Astrology Tips: नोकरी-व्यवसायात पदोन्नती हवी आहे? आजच करा 'हे' पाच उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2023 10:22 IST2023-04-27T10:19:18+5:302023-04-27T10:22:45+5:30
Astrology Tips:एप्रिल संपत आला आहे. नोकरदार लोक त्यांच्या पदोन्नतीची, पगारवाढीच्या पत्राची आतुरतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकाला चांगल्या वेतनवाढीसोबत प्रमोशन मिळावे असे वाटते. त्यात मुलांचा वाढता शैक्षणिक खर्च, प्रापंचिक जबाबदाऱ्या, लग्न कार्य या सगळ्याच्या तुलनेत पगार तुटपुंजा वाटू लागतो. त्यामुळे दरवर्षी मिळणारी पगारवाढ, पदोन्नती हे नोकरदारांसाठी आशेचे किरण असते तर व्यावसायिकांसाठी हा कालावधी म्हणजे व्यवसाय वाढीची संधी! मात्र, सर्वांचीच अपेक्षापूर्ती होते असे नाही. त्याला ग्रहमानही जबाबदार असू शकते. कुंडलीतील काही दोषांमुळे प्रगतीचा मार्ग बंद होतो. तो खुला करण्यासाठी दिलेले उपाय करा आणि यशाचे स्वागत करा.

शनि मंदिरात जाऊन दिवा लावावा
नोकरीत इन्क्रिमेंट-प्रमोशन मिळवण्यासाठी दर शनिवारी शनि मंदिरात जाऊन दिवा लावावा. तसेच शनी मंदिरात बसून शनि मंत्राचा जप करावा. असे केल्याने शनिदेवाचा अशुभ प्रभाव कमी होतो आणि यात सातत्य ठेवल्याने त्यांचे पाठबळ लाभते.
रोज सूर्याला अर्घ्य द्यावे
नोकरीत वाढ आणि बढतीसाठी रोज सकाळी सूर्योदयाआधी उठून सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तसेच सूर्य मंत्र आणि गायत्री मंत्राचा जप करावा. या उपायाने कुंडलीतील रवी प्रबळ होतो आणि जीवनात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो.
राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय
नोकरीत बढतीसाठी शनी मंदिरात जाऊन नवग्रह अभिषेक करावा. असे केल्याने राहू-केतूच्या दोषांपासून मुक्ती मिळते. यासोबतच कुंडलीतील दोषही दूर होतात. तसेच दररोज सायंकाळी नवग्रह स्तोत्राचे पठण करावे.
दहाव्या घरातील स्वामींच्या मंत्रांचा जप करावा
नोकरीमध्ये यशस्वी होण्यासाठी व्यक्तीने ज्योतिषांच्या मार्गदर्शनाने आपल्या जन्मपत्रिकेतील दहाव्या घरातील स्वामीच्या मंत्रांचा जप करावा. या उपायाने प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे दूर होऊ लागतात. जसे की रवी असेल तर सूर्यमंत्र, गुरु असेल तर दत्तमंत्र... इ.
व्यवसाय वाढीसाठी टिप्स
व्यवसाय करणार्या लोकांनी चांगला नफा मिळविण्यासाठी त्यांच्या कामाच्या ठिकाणी व्यापार वृद्धी यंत्र स्थापित केले पाहिजे. असे केल्याने तोटा संपतो आणि नफा सुरू होतो. तसेच श्रीयंत्राचा वापरही त्यांना व्यापारात भरघोस यश देतो!