शेवटचा मार्गशीर्ष गुरुवार: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, लाभच लाभ; नशिबाची लॉटरी, एकादशी शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 07:07 IST2024-12-25T07:07:07+5:302024-12-25T07:07:07+5:30

सन २०२४ ची शेवटची एकादशी आणि मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवारचा जुळून आलेला अद्भूत शुभ योगाचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या...

डिसेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा विशेष ठरणार आहे. सन २०२४ या वर्षाची सांगता होत आहे. मार्गशीर्ष महिन्यात प्रत्येक गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष व्रतपूजन केले जाते. शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी देवीचे विशेष पूजन, नामस्मरण, स्तोत्र पठण करणे पुण्यदायी मानले गेले आहे.

२६ डिसेंबर २०२४ च्या शेवटच्या मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशीचे व्रताचरण केले जाणार आहे. सन २०२४ मधील ही शेवटची एकादशी आहे. एकादशीला श्रीविष्णूंचे विशेष पूजन केले जाते. दिवसभर उपवास करून श्रीविष्णूंचे नामस्मरण, मंत्र जप, स्तोत्र पठण आवर्जून केले जाते. गुरुवार हा दत्तगुरुंना समर्पित असल्यामुळे या दिवशी दत्तगुरु, दत्तावतारांचे विशेष पूजन लाभदायी मानले गेले आहे.

मार्गशीर्ष गुरुवारी सफला एकादशी असून, हा अत्यंत शुभ, पुण्य फलदायी योग मानला गेला आहे. त्यामुळे एकाच दिवशी लक्ष्मी-नारायणासह दत्तगुरु, स्वामी समर्थ महाराजांचे सर्वोत्तम शुभाशिर्वाद प्राप्त करण्याची सुवर्ण संधी असल्याचे सांगितले जात आहे. मार्गशीर्षातील शेवटचा गुरुवार आणि सुफला एकादशी व्रताचा अद्भूत शुभ योग कोणत्या राशींसाठी संकल्प सुफल तसेच सिद्धीस नेणारा ठरू शकते? कोणत्या राशींवर धनलक्ष्मीचा शुभाशिर्वाद असेल? जाणून घ्या...

मेष: काहींना कामानिमित्त प्रवास करावा लागेल. आहाराचे पथ्य पाळणे आवश्यक आहे. नोकरीत महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. योग्यतेची दखल घेतली जाईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. विरोधकांच्या कारवाया सुरू राहतील. आपण त्यांना जास्त महत्त्व देऊ नका. काहींना अचानक धनलाभ होऊ शकतो. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. परीक्षा देणार असाल तर महत्त्वाची माहिती कळेल.

वृषभ: नोकरीतील कामाचा ताण कमी होईल. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. मुले अपेक्षा पूर्ण करतील. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. काही लोकांकडून अपेक्षाभंग होऊ शकतो. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. भेटवस्तू प्राप्त होतील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील. बाजारपेठेचे अंदाज बरोबर ठरतील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मुलांची प्रगती होईल.

मिथुन: व्यवसायात नाव होईल. सल्ला लोकांना उपयुक्त ठरेल. मुले प्रगती करतील. एखाद्या सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. घरगुती स्वरूपाचे वाद विकोपाला जाणार नाहीत याची काळजी घ्यावी. स्वतःच्या व घरातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आहाराचे पथ्य पाळा. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. एखादे प्रेरणादायी पुस्तक वाचून काढा. उत्तरार्धात महत्त्वाची कामे होतील.

कर्क: सतत व्यस्त राहाल. कामानिमित्त प्रवास घडून येतील. सप्ताहाची सुरुवात संमिश्र घटनांनी होईल. आर्थिक लाभ होतील. मात्र हाती आलेला पैसा खर्च होईल. आर्थिक नियोजन नीट केले नाही तर हाती काही उरणार नाही. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. त्यामुळे मोठी गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. नोकरीत काही अनपेक्षित बदल होऊ शकतात. मुलांच्या यशामुळे आनंद वाटेल. जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. विद्यार्थ्यांना चांगला काळ आहे.

सिंह: पैसा मिळवण्यासाठी बरीच दगदग करावी लागेल. कागदोपत्री पूर्तता करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा. आहाराची पथ्ये पाळा. चांगल्या लोकांच्या संगतीत राहा, व्यवसायात भरभराट होईल. मात्र गुंतवणूक करताना सावध राहा. भावंडांच्या भेटीगाठी होतील. नोकरीत काही बदल होऊ शकतात. जनसंपर्क चांगला राहील. मनावरील दडपण निघून जाईल.

कन्या: मनात काही शंका असतील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. महत्त्वाची कामे होतील. आर्थिक प्राप्तीचे प्रमाण चांगले राहील. पैशाची बचत करण्यावर भर दिला पाहिजे. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. भावंडांशी सख्य राहील. नोकरीत पारडे जड राहील. मात्र सतत व्यस्त राहाल. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल.

तूळ: काही अडचणी असतील. थोडे संयमाने वागल्यास अडचणी दूर होण्यास वेळ लागणार नाही. कायद्याची बंधने पाळण्यात कसूर करू नका. कागदोपत्री पूर्तता करण्यासाठी वेळ द्यावा. चिकाटी सोडता कामा नये. कामे मार्गी लागतील. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. बुध-चंद्र युतीची शुभ फळे मिळतील. आर्थिक बाजू बळकट होईल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील.

वृश्चिक: कार्यक्षेत्रातील कामाचा ताण कमी होईल. गैरसमजाचे वातावरण निवळेल. आर्थिक आवक चांगली राहील. देवाण-घेवाण करताना खबरदारी घ्यावी. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. एखादी व्यक्ती अडचणीत आणण्याचा प्रयत्न करेल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. अधिक सकारात्मक परिणाम दिसून येतील.

धनु: चांगल्या बातम्या कानावर पडतील. नोकरीत थोडे संशयाचे वातावरण राहील. व्यवहारात स्पष्टता ठेवणे आवश्यक आहे. काहींना नवीन जबाबदारी मिळेल. घरात एखाद्या कारणावरून गैरसमज होऊ शकतात. धनलक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न राहील. भेटवस्तू व विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र मैत्रिणींच्या भेटी होतील. त्यांच्याशी बोलून मन मोकळे होईल. आर्थिक बाजू बळकट होईल.

मकर: अडलेली कामे मार्गी लागतील. नोकरीत पारडे जड राहील. कामाचा ताण कमी राहील. इतरांच्या भानगडीत पडू नका. अन्यथा नुकसान होऊ शकते. 'करायला गेलो एक आणि झाले भलतेच' 'असा प्रकार होऊ शकतो. कामावर लक्ष केंद्रित करा. प्रेमात गैरसमज होऊ शकतात. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. व्यवसायात चांगली परिस्थिती राहील.

कुंभ: काही फायदे काही तोटे होतील. अवास्तव अपेक्षा ठेवता कामा नये. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. अनेक अडचणी दूर होतील. नशिबाची साथ मिळेल. काहींना पर्यटनाच्या निमित्ताने फिरणे होईल. सामाजिक कार्यात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा.

मीन: जीवनसाथीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घ्यावी. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा, महत्त्वाच्या कामात अडथळा येऊ शकतो. एखादे लॉटरीचे तिकीट घेऊन पाहण्यास हरकत नाही. भाग्याची चांगली साथ लाभेल. चांगल्या बातम्या कानावर पडतील. त्यामुळे हलके वाटेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.