५ राजयोग, अशुभ योगाची सांगता: ९ राशींना सुबत्ता, सुख-समृद्धी; महादेवांची अपार कृपा, शुभ काळ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:55 IST2025-07-11T18:42:46+5:302025-07-11T18:55:24+5:30

जुलैमध्ये अनेक राजयोग जुळून येत असून, याचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

जुलै महिन्यात अनेक शुभ योग, राजयोग जुळून येत आहेत. तसेच बरेच दिवस सुरू असलेल्या एका अशुभ योगाची सांगता होणार आहे. आताच्या घडीला सूर्य आणि गुरु यांच्या युतीने गुरु आदित्य राजयोग जुळून आलेला आहे. याच महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीत असलेल्या बुध ग्रहाशी सूर्याची युती होऊन बुधादित्य राजयोग जुळून येणार आहे.

शुक्र ग्रह स्वराशीत म्हणजेच वृषभ राशीत आहेत. यामुळे मालव्य राजयोग जुळून येत आहे. तसेच चंद्र आणि मंगळ यांच्या युतीने धनयोग जुळून येणार आहे. तसेच शुक्र ग्रह मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे गुरू आणि शुक्राचा गजलक्ष्मी योग राजयोग जुळून येत आहे.

शनि आणि मंगळ, केतु यांचा षडाष्टक योग जुळून आलेला आहे. जुलै महिन्यात या योगांची सांगता होणार आहे. त्यामुळे राशींवरील आणि देश-दुनियेवर प्रतिकूल अशुभ प्रभाव समाप्त होणार आहे. ५ राजयोगांचा शुभ प्रभाव कोणत्या राशींवर पडू शकेल? जाणून घेऊया...

वृषभ: वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ होतील. संगीत आणि सर्जनशील कार्यात आवड वाढू शकते. कामगिरीबाबत कौतुक होऊ शकते. घरी एखाद्या शुभ कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. व्यावसायिकांना कर्ज मिळू शकते.

मिथुन: धन संपत्ती आणि मालमत्तेचा फायदा होऊ शकतो. नवीन घर किंवा वाहन खरेदी करू शकता. समाजात प्रतिष्ठा वाढू शकेल. समाजात उच्च स्थान आणि आदर मिळू शकेल. कारकिर्दीत अनेक संधी मिळतील. प्रतिमा उंचावेल. अधिकारी कामगिरीचे कौतुक करू शकतील.

कर्क: करिअर, शिक्षण, वैवाहिक जीवनात शुभ परिणाम मिळू शकतील. ज्ञान वाढेल. करिअरमध्ये नवीन गोष्टी शिकायला मिळतील. ज्याचे फायदे मिळू शकतील. जोडीदारासोबतचे नाते पूर्वीपेक्षा अधिक गोड होऊ शकेल. धाडसी निर्णय घेऊ शकाल.

सिंह: भौतिक सुखाचा लाभ घेऊ शकाल. उत्पन्न वाढू शकते. गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. दीर्घकालीन योजना राबवण्यासाठी आणि सामाजिक प्रभाव वाढवण्यासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. व्यापारी मोठे व्यवसाय करार करू शकतात. जे भविष्यात फायदेशीर ठरू शकतील. मुलांशी संबंधित चांगली बातमी मिळू शकते.

कन्या: काम आणि व्यवसायात चांगले यश मिळू शकते. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. मित्र किंवा सहकाऱ्यांकडून पाठिंबा मिळेल. उत्पन्नाच्या नवीन संधी येऊ शकतात. योग्य भूमिका बजावण्यासाठी हा काळ उत्तम आहे. व्यावसायिकांना चांगले आर्थिक फायदे मिळू शकतात.

वृश्चिक: अचानक आर्थिक लाभासह व्यवसायात नफा मिळू शकतो. वैवाहिक जीवनात आनंद राहू शकेल. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या काळात फायदे मिळू शकतात. परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. परदेशातून पैसे मिळू शकतात. सोशल मीडियाद्वारे जोडलेल्या व्यवसायात भरपूर नफा होऊ शकतो.

धनु: कारकिर्दीत यश मिळेल. नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. अधिकाऱ्यांशी संबंध सुधारू शकतील. पालकांचा पाठिंबा काहीतरी नवीन करण्याची प्रेरणा देऊ शकेल. यश, प्रगती प्राप्त करता येऊ शकेल.

मकर: कष्टाचे फळ मिळू शकते. कुटुंब आणि भावंडांकडून सहकार्य मिळू शकते. परदेश प्रवासाचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसायासाठी परदेशात जाण्याची संधी मिळू शकते. सोशल मीडिया किंवा ऑनलाइन व्यवसायाद्वारे नफा कमवू शकता. परदेशातून नवीन संधी मिळू शकतात. अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. अडकलेले पैसे मिळू शकतात. सासरच्या लोकांकडूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे.

मीन: निर्णय घेण्याची क्षमता, आत्मविश्वास वाढू शकेल. केलेल्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकेल. रिअल इस्टेटशी संबंधित कामांमध्ये यश मिळू शकते. व्यवसायात भरपूर नफा मिळण्याची शक्यता आहे. नवीन व्यावसायिक भागीदार मिळू शकतो. परदेश प्रवासाची शक्यता निर्माण होते. अध्यात्माकडे अधिक कल असेल. दानातून विशेष लाभ मिळू शकतो.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.