मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 14:55 IST2026-04-09T14:41:20+5:302026-04-09T14:55:48+5:30

Chaitra kalashtami 2026: चैत्र महिन्यातील कालाष्टमीला अनेकविध शुभ योग जुळून येत असून, तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...

Chaitra Kalashtami 2026: शुक्रवार, १० एप्रिल २०२६ रोजी चैत्र महिन्याची कालाष्टमी आहे. या दिवशी मीन राशीत चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. दर महिन्यात येणारी कालाष्टमी तिथी ही महादेवाचा अवतार कालभैरव याला समर्पित असते. देवाधिदेव महादेव यांना आपण भोलेनाथ म्हणतो. शत्रूंच्या संहारासाठी त्यांनी धारण केलेले एक रूप म्हणजे कालभैरव.

कालाष्टमी ही काळभैरवाची जन्मतिथी असल्याने दर महिन्यातल्या वद्य अष्टमीला ती साजरी केली जाते. कालाष्टमी तिथीला जुळून आलेल्या ग्रहस्थितीचा काही राशींना चांगला लाभ होऊ शकतो, असे म्हटले जात आहे.

याच दिवशी नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह मीन राशीत प्रवेश करत आहे. आताच्या घडीला मीन राशीत सूर्य, मंगळ आणि शनि आहे. त्यामुळे बुधादित्य राजयोग, चतुर्ग्रही योग जुळून येत आहे. याचा तुमच्या राशीवर कसा प्रभाव असेल? जाणून घेऊया...

मेष: मान-सन्मान मिळेल. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. सावधपणाचे धोरण ठेवलेले बरे. वाहन हळू चालवणे, लोकांच्या भानगडीत न पडणे, प्रवास शक्यतो टाळणे, अशी काळजी घ्यावी. कालांतराने अनुकूल परिस्थिती राहील. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. एखाद्या समारंभात सहभागी व्हाल. पर्यटन घडेल. नोकरीत मोठी संधी चालून येईल. ओळखीचे फायदे होतील. नातेवाइकांच्या भेटीसाठी होतील. नवीन माहिती कळेल.

वृषभ: मोहात अडकू नका. काही कटू तर काही चांगले अनुभव येतील. आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. त्या दृष्टीने सावध राहावे. बुधवार ते शुक्रवार घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. वाहन जपून चालवा. अचाट साहस करण्याच्या फंदात पडू नका. एखादी चांगली बातमी कळेल, कामाचा ताण कमी होईल. समाजात तुमचे महत्त्व वाढेल.

मिथुन: चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. व्यवसायात भरभराट होईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता येईल. वडीलधाऱ्या मंडळींचा आशीर्वाद मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मात्र, आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्यावी. बाजारपेठेचा अंदाज चुकू शकतो. नोकरीत नवीन संधी मिळेल. उच्च पद, पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे.

कर्क: महत्त्व वाढेल. उत्साह वाढू शकेल. योजना सफल होतील. कार्यक्षेत्रात महत्त्व सर्वांच्या लक्षात येईल. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील. आर्थिक लाभ होतील. घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. महागड्या वस्तू खरेदी कराल. मुलांच्या प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. नोकरीत एखाद्या नवीन जबाबदारीत गुंतलेले राहाल. दगदग होईल, अशी कामे करू नका. एखादी चांगली घटना घडेल. त्यामुळे मन आनंदित होईल.

सिंह: ग्रहमानाची अनुकूलता अनुभवायला मिळेल. व्यवसायात भरभराट होईल. नवनवीन प्रयोग करून पाहिले जातील, नवीन ग्राहक जोडले जातील. नोकरीत अचानक बदल होऊ शकतात. त्यामुळे थोडी दगदग होऊ शकते. मात्र, शांतचित्ताने कामे करीत राहिल्यास परिस्थिती हळूहळू नियंत्रणात येईल. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. मुलांची प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. खाण्यापिण्याचे पथ्य पाळा.

कन्या: विविध आघाड्यांवर तुम्हाला सफलता मिळेल. धनप्राप्ती, व्यवसायात यश, नोकरीत प्रगती इत्यादी दृष्टीने चांगला काळ आहे. उत्साह राहील. जमिनीच्या व्यवहारात फायदा होईल. वडीलधाऱ्या मंडळींकडून आशीर्वाद मिळेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. आर्थिक गुंतवणूक करताना खबरदारी घ्या. नोकरीत अनुकूल वातावरण राहील, पगारवाढ मिळेल. मनासारखे काम मिळेल.

तूळ: मनात आनंदी विचार राहतील. उत्साहात होईल. प्रेमात सफलता, धनप्राप्ती, जवळचा प्रवास, कार्यक्षेत्रातील अनुकूल बदल इत्यादी दृष्टीने अत्यंत चांगला काळ आहे. विवाहेच्छुंसाठी अनुकूल काळ आहे. चांगल्या स्थळांचे प्रस्ताव समोर येतील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. व्यावसायिक उत्कर्ष होईल. भावंडांसमवेत जवळच्या सहलीला जाऊन याल. नोकरीत अनुकूल परिवर्तन होऊ शकते.

वृश्चिक: अडचणी दूर होतील. थोडी दगदगीने होईल. मात्र, परिस्थिती नियंत्रणात येईल. अडचणींचे निराकरण झालेले असेल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. कुणी मोहाच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करील. नवीन ओळखी होतील. वडीलधाऱ्या मंडळींकडून मार्गदर्शन मिळेल. आवडते खाद्यपदार्थ खाण्यास मिळतील, सामाजिक कार्यात अग्रेसर राहाल, किरकोळ कारणावरून भावंडांशी गैरसमज होणार नाहीत, याची काळजी घ्यावी.

धनु: अधिक चांगले यश देणारा काळ ठरू शकेल. मोठ्या योजना आखल्या जातील. त्यात उत्साह राहील, लोकांची आश्वासने मिळतील. मात्र, काही लोक तुमचा अपेक्षाभंग करतील. कुणाच्या प्रभावाखाली येऊन मोठी जबाबदारी घेणे शक्यतो टाळा. अडचणी दूर होतील. अपेक्षित यश मिळेल. जीवनसाथीची चांगली साथ राहील. प्रेमात असणाऱ्यांना भेटवस्तू मिळतील. नोकरीत तुमचे पारडे जड राहील.

मकर: मोठी संधी मिळेल. ठरवलेले प्रत्येक कार्य यशस्वीपणे पूर्ण कराल. ग्रहमानाची साथ राहील. महत्त्वाची कामे आटोपून घ्या. एखादी मोठी संधी चालून येईल. त्याकडे सकारात्मक पद्धतीने बघा. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना योग्य मार्ग मिळेल. घरात एखाद्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाईल. धनलक्ष्मीची कृपा राहील. चंद्र भ्रमणामुळे सावधपणे वागण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा.

कुंभ: नशिबाची साथ मिळेल. मनात उत्साह राहील. कानावर चांगल्या बातम्या पडतील. नवीन माहिती कळेल. सामाजिक मान-सन्मान मिळेल. नावलौकिक वाढवणाऱ्या घटना घडतील. नोकरीत अचानक परिवर्तन होऊ शकते. घरी अनपेक्षित पाहुणे मंडळी येतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहील. मात्र, पैशाला अनेक वाटा फुटतील. खर्चाच्या बाबतीत थोडा संयम बाळगण्याची गरज आहे.

मीन: पगारवाढ मिळेल. विविध आघाड्यांवर यश मिळेल. मात्र, घाईघाईत निर्णय घेऊ नका. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. भाग्याची चांगली साथ राहील, पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. अधिकच अनुकूलता राहील. नोकरीत सोयी-सुविधा वाढवून मिळतील. पगारवाढ मिळण्याची शक्यता आहे. एखादे महत्त्वाचे काम मार्गी लागेल. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.