२०२५ शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ राजयोग, बाप्पा ११ राशींना मागा ते देईल; हवे ते घडेल, शुभ होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:30 IST2025-12-06T13:05:31+5:302025-12-06T13:30:59+5:30

2025 Last Margashirsha Sankashti Chaturthi December: २०२५ मधील शेवटची मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी अनेकार्थाने विशेष मानली गेली आहे. ५ राजयोगांचा कोणत्या राशींवर कसा प्रभाव असेल? तुमची रास आहे का यात? जाणून घ्या...

Sankashti Chaturthi December 2025: गीतेमध्ये दहाव्या अध्यायात विभूतीयोग सांगताना भगवंतांनी ‘मासानां मार्गशीर्षोऽहम’ म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात मी असतो, असे म्हटले आहे. मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे. मार्गशीर्ष मास हा केशव मास म्हणूनही ओळखला जातो. कारण या महिन्याचे पालकत्व भगवान महाविष्णू यांच्याकडे असते. याच अत्यंत शुभ मानल्या गेलेल्या मार्गशीर्ष महिन्यातील संकष्ट चतुर्थी रविवार, ०७ डिसेंबर २०२५ रोजी आहे.

Margashirsha Sankashti Chaturthi 2025: सन २०२५ चा डिसेंबर महिना सुरू आहे. त्यामुळे मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी ही २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी ठरणार आहे. संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकतो. सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाची शाश्वत कृपा लाभावी, यासाठी हजारो भाविक संकष्ट चतुर्थीचे व्रत अगदी निष्ठेने, नित्य नियमाने करत असल्याचे पाहायला मिळते.

2025 Last Sankashti Chaturthi: २०२५ मधील शेवटच्या संकष्ट चतुर्थीला चतुर्ग्रही योग जुळून आलेला आहे. तसेच गजकेसरी, बुधादित्य, मंगल आदित्य, शुक्रादित्य, लक्ष्मी नारायण असे अद्भूत आणि अतिशय शुभ मानले गेलेले राजयोगही जुळून आलेले आहेत. ५ राजयोग जुळून आल्याने संकष्ट चतुर्थी अतिशय विशेष ठरली आहे. याचा ११ राशींना चांगला लाभ होऊ शकतो. गणपतीची कृपा लाभू शकते, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती, तुमची रास आहे का यात, जाणून घेऊया...

मेष: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी चांगली ठरू शकेल. हा काळ अनुकूल राहील. नशिबाची पूर्ण साथ मिळेल. धार्मिक तीर्थयात्रेच्या संधी उपलब्ध होतील. वडिलोपार्जित मालमत्तेबाबत सकारात्मकता येऊ शकेल. कामाच्या ठिकाणी पदोन्नतीची शक्यता आहे. करिअरला एक नवीन दिशा मिळू शकेल. संधीचे सोने करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. कौटुंबिक जीवन चांगले राहू शकेल.

वृषभ: दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवू शकाल. मानसिक आणि शारीरिक ताण-तणावातून दिलासा मिळू शकेल. दीर्घकाळापासून सुरू असलेले कौटुंबिक वाद संपू शकतात. करिअरमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरीमुळे प्रवास करावा लागू शकतो. भविष्यात महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. आत्मविश्वास वाढू शकतो. विचार इतरांना कळवण्यात अधिक यशस्वी व्हाल. जोडीदाराशी नाते चांगले राहील. प्रेम अधिक मजबूत होईल. आर्थिक परिस्थिती चांगली असेल.

मिथुन: मुलांकडून अनेक प्रकारे आनंद मिळू शकतो. चांगली बातमी मिळू शकते. भौतिक सुख-सोयी मिळू शकतात. कारकिर्दीत फायदा होऊ शकतो. नवीन नोकरीचा शोध यशस्वी होऊ शकतो. एखादी मोठी जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. चांगले पैसे कमवू शकता. शिक्षण क्षेत्रात नफा मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. पैसे वाचवण्यात यशस्वी व्हाल. जोडीदारासोबत खूप चांगला वेळ घालवू शकता.

कर्क: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी सकारात्मक ठरू शकेल. नोकरीत अनुकूल काम आणि प्रगती मिळण्याची शक्यता आहे. प्रेम जीवन पूर्वीपेक्षा खूपच चांगले असेल. महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. शैक्षणिक स्पर्धांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. कठोर परिश्रम, अखंड मेहनत केल्यानेच जीवनातील अनेक क्षेत्रांमध्ये पुढे जाऊ शकाल.

सिंह: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी चांगली ठरू शकेल. अनेक क्षेत्रात यश मिळवू शकतात. कुटुंबासोबत दर्जेदार वेळ घालवू शकतात. अनेक नवीन संधी मिळू शकतात. व्यवसाय महत्त्वपूर्ण फायदे होऊ शकतात. भरीव नफा होण्याची शक्यता असते. आर्थिकदृष्ट्या, पैसे कमविण्याच्या अनेक संधी आहेत. ध्येय साध्य करण्यात यशस्वी व्हाल. वैयक्तिक जीवनात घरी काही चांगली बातमी मिळू शकते.

तूळ: नवीन नोकरीची संधी प्राप्त होऊ शकेल. व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. प्रगती होऊ शकेल. एखादा जुना मित्र भेटू शकतो, जो कारकिर्दीला नवीन उंचीवर नेण्यास मदत करू शकेल. आत्मविश्वास वाढू शकतो. अचानक आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. पैसे गुंतवणे फायदेशीर ठरू शकते. विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी अत्यंत शुभ राहील. नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर अनुकूलता लाभू शकेल. सरकारी नोकरी किंवा सरकारी निधीच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.

वृश्चिक: दीर्घकाळापासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होऊ शकतात. भविष्याबद्दलच्या चिंता थोड्या कमी होऊ शकतात. दीर्घकाळापासून सुरू असलेली करिअरची आव्हाने आणि कामाचा ताण कमी होऊ शकतो. पदोन्नती शक्य आहे. आदर आणि सन्मानात वाढ होऊ शकते. अनेक क्षेत्रांमधून लक्षणीय नफा मिळवू शकता. शेअर बाजारात भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक परिस्थिती चांगली असेल. गुंतवणूक केल्याने लक्षणीय नफा मिळू शकतो. जोडीदारासोबतचे सततचे मतभेद संपुष्टात येऊ शकतात. नाते लक्षणीयरीत्या मजबूत होऊ शकते.

धनु: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी चांगली ठरू शकेल. प्रकृतीत सुधारणा होऊ शकेल उत्साह वाढेल. सर्व कामे जलद गतीने पूर्ण करण्यात यशस्वी होऊ शकाल. सामाजिक प्रभाव वाढू शकेल. लक्षणीय आर्थिक लाभ होऊ शकतील. मालमत्तेशी संबंधित व्यवसायात चांगला नफा मिळू शकेल. नवीन घर खरेदी करू शकता.

मकर: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी सकारात्मक ठरू शकेल. या काळात उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. सामाजिक दर्जा वाढेल. या काळात नवीन व्यवसाय सुरू करू शकता. वेळ अनुकूल आहे. मुलांशी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमधून चांगला फायदा होऊ शकतो.

कुंभ: नवीन नोकरीची ऑफर मिळू शकते. सध्या नोकरी करत असाल तर नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. ज्यांचे व्यवसाय शनि देवाशी संबंधित आहेत त्यांना लक्षणीय आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. व्यवसायात नफा मिळविण्याच्या अनेक शुभ संधी मिळू शकतात. नवीन मालमत्ता, घर खरेदी करण्यासाठी हा चांगला काळ आहे. मित्र आणि नातेवाईकांशी संबंध मजबूत होतील.

मीन: २०२५ मधील शेवटची संकष्ट चतुर्थी भाग्यकारक ठरू शकेल. नशिबाची भक्कम साथ लाभेल. अडकलेले सरकारी काम पूर्ण होऊ शकते. शिवाय कौटुंबिक जीवन आनंदी आणि समृद्ध राहील. व्यवसायासाठी प्रवास करावे लागू शकतात. फायदेशीर ठरू शकते. धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमाला उपस्थित राहू शकता. परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या इच्छा पूर्ण होऊ शकतात.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.