४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 07:07 IST2025-08-22T07:07:07+5:302025-08-22T07:07:07+5:30
सप्टेंबर महिन्यात कोणते ग्रह गोचर करणार आहेत? कोणत्या राशींवर कसा प्रभाव पडू शकेल? जाणून घ्या...

सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवाची सांगता होणार आहे. तसेच पितृपक्ष पंधरवडा असणार आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात घटस्थापना होऊन नवरात्र साजरे केले जाणार आहे. धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या सप्टेंबर महिना महत्त्वाचा मानला गेला असून, ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीनेही सप्टेंबर महिना विशेष मानला गेला आहे.
नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह १३ सप्टेंबर २०२५ रोजी तूळ राशीत प्रवेश करत आहे. तर, शुक्र ग्रह १४ सप्टेंबर २०२५ रोजी सिंह राशीत प्रवेश करणार आहे. नवग्रहांचा राजकुमार मानला गेलेला बुध ग्रह १५ सप्टेंबर २०२५ रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे.
यानंतर लगेचच नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य ग्रह १६ सप्टेंबर २०२५ रोजी कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या ४ ग्रहांच्या गोचराने काही राजयोग, शुभ योग जुळून येत आहेत. या एकूणच ग्रहस्थितीचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? जाणून घ्या...
मेष: सप्टेंबर महिना खूप खास असणार आहे. बऱ्याच काळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. या राशीच्या लोकांचे धैर्य आणि आत्मविश्वास वेगाने वाढू शकतो. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकता. समाजात आदर वाढू शकतो. नोकरी आणि व्यवसायात अनेक फायदे मिळू शकतात.
मिथुन: खूप फायदे मिळू शकतात. भौतिक सुखांमध्ये वाढ होण्यासोबतच मान-सन्मानात वाढू शकतो. शिक्षण क्षेत्रात खूप फायदे होऊ शकतात. वाहन, घर, जमीन इत्यादी खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नफा मिळू शकतात.
कर्क: सप्टेंबर महिन्याचा अनेक क्षेत्रांमध्ये सकारात्मक परिणाम होऊ शकतो. भाग्याची, नशिबाची साथ मिळू शकते. यासोबतच बुधादित्य राजयोगाची निर्मिती या राशीच्या लोकांना अनेक क्षेत्रांमध्ये भरपूर लाभ देऊ शकते. राजकारणाशी संबंधित लोकांना विशेष लाभ मिळू शकतात.
सिंह: या काळात या राशीवर सर्वात जास्त परिणाम होईल. शुभ परिणाम मिळू शकतात. मन आनंदी राहू शकेल. मान-सन्मान, आदर वाढू शकतो. जोडीदारासोबत वेळ घालवण्याची संधी मिळू शकेल.
कन्या: अनपेक्षितपणे पैसे मिळतील. व्यावसायिकांना अडकलेले पैसे मिळतील. या काळात आर्थिक स्थिती सुधारेल. ज्या लोकांचा स्वतःचा व्यवसाय आहे, त्यांच्या नफ्यात वाढ होऊ शकेल. घरात सुख आणि समृद्धी येईल. व्यावसायिक सौदे आणि वाटाघाटींमध्ये यश मिळेल. मार्केटिंग, संवाद, बँकिंग आणि मीडियाशी संबंधित काम किंवा व्यवसाय असेल तर तुम्हाला फायदा होऊ शकतो.
तूळ: मंगळ गोचर सकारात्मक ठरू शकतो. व्यक्तिमत्व सुधारेल. धैर्य आणि शौर्य वाढेल. नोकरीत पदोन्नती किंवा नवीन प्रकल्प मिळू शकेल. घरात सकारात्मक ऊर्जा वाढू शकेल. नातेसंबंध सुधारतील. विद्यार्थ्यांना येणाऱ्या काळात एखाद्या प्रभावशाली व्यक्तीचा पाठिंबा मिळेल, जो करिअरला योग्य दिशा देईल. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन उत्तम राहू शकेल. भागीदारीच्या कामात फायदे मिळू शकतात.
वृश्चिक: परदेशी कंपन्यांशी संबंधित लोकांना फायदा होऊ शकतो. व्यवसायात नफा मिळू शकतो. मानसिक ताण कमी होऊ शकतो. नोकरीत बदली किंवा पदोन्नती योग जुळून येऊ शकतात. शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ वरदानापेक्षा कमी म्हणता येणार नाही. कौटुंबिक जीवन आनंदी राहील.
कुंभ: मंगळ गोचर फायदेशीर ठरू शकते. नशिबाची साथ मिळू शकते. उच्च शिक्षण, आध्यात्मिक विकास आणि लांब प्रवासासाठी हा काळ अनुकूल आहे. परदेशातील संपर्क किंवा प्रवासातून फायदा होऊ शकतो. बौद्धिक आणि आध्यात्मिक कार्यात प्रगती होईल. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची इच्छा पूर्ण होऊ शकते.
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.