Astrology: गजकेसरी आणि रूचक राजयोग! २५ नोव्हेंबर रोजी 'या' ५ राशींचे भाग्य चमकणार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2025 11:43 IST2025-11-25T11:39:45+5:302025-11-25T11:43:45+5:30

Astrology: २५ नोव्हेंबर २०२५, मंगळवार हा दिवस ज्योतिषीय दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष फलदायी असणार आहे. या दिवशी, ग्रह स्वामी मंगळ देवाचे अधिपत्य असून, तिथी मार्गशीर्ष शुक्ल पक्ष पंचमी म्हणजेच विवाह पंचमी आहे, शिवाय दोन अत्यंत शुभ राजयोग जुळून येत आहेत, ज्याचा लाभ ५ राशींना होणार आहे.

या दिवशी विशेषतः दोन अत्यंत शुभ राजयोग तयार होत आहेत: पहिला म्हणजे गजकेसरी योग, जो चंद्र (मकर राशीत) आणि गुरू यांच्या सप्तम दृष्टीमुळे बनत आहे; आणि दुसरा म्हणजे रूचक राजयोग, कारण मंगळ ग्रह आपल्या स्वराशीत उच्च स्थानी विराजमान आहे. यासोबतच, उत्तराषाढा नक्षत्र देखील कार्यरत राहील. ग्रहांच्या या अद्भुत आणि बलवान स्थितीमुळे तयार झालेल्या शुभ योगांच्या प्रभावामुळे पाच राशीच्या लोकांसाठी हा दिवस अत्यंत भाग्यशाली ठरणार आहे, ज्यांना प्रभू श्रीराम आणि मंगळ देवाच्या कृपेने मोठे लाभ मिळतील.

वृषभ : वृषभ राशीच्या लोकांसाठी २५ नोव्हेंबर २०२५ हा दिवस अत्यंत मंगलमय असणार आहे. करिअरमध्ये प्रगतीची संधी मिळेल आणि व्यवसाय करणाऱ्यांच्या कमाईत आनंददायक वाढ होईल. आर्थिक बाजू भक्कम राहील आणि ग्रहांच्या पाठबळाने अचानक मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलांचे मार्गदर्शन आणि सहकार्य मिळेल, ज्यामुळे तुमचा प्रभाव आणि सन्मान वाढेल. एखादी मोठी इच्छा पूर्ण झाल्याने तुम्हाला आनंद होईल. या शुभ दिवसाचा पुरेपूर लाभ घेण्यासाठी, वृषभ राशीच्या लोकांनी रामरक्षा स्तोत्र पठण करणे लाभदायक ठरेल.

मिथुन : मिथुन राशीच्या जातकांसाठी हा दिवस बुद्धी आणि धैर्याच्या जोरावर यश मिळवून देणारा राहील. समोर काही नवी आव्हाने आली तरी तुम्ही परिस्थिती उत्तम प्रकारे सांभाळण्यात यशस्वी व्हाल. नोकरीत तुमचा दिवस चांगला जाईल. तुम्ही व्यवस्थापन आणि टीम वर्कच्या मदतीने परिस्थिती अनुकूल ठेवाल. जे लोक कर्ज (Loan) मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना यश मिळेल. तसेच, तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम जर बऱ्याच काळापासून अडकले असेल, तर ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. परदेशी (Foreign) क्षेत्राशी संबंधित कामातूनही लाभ मिळू शकतो. आज हनुमान चालिसा म्हणावी आणि मारुती मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

कर्क : कर्क राशीच्या लोकांसाठी २५ नोव्हेंबरचा दिवस शिक्षण आणि स्पर्धांमध्ये यश मिळवून देणारा आहे. शिक्षण क्षेत्राशी जोडलेल्या लोकांसाठी हा दिवस विशेष अनुकूल राहील. करिअरमध्ये भाग्य तुम्हाला प्रगतीची संधी देईल. नोकरीमध्ये वरिष्ठ अधिकारी वर्गाकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळेल. तुम्ही एखाद्याला दिलेले धन (पैसे) तुम्हाला परत मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक किंवा शुभ कार्यात भाग घेण्याची संधी मिळेल. राजकारण आणि समाजकार्याशी जोडलेल्या लोकांना मोठी उपलब्धी मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी श्रीराम रक्षा स्तोत्र म्हणावे आणि रामसीतेची उपासना करावी.

तूळ : तूळ राशीच्या जातकांसाठी मंगळवारचा हा दिवस करिअर आणि धनसंपत्तीमध्ये वृद्धी करणारा ठरेल. व्यवसायात उत्पन्नाची चांगली संधी मिळेल. जे लोक अकाउंट्स किंवा प्रॉपर्टीच्या कामाशी संबंधित आहेत, त्यांच्या कमाईत वाढ होईल. तुम्हाला काही नवीन संपर्क (Contacts) मिळतील, ज्यामुळे व्यवसायात फायदा होईल. कुटुंबाकडून आनंददायक बातमी मिळू शकते आणि वैवाहिक जीवनात प्रेम व ताळमेळ राहील. तुमचे पैसे कुठे अडकले असतील, तर प्रयत्न केल्यास ते परत मिळण्याची शक्यता आहे. सुख-सुविधांच्या साधनांची प्राप्ती होईल. तूळ राशीच्या लोकांनी हा दिवस अनुकूल बनवण्यासाठी सुंदरकांड चा पाठ करावा आणि हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे.

मकर : मकर राशीच्या जातकांसाठी हा दिवस सुखद आणि लाभदायक राहील. करिअरमध्ये भाग्य तुम्हाला मोठ्या कमाईची आणि प्रगतीची संधी देईल. जे लोक नोकरीत बदल करण्याचा विचार करत आहेत, त्यांना सकारात्मक बातमी मिळेल. तुम्ही एखादे नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करू शकता. शिक्षण क्षेत्रात मकर राशीचे लोक उत्कृष्ट प्रदर्शन करतील. सरकारी क्षेत्रातील कामांमध्ये यश मिळेल आणि पित्याकडूनही सहकार्य प्राप्त होईल. व्यवसायात भागीदारीतून फायदा होईल. मकर राशीच्या लोकांनी या दिवशी गरजू व्यक्तीला अन्नदान करावे आणि हनुमान चालीसा म्हणावी.