चातुर्मासातील पहिली आषाढ पौर्णिमा: ९ राशींवर गुरुकृपा, धनलक्ष्मी प्रसन्न; पद-पैसा वाढ, वरदान काळ!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2025 14:20 IST2025-07-09T14:09:05+5:302025-07-09T14:20:42+5:30
Chaturmas First Ashadha Purnima 2025: चातुर्मासातील पहिल्या आषाढ गुरु पौर्णिमेला असलेल्या ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Chaturmas First Ashadha Purnima 2025: गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी आषाढ पौर्णिमा आहे. चातुर्मास सुरू झाल्यानंतरची ही पहिलीच पौर्णिमा आहे. त्यामुळे या पौर्णिमेचे महत्त्व वाढलेले आहे. बुधवार, ०९ जुलै २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०१ वाजून ३६ मिनिटांनी आषाढ पौर्णिमा सुरू होत असून, गुरुवार, १० जुलै २०२५ रोजी उत्तर रात्रौ ०२ वाजून ३६ मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होत आहे.
आषाढ पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. याला व्यास पौर्णिमा असेही म्हटले जाते. गुरुवारी गुरुपौर्णिमा येणे अत्यंत शुभ योग मानला जात आहे. या दिवशी गुरुपूजनाला सर्वाधिक महत्त्व आहे. भारतीय संस्कृती आणि परंपरा यांमध्ये गुरुपौर्णिमा अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमेला जुळून येत असलेल्या ग्रह स्थितीचा काही राशींना अत्युत्तम लाभ होऊ शकतो. नोकरी, व्यवसाय, शिक्षण, कुटुंब, आर्थिक आघाडी या क्षेत्रात भरभराट होऊ शकते, असे म्हटले जात आहे. तुमच्या राशीवर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...
मेष: संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. अनुकूलता बाजूने असली तरी सुरुवातीला थोडे संयमाने वागण्याची गरज आहे. नवीन ओळखी होतील. त्यामुळे कामे मार्गी लागतील. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. इतरांसाठी स्वतःचा जीव आटवू नका. अडचणी दूर होतील. मनात नावीन्यपूर्ण कल्पना विकसित होतील. समाजात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. काहींना मौजमजा करण्याच्या निमित्ताने फिरणे होईल.
वृषभ: काही कटू, तर काही गोड अनुभव येतील. सबुरीने वागण्याची गरज आहे. योजनांच्या बाबतीत थोडी गुप्तता बाळगली पाहिजे. व्यवसायात भरभराट होईल. बोलण्याचा प्रभाव पडेल. कामे होतील. कल्पना सत्यात उतरतील. अष्टम स्थानातून होणाऱ्या चंद्र भ्रमणामुळे काही अडचणी येतील. वाहन हळू चालवा. अचानक धनलाभ होईल.
मिथुन: एखादी इच्छा पूर्ण होईल. मात्र, दगदग, धावपळ करावी लागेल. एखाद्या नवीन माहितीने उत्साह वाढू शकेल. चंद्राचे षष्ठस्थानातून भ्रमण होणार असल्याने या दिवसांत आपणास विरोधी वातावरणाचा अनुभव येईल. अडचणीतून बाहेर याल. अष्टमस्थानातील चंद्र प्लूटो युतीमुळे शुक्रवार, शनिवार अति आत्मविश्वास बाळगू नका.
कर्क: अनेक आघाड्यांवर यश मिळेल. नोकरी, व्यवसाय, घरातील कार्य, खरेदी, मुलांचे यश, परीक्षेत यश, आनंददायी प्रवास आदीबाबतीत मनासाखे फळ मिळेल. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. भेटवस्तू मिळतील. कार्यक्षेत्रात नवीन संधी मिळेल. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. समाजात मान वाढेल. मौजमजा करण्यासाठी प्रवास घडून येईल.
सिंह: प्रगती होईल. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन कामे मिळतील. वेळेचे नीट नियोजन करा. त्यामुळे क्षमतेचा योग्य वापर होईल. प्रगतीला पूरक वातावरण राहील. नोकरीत अनुकूल बदल होतील. एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. वरिष्ठांकडून कामाची प्रशंसा केली जाईल. हातून गेलेली एखादी संधी परत मिळू शकते. मात्र, सकारात्मक विचार करा.
कन्या: नशिबाचा कौल मिळेल. चंद्राचे भ्रमण शुभ फळ देणारे ठरेल. खाण्या-पिण्याची चंगळ राहील. नवीन विशेष पदार्थ खाण्यास मिळतील. धनलक्ष्मीची कृपा राहील. वडिलोपार्जित संपत्ती, व्यवसायातून प्राप्ती होईल. नोकरीत मोठे पद मिळू शकते. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य संधी मिळेल. स्पर्धा परीक्षेत सफलता मिळेल.
तूळ: नवनवीन संधी मिळतील महत्त्वाच्या घटना घडामोडी घडतील. इच्छा आकांक्षा पूर्ण होतील. अनेक अडचणी संपुष्टात येतील. मोठ्या उत्साहाने नवीन प्रकल्प हाती घ्याल. सकारात्मक विचारसरणीमुळे लोकांकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळेल. धनलक्ष्मी प्रसन्न राहील. खाण्यापिण्याची चंगळ राहील. नोकरीत पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक स्थान उंचावेल. जवळच्या प्रवासाचा योग येईल. गुंतवणूक करताना खबरदारी घ्या.
वृश्चिक: अनुकूल ग्रहमानाचा अनुभव येईल. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. लोक मान देतील. जुन्या आठवणींना उजाळा मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. शुक्रवार, शनिवार मोठी आर्थिक गुंतवणूक करताना जाणकार मंडळींचा सल्ला घ्यावा.
धनु: कामे होतील. पैसा मिळेल आणि तो खर्चही होईल. इतरांच्या भानगडीत पडू नका. कामावर लक्ष केंद्रित करा. वाहन जपून चालवा. कुणाला जामीन राहणे शक्यतो टाळा. प्रवासात अनोळखी लोकांपासून सावध राहा. अडचणी दूर होतील. नोकरीतील ताण कमी होईल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. जुन्या गुंतवणुकीचे फायदे होतील.
मकर: ओळखीचा फायदा होईल. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी होईल. सामाजिक कार्य करताना नवीन लोक जोडले जातील. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. कलाकार मंडळींना प्रोत्साहन मिळेल. नोकरीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल सुरू राहील. धनलक्ष्मीची कृपा राहील. विविध प्रकारचे लाभ होतील. मित्र-मैत्रिणींच्या भेटी होतील. लोकांना आश्वासने देऊ नका. कायद्याची बंधने पाळा.
कुंभ: धनलक्ष्मीची कृपा राहील. एखाद्या शुभ वार्तेमुळे मन आनंदून जाईल. सामाजिक मान वाढेल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी व्हाल. नोकरीत नवीन प्रकल्पासाठी नावाचा विचार केला जाईल. सोयी-सुविधा वाढवून मिळतील. नोकरीत पगारवाढ व उच्च पद मिळू शकते. महत्त्वाची कामे सोप्या पद्धतीने पूर्ण होतील. अति आत्मविश्वास बाळगू नका. कायद्याची बंधने पाळा.
मीन: प्रगती होईल. नोकरी, व्यवसाय, पर्यटन, मानसन्मान, धनप्राप्ती आदी अनेक आघाड्यांवर सफलता देणारा हा काळ आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. किरकोळ स्वरूपाच्या अडचणी सुटून जातील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. मौजमजा करण्याच्या निमित्ताने पर्यटन घडेल. नोकरीत उच्च पद मिळू शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.