Astrology Tips: सगळ्यांची लग्नं होतातेत, पण तुमचंच अडलंय? जाणून घ्या ज्योतिष शास्त्राने सांगितलेले तोडगे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2022 15:45 IST2022-12-26T15:38:11+5:302022-12-26T15:45:29+5:30

Astrology tips for Marriage: सध्या सगळीकडे लग्नाचा मौसम सुरु आहे. सोशल मीडिया पाहावं तर तिथेही लग्नाचे फोटो. मात्र लग्नाळू असूनही तुमचे लग्न जुळत नसल्याने वाईट वाटणे स्वाभाविक आहे. मात्र लग्नाच्या बाजारात वाढत्या अपेक्षांना तुम्ही अपुरे पडत असाल तर ज्योतिष शास्त्राने दिलेले तोडगे वापरून पहा.

काही वेळा कुंडलीतील दोषामुळे विवाह होत नाही किंवा विलंब होतो. एकतर लग्नासाठी चांगलं स्थळ मिळत नाही किंवा कधी कधी काही कारणाने लग्न ठरता ठरता तुटतं. अशा परिस्थितीत हा दोष दूर करण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय दिले आहेत. ते जाणून घेऊ.

वैवाहिक सुखाबाबतीत तुमच्या नशिबाचे टाळे उघडत नसेल तर ज्योतिष शास्त्र सांगते की झोपताना उशाशी लोखंडी टाळे अर्थात कुलूप ठेवून झोपा. लोखंडी वस्तू नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. सकारात्मक ऊर्जा देते. २१ दिवस हा प्रयोग सातत्याने करा, जेणेकरून तुमचे भाग्याचे टाळे उघडेल.

वय वाढत चालले आणि लग्नाला उशीर होत आहे असे वाटत असेल तर दररोज आंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद घाला. हळद गुणकारी आहे हे आपल्याला माहीत आहेच, ती ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीनेही भाग्यकारक आहे. या उपायाने

हिंदू धर्मात गायीला विशेष महत्त्व आहे. तिला मातृरूप दिले असून तेहेतीस कोटी देव तिच्या ठायी आहेत अशी श्रद्धा आहे. त्यामुळे आपल्या प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून गोमातेची सेवा करा. हरभरा डाळ, गूळ, गव्हाचे पीठ आणि हळद एकत्र करून तयार केलेले पीठ गुरुवारी गायीला खाऊ घाला. या उपायाने लाभ होतो.

अनेकदा आपली मानसिकता सकारात्मक घडण्यासाठी सकारात्मक गोष्टींचा वापर करावा लागतो. ती सकारात्मक ऊर्जा नशिबाचे फासे पालटायला हातभार लावते. यासाठी एक उपाय म्हणजे सुगंधी द्रव्यांचा. विवाह, प्रेम, सहवास या गोष्टी मिळाव्यात यासाठी सुंगधी द्रव्यांचा वापर सुरु करा. त्याचा सकारात्मक परिणाम दिसू लागेल.

लग्न घरात जाऊन मदत केल्याने लग्न लवकर जुळते, असे आपल्याकडे पूर्वापार ऐकिवात आहे. यानिमित्ताने तुम्ही चार चौघांच्या नजरेत येऊन तुम्हाला उचित स्थळ मिळायला मदत होणे हा त्यामागचा हेतू असू शकेल.