अक्षय्य तृतीया: ७ राशींवर लक्ष्मीकृपा, धनलाभ योग; वैभव-समृद्धीत वाढ, गजकेसरी योग शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 10:44 AM2024-04-19T10:44:18+5:302024-04-19T10:52:52+5:30

यंदाचा अक्षय्य तृतीयेचा सणाला अनेक शुभ योग जुळून येत असून, काही राशींना अतिशय लाभदायक ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

मराठी नववर्ष सुरू झाले असून, मे महिन्यात अक्षय्य तृतीयेचा सण आहे. सन २०२४ मध्ये १० मे रोजी अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. हा सण उन्हाळ्यात येत असल्यामुळे या दिवशी पाण्याचा घडा तसेच उन्हासाठी छत्री, पायांत घालावयाचे जोडे दान करण्याची प्रथा आहे. या दिवशी जलकुंभ दान केल्यास महापुण्य लाभते, असे विष्णूपुराणात म्हटले आहे. सूर्यवंशातील भगीरथ राजाने या दिवशी पृथ्वीवर भागीरथी म्हणजे गंगा आणली अशी कथा आहे.

यंदाच्या अक्षय्य तृतीयेला अतिशय शुभ योग जुळून येत आहेत. अक्षय्य तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा गजकेसरी योग जुळून येत आहे. मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रादित्य योगही तयार होतो. मूलत्रिकोणी राशीतील शनीचा शश नामक राजयोग आहे. मीन राशीत मंगळ आणि बुध यांचा धन योग तयार होतो. या दिवशी रवि योगही असेल.

या सर्व शुभ योगातील अक्षय्य तृतीयेचा हा सण अनेक राशींसाठी अतिशय चांगला ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. लक्ष्मी देवीची कृपा लाभू शकेल. सुख-समृद्धी, पद-पैसा मिळू शकेल, असे सांगितले जात आहे. कोणत्या आहेत त्या भाग्यवान आणि लकी ७ राशी? जाणून घेऊया...

मेष: अक्षय्य तृतीयेला जुळून असलेल्या शुभ योग सकारात्मक ठरू शकतात. जे काही काम हाती घेतील त्यात यश मिळेल. प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेली कामेही पूर्ण होतील. कौटुंबिक संबंधात समस्या होत्या, त्याही संपतील. मालमत्ता खरेदी करू शकाल.

वृषभ: अक्षय्य तृतीयेला जुळून असलेल्या शुभ योग शुभ फलदायी ठरू शकेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. लक्ष्मी देवीची कृपा राहील. नशिबाची साथ मिळेल. नोकरी, करिअर आणि व्यवसायात नवीन संधी मिळतील. पैशामुळे अडलेली कामे मार्गी लागू शकतील. गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल. व्यवसाय चांगला होऊ शकेल.

मिथुन: अक्षय्य तृतीयेला जुळून असलेल्या शुभ योगांमुळे यश, प्रगतीची संधी मिळू शकेल. भौतिक सुख-सुविधांचा लाभ घेता येऊ शकेल. संपत्ती वाढेल. कुटुंबातील सदस्यांच्या गरजा अगदी सहजपणे पूर्ण करू शकाल. कठोर परिश्रमानंतर यश प्राप्त होऊ शकेल. स्पर्धा परीक्षांमध्ये अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ लाभेल.

कर्क: अक्षय्य तृतीयेचे शुभ योगांमुळे उत्पन्नात वाढ होऊ शकेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसू शकेल. नवीन काम करण्याचा विचार करत आहेत, ते सुरू करू शकतात. भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल.

तूळ: जीवनात समृद्धी आणि शांती वाढू शकेल. एकापेक्षा जास्त स्त्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची संधी मिळू शकेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. नोकरीत बढती मिळण्याची शक्यता आहे. पगारात वाढ होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसह छान सहलीला जाऊ शकता.

धनु: चांगला काळ सुरू होऊ शकेल. व्यापारी भरपूर नफा कमावू शकतील.पैसेही वाचवू शकाल. आनंद वाढेल. ऑफिसमध्ये प्रत्येक प्रकारे अनुकूल वातावरण मिळेल. प्रत्येक बाबतीत हुशारीने वागावे लागेल. करिअरमध्ये चांगली बातमी मिळेल. काही उत्तम ऑफर मिळू शकतात. प्रलंबित पैसे मिळू शकतात.

मीन: अक्षय्य तृतीयेला जुळून असलेले शुभ योग यशकारक ठरू शकतील. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी सर्व परिस्थिती अनुकूल असेल. एकामागून एक यश मिळेल. ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशीही चांगले संबंध राहतील. जे काही ध्येय ठेवले आहे त्यात यश मिळेल. अचानक आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.