मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:39 IST2025-05-02T09:27:04+5:302025-05-02T09:39:33+5:30
मे महिन्यात कोणते सहा ग्रह गोचर करणार आहेत आणि कोणत्या सहा राशींना त्याचा लाभ होऊ शकतो? जाणून घ्या...

मे महिन्यात तब्बल ६ ग्रहांचे राशीपरिवर्तन असून, बुध ग्रह एकाच महिन्यात दोनवेळा राशी परिवर्तन करणार आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला बुध मेष राशीत, महिन्याच्या उत्तरार्धात बुध ग्रह वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. सूर्य वृषभ राशीत गोचर करणार असून, वृषभ संक्रांती सुरू होणार आहे. तसेच शुक्र ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे.
सर्वांत विशेष म्हणजे गुरु आणि राहु-केतु हे ग्रह गोचर करणार आहे. गुरु ग्रह एका राशीत सुमारे वर्षभर असतो. परंतु, मे महिन्यानंतर गुरु वृषभ राशीतून मेष राशीत प्रवेश करणार आहे. यानंतर गुरु ग्रह अतिचार गतीने राशी गोचर करणार आहे. तसेच राहु-केतु सुमारे दीड वर्ष एका राशीत असतात. विद्यमान स्थितीत राहु-केतु अनुक्रमे मीन आणि कन्या राशीत असून, मे महिन्यात राहु-केतु अनुक्रमे कुंभ आणि सिंह राशीत प्रवेश करतील.
मे महिन्यात होणाऱ्या ग्रह गोचरांचा अनेक राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार असल्याचे म्हटले जात आहे. केवळ राशींवर नाही, तर देश-दुनियेवर या ग्रह गोचरांचा प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. कोणत्या राशींना कुटुंब, करिअर, व्यापार, व्यवसाय, शिक्षण, आर्थिक आघाडीवर लाभ मिळू शकतात? जाणून घेऊया...
वृषभ: आगामी काळ फायदेशीर, लाभदायी ठरू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. मानसिक शक्ती आणि निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये चांगले निकाल मिळतील. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. व्यावसायिकांना कर्जाचे पैसे मिळू शकतात.
कर्क: मे महिना अनुकूल ठरू शकतो. उत्पन्न आणि लाभाच्या संधी वाढू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात सुखसोयींवर खूप पैसे खर्च करू शकता. जर गुंतवणूक करणार असाल तर या काळात नफा मिळू शकेल. इच्छा पूर्ण होतील. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल.
कन्या: चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कामात आणि व्यवसायात विशेष प्रगती मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता असेल. व्यवसायात नफा होऊ शकतो. घरात सुख आणि शांती राहील. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता.
तूळ: मे महिना सकारात्मक ठरू शकतो. कुटुंबात काही चांगली बातमी मिळू शकते. व्यावसायिकांना चांगला आर्थिक फायदा मिळू शकतो. व्यवसाय वाढू शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना यावेळी पदोन्नती मिळू शकते. गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. देशात आणि परदेशात प्रवास करू शकता.
मकर: मे महिन्याचा कालावधी फायदेशीर ठरू शकतो. आर्थिक लाभ आणि प्रगतीच्या संधी मिळतील. वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांनाही पदोन्नती आणि वेतनवाढ मिळू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. ज्युनियर आणि सीनियर एकमेकांना सहकार्य करू शकतात. मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते.
मीन: आगामी काळ फायदेशीर ठरू शकतो. भौतिक सुखे मिळू शकतात. वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळेल. आईशी असलेले नाते चांगले होऊ शकेल. विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या लोकांसाठी हा काळ अनुकूल आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून फायदा होण्याची शक्यता आहे आणि कौटुंबिक वाद मिटू शकतात. नोकरी आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.