ शकते. शक्य असल्यास दर मंगळवारी गहू दान करावे.

वृश्चिक राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. एकामागून एक समस्या येऊ शकतील. निराशेमुळे वैवाहिक जीवनावरही परिणाम होऊ शकेल. कौटुंबिक संबंधात घेतलेले निर्णय चुकीचे सिद्ध होऊ शकतील. समाजात प्रतिमा मलिन होऊ शकते. करिअरच्या बाबतीतही सूर्यग्रहणाचा प्रतिकूल प्रभाव मानला जातो. शक्य असेल तर दर रविवारी गुळाचे दान करावे.

मकर राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. करिअर आणि बिझनेसमध्ये अचानक काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. बॉससोबतचे तुमचे नातेसंबंध प्रभावित होऊ शकतात. ऑफिसमध्ये काम करणे एक ओझे वाटेल. व्यवसाय करणाऱ्या लोकांवर कर्जाचे प्रमाण वाढू शकते. शक्य असल्यासा सूर्याला अर्घ्य द्यावे.

मीन राशीच्या व्यक्तींना सूर्यग्रहणाचा काळ काहीसा संमिश्र ठरू शकेल. कौटुंबिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मित्रांकडून फसवणूक होऊ शकते. करिअरमध्ये कठोर परिश्रम करावे लागतील. मेहनतीनुसार फळ न मिळाल्याने नकारात्मकता येऊ शकेल. व्यावसायिकांचे काम मंदावल्यामुळे भांडवली गुंतवणूक कमी होऊन कठीण काळातून जावे लागू शकेल. दररोज वडिलांचे आशीर्वाद घ्यावे.

वास्तविक पाहता ग्रहण ही खगोलीय घटना आहे. मात्र, ज्योतिषीय दृष्टिकोनातून ग्रहण विशेष मानले जाते. एखाद्या ग्रहणाचे पडसाद राशींसह जगावर पडत असतात, अशी मान्यता आहे. गेल्यावर्षी २०२२ मध्येही एप्रिल महिन्यात सूर्यग्रहण होते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.