५ वेळा बुध गोचर, राहु-केतु युती: १० राशींची लॉटरी-प्रमोशन योग; ऐश्वर्य-वैभव वाढ, पैसाच पैसा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:00 IST2025-02-11T11:49:06+5:302025-02-11T12:00:08+5:30
एकाच फेब्रुवारी महिन्यात बुध ५ वेळा राशीपरिवर्तन आणि नक्षत्र गोचर करणार आहे. याचा अनेक राशींना सर्वोत्तम लाभ, बक्कळ नफा, अपार फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.

भारतीय परंपरांमध्ये ज्योतिषशास्त्राला अनन्य साधारण महत्त्व आहे. नवग्रहांमध्ये प्रत्येक ग्रहाचे महत्त्व आणि महात्म्य वेगळे आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, बुध ग्रह नवग्रहांमधील राजकुमार ग्रह म्हणून ओळखला जातो. ग्रह केवळ राशीपरिवर्तन करत नाही, तर नक्षत्र गोचरही करत असतात. वास्तविक नक्षत्र समूहांची मिळून रास तयार होत असते.
नवग्रहांपैकी कोणत्याही ग्रहाचा राशी आणि नक्षत्र गोचरामधील प्रभाव केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर पडत असतो. बुध हा वाणी, बुद्धी, व्यापार यासह अन्य अनेक गोष्टींचा कारक ग्रह आहे. त्यामुळे बुधाचे गोचर विशेष मानले जाते. फेब्रुवारी या एकाच महिन्यात बुध ५ वेळा गोचर करणार आहे. हे नक्षत्र आणि राशी गोचर असणार असून, अनेक ग्रहांची विविध योग जुळून येणार आहेत.
७ फेब्रुवारी २०२५ रोजी बुध ग्रहाने श्रवण नक्षत्रातून धनिष्ठा नक्षत्रात प्रवेश केला आहे. यानंतर ११ फेब्रुवारी रोजी बुध ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत आहे. शनि कुंभ राशीत असल्याने बुध ग्रहाशी युती योग जुळून येत आहे. लगेचच सूर्य ग्रह कुंभ राशीत प्रवेश करत असल्याने सूर्यासोबत बुधादित्य राजयोग तसेच त्रिग्रही योग जुळून येत आहे. यानंतर बुध १५ फेब्रुवारी रोजी शततारका नक्षत्रात प्रवेश करणार आहे.
२२ फेब्रुवारी २०२५ रोजी बुध ग्रह गुरुचे स्वामित्व असलेल्या पूर्वा भाद्रपदा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. २४ फेब्रुवारी रोजी बुध उदय होणार आहे. तर २७ फेब्रुवारी रोजी बुध कुंभ राशीतून मीन राशीत प्रवेश करणार आहे. मीन राशीत असलेल्या राहुशी बुध ग्रहाचा युती योग जुळून येईल. तसेच कन्या राशीत असलेल्या केतुशी समसप्तक योग जुळून येत आहे. बुधाच्या या गोचराचा १० राशींना सर्वोत्तम लाभ, बक्कळ नफा, अपार फायदा मिळू शकतो, असे सांगितले जात आहे.
मेष: उत्पन्नात वाढ दिसून येईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. व्यवसायात फायदा होऊ शकेल. विचारपूर्वक पैसे गुंतवल्याने फायदा होईल. या काळात शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये नफा मिळू शकतो. उत्पन्नाच्या नवीन स्रोतांमधून पैसे कमविण्यात यशस्वी व्हाल. नोकरी करणाऱ्यांना परदेश प्रवासाची संधी मिळू शकते.
वृषभ: फायदेशीर ठरू शकते. या काळात कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण राहू शकेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कारकिर्दीत प्रगतीच्या संधी मिळू शकतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य ठरू शकेल. यावेळी, उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. एक मोठा व्यवसाय करार होऊ शकतो.
मिथुन: काम, व्यवसायात विशेष प्रगती दिसून येईल. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. परदेश प्रवासाची संधी मिळू शकते. व्यावसायिकांसाठी फायदेशीर राहील. बेरोजगारांना नवीन नोकरीच्या संधी मिळू शकतात. या काळात भाग्याची भक्कम साथ लाभू शकते. सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते.
सिंह: फायदेशीर ठरू शकते. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन अद्भुत असेल. तसेच, प्रेमविवाह करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. कामाच्या ठिकाणी चांगली बातमी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे. नियोजित योजना यशस्वी होतील.
कन्या: आर्थिक परिस्थिती अनुकूल राहू शकेल. उत्पन्नात वाढ दिसून येऊ शकेल. कमाईचे अनेक स्रोत उघडू शकतात. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळू शकते. या काळात गुंतवणूक केल्यास चांगले परतावे मिळू शकतात. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. व्यवसायात बनवलेली रणनीती यशस्वी ठरू शकते. फायदा होऊ शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने पैसे वाचवण्यात यशस्वी होऊ शकता.
तूळ: दीर्घकालीन आजार दूर होऊ शकतात. यासोबतच, या राशीच्या लोकांना व्यवसायात मोठा नफा मिळू शकतो. पूर्वी केलेली गुंतवणूक आता चांगला नफा देऊ शकते. पैशाचा ओघ अचानक वाढू शकतो. कामातील प्रत्येक अडथळा दूर होऊ शकतो.
वृश्चिक: अनेकविध क्षेत्रात अपार यश मिळू शकते. कुटुंबात सुरू असलेल्या समस्या संपू शकतात. उत्पन्नाचे अनेक स्रोत उघडू शकतात. यासोबतच आर्थिक परिस्थिती चांगली राहण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहू शकेल. मानसिक ताण-तणावापासून मुक्तता मिळू शकते.
मकर: धैर्य आणि शौर्य वाढू शकेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. गुंतवणुकीतून चांगला नफा होऊ शकेल. आर्थिक स्थितीही मजबूत होण्याची शक्यता आहे. इच्छा पूर्ण होतील. भावंडांकडून पाठिंबा मिळू शकेल. कामाच्या ठिकाणी प्रयत्नांचे कौतुक होईल. व्यवसायात अनपेक्षित नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ: मानसिक ताणतणावापासून आराम मिळू शकतो. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या समस्या संपुष्टात येऊ शकतात. नोकरी करणाऱ्यांना हा काळ फायदेशीर ठरू शकतो. पदोन्नती मिळू शकते. आत्मविश्वासात वाढ होऊ शकेल. कुटुंबासोबत वेळ चांगला जाईल. करिअरच्या क्षेत्रात फायदे मिळू शकतात. प्रगतीसह अनेक नवीन संधी मिळू शकतात.
मीन: या काळात आत्मविश्वास वाढलेला दिसेल. लोकप्रिय व्हाल. आदर आणि प्रतिष्ठा मिळेल. भागीदारीच्या कामातून फायदा होऊ शकेल. या काळात करिअरमध्ये प्रगती करण्याच्या संधी मिळतील. गुंतवणुकीसाठी हा काळ योग्य ठरू शकेल. संपत्ती, प्रसिद्धी आणि यशाच्या संधी मिळू शकतात.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.