शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

५ अद्भूत राजयोग: ६ राशींवर दुर्गा कृपा, धनवृद्धी; वैभव सुख प्राप्ती, चैत्र नवरात्र शुभ ठरेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 04, 2024 7:07 AM

1 / 9
०९ एप्रिल २०२४ रोजी मराठी नववर्षाची सुरुवात होत आहे. याच दिवशी पाडवा असून, चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून चैत्र नवरात्र सुरू होणार आहे. मराठी नववर्षात एकूण चार नवरात्र साजरी केली जातात. त्यातील पहिले नवरात्र चैत्र नवरात्र. या गुढीपाडवा तसेच चैत्र नवरात्रात ग्रहांचा अतिशय शुभ आणि अद्भूत असे ५ राजयोग जुळून येत आहेत.
2 / 9
चैत्र नवरात्रारंभाला ५ राजयोगांचा अद्भूत योग जुळून येत आहे. मेष राशीत चंद्र आणि गुरुची युती होऊन गजकेसरी योग जुळून येत आहे. तर मीन राशीत बुध आणि शुक्राचा लक्ष्मी नारायण योग जुळून येत आहे. तर बुध आणि सूर्याचा बुधादित्य राजयोग जुळून येत आहे.
3 / 9
कुंभ राशीत शनीचा शश जुळून येत आहे. तर मीन राशीत शुक्राचा मालव्य राजयोग जुळून येत आहे. दुर्गादेवीच्या कृपेने ६ राशीच्या व्यक्तींना हा आगामी काळ भाग्योदय, धन-धान्य वृद्धी, सुख-समृद्धीचा, पद-पैसा-प्रतिष्ठा वाढीचा ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या लकी राशी? जाणून घ्या...
4 / 9
मेष: या चैत्र नवरात्रीला दुर्गा देवीचा विशेष आशीर्वाद मिळेल. सुखसोयींमध्ये वाढ झालेली दिसेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकेल. कामाच्या ठिकाणी चांगले यश मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. वैवाहिक जीवन चांगले राहील. नशिबाची साथ मिळू शकेल.
5 / 9
वृषभ: चैत्र नवरात्रीला अनेक प्रकारच्या शुभवार्ता मिळू शकतात. विशेषत: दुर्गा देवीचा आशीर्वाद मिळेल. नशिबाची साथ मिळू शकेल. सर्व कामांमध्ये यश मिळेल. नोकरदारांना पदोन्नती आणि पगारात वाढ होऊ शकते. संपत्तीत वाढ होईल आणि व्यवसायात यश मिळण्याची शक्यता आहे.
6 / 9
कर्क: चैत्र नवरात्रीत भाग्य खूप बलवान असेल. चांगली बातमी मिळू शकते, ज्याची अनेक महिन्यांपासून वाट पाहत होता. आर्थिक बाबतीत नशिबाची साथ मिळू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्यांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळू शकते. आर्थिक लाभ आणि सन्मान वाढण्याची शक्यता आहे. परदेशातून व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकेल.
7 / 9
सिंह: दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद असेल. प्रत्येक कामात यश मिळेल. समाजात मान-सन्मान वाढेल. नवीन नोकरीच्या शोधात असलेले लोक यश मिळवू शकतात. प्रदीर्घ प्रलंबित काम पुन्हा एकदा सुरू होऊ शकते. संपत्तीत वाढ होईल. कुटुंबातील दीर्घकाळ चाललेले मतभेद संपुष्टात येऊ शकतात. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर कालावधी चांगला आहे. मोठे प्रोजेक्ट्स किंवा डील होऊ शकतात.
8 / 9
कुंभ: दुर्गा मातेचा विशेष आशीर्वाद असेल. लक्ष्मी देवीसह शनी कृपा करेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ते करू शकता. बरेच फायदे मिळू शकतात. मुलांकडून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येतील. घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कालावधी चांगला आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. बँक बॅलन्स वाढवून बचत करण्यातही यश मिळू शकते. समाजात मान-सन्मान वाढेल.
9 / 9
मीन: चैत्र नवरात्र विद्यार्थ्यांसाठी शुभ ठरणार आहे. अभ्यासावर लक्ष केंद्रित केल्यास शुभ परिणाम मिळू शकतील. कुटुंबात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. नोकरदारांना बढती मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषZodiac Signराशी भविष्यgudhi padwaगुढीपाडवाNavratriनवरात्री