२ राजयोग, शिव योगात दत्त जयंती २०२५: ९ राशींवर गुरुकृपा, न भूतो असे लाभ; पद-पैसा-भरभराट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 12:38 IST2025-12-03T12:19:40+5:302025-12-03T12:38:09+5:30

Datta Jayanti 2025 Astrology: यंदा गुरुवारी असलेल्या दत्त जयंतीला अनेकविध शुभ योग जुळून आलेले आहेत. कोणत्या राशींवर कसा प्रभाव असू शकेल? जाणून घ्या...

Datta Jayanti 2025 Astrology: गुरुवार, ०४ डिसेंबर २०२५ रोजी दत्त जयंती आहे. मार्गशीर्ष महिन्याची ही पौर्णिमा २०२५ मधील शेवटची पौर्णिमा आहे. दत्त जयंती या दिवशी दत्ततत्त्व हे पृथ्वीतलावर नेहमीच्या तुलनेत १००० पटीने कार्यरत असते, असे म्हटले जाते. त्यामुळे दत्त उपासना, नामस्मरण करणे शुभ पुण्य फलदायक मानले जाते.

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्त जन्म झाला, म्हणून त्या दिवशी दत्त जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांत साजरा होत असतो. दत्त जयंतीच्या दिवशी अनेकविध योग जुळून येत आहे. गुरु ग्रह या दिवशी उच्च रास कर्क राशीत वक्री चलनाने विराजमान आहे. दत्त जयंतीच्या दिवशी २ राजयोग आणि शिवयोग जुळून येत असल्याचे म्हटले जात आहे.

दत्त जयंतीला असणाऱ्या ग्रहमानाचा विचार केल्यास अनेक राशींवर गुरूकृपा, लक्ष्मी कृपा होऊ शकते. दत्तगुरूंचे शुभाशिर्वाद प्राप्त होऊ शकातात. कुटुंब, व्यवसाय, नोकरी, शिक्षण, व्यापार, करिअर, आर्थिक आघाडीवर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

मेष: थोडा संयम बाळगण्याची गरज आहे. अडचणी दूर होण्यास वेळ लागणार नाही. अनुकूलता अनुभवायला मिळेल. विवाहेच्छूसाठी अनुकूल काळ आहे. त्या दृष्टीने हालचाली वेग घेतील. मनात आनंदी विचार राहतील. कामाचा ताण आटोक्यात आल्यामुळे स्वत:कडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळेल. बोलण्याचा प्रभाव पडेल. वडिलोपार्जित संपत्तीची कामे होतील.

वृषभ: उत्तरार्थ चांगला जाईल. सुरुवातीला आर्थिक प्राप्ती झाली तरी हाती आलेला पैसा खर्चही होईल. देवाण-घेवाण जपून करा. कायद्याची बंधने पाळा. कुणाची हमी घेऊ नका. कामावर लक्ष ठेवा. गुरुवारपासून अडचणी दूर होतील. मनावरील दडपण निघून जाईल. प्रेमात असणाऱ्यांनी सावधपणे वागण्याची गरज आहे. थोडे क्रोधावर नियंत्रण ठेवा. शनिवारी विविध प्रकारचे लाभ होतील.

मिथुन: ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. नोकरीत कामाचा ताण असला तरी सबुरीने वागल्यास कष्टाचे योग्य ते फळ मिळेल. नोकरीत काही बदल होऊ शकतात. काहींना बदलीला सामोरे जावे लागेल. घरी पाहुणे मंडळी येतील. धनलाभ होण्याच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एखादे मोठे काम यशस्वीपणे पूर्ण कराल. गुरुवार, शुक्रवार अचानक खर्च होईल. कुणाला जामीन राहू नका. प्रवासात सतर्क राहा. शनिवारी अडचणी दूर होतील.

कर्क: लोकांचे सहकार्य मिळेल. मनातील योजना प्रत्यक्षात उतरतील. सतत यश मिळेल. मौजमजा, पर्यटन, सामाजिक मान-सन्मान, भेटीगाठी या दृष्टीने शुभ फळे मिळतील. नोकरीत प्रगतीला पूरक वातावरण राहील. शब्दाला मान दिला जाईल. अडलेली कामे मार्गी लागतील. लोकांचे सर्वतोपरी सहकार्य मिळेल. एखाद्या उलाढालीत मोठा फायदा होईल. भेटवस्तू मिळतील. घरात आनंदी वातावरण राहील. शनिवारी वाहन जपून चालवा.

सिंह: मनात उत्साह राहील. अनुकूलता राहील. आराम आणि कामांचे नियोजन यावर भर दिला पाहिजे. वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा. इतरांना सल्ला देण्याच्या भानगडीत पडू नका. प्रश्न सुटण्यास सुरुवात होईल. मौजमजा करण्यासाठी वेळ मिळेल. मान-सन्मान मिळेल. कार्यक्षेत्रात अनुकूल बदल होतील. मुलांची प्रगती होईल. धनलक्ष्मीची प्रसन्नता राहील.

कन्या: उच्च पद मिळेल. वेगवान घटनाक्रमाचे साक्षीदार राहाल. व्यवसायात भरभराट होईल. हाती पैसा खेळता राहील. व्यावसायिक अंदाज बरोबर ठरतील. प्रेमात असणाऱ्यांनी थोडे सावध राहावे. घाईघाईत कामे उरकण्याचा प्रयत्न करू नका. गुरुवारपासून अडचणी सुटतील. मनात आनंदी विचार राहतील. सामाजिक मान-सन्मान मिळेल. पर्यटनाच्या माध्यमातून फिरणे होईल. नोकरीत अनुकूल वातावरण राहील.

तूळ: प्रसिद्धी, मान-सन्मान मिळेल. संमिश्र ग्रहमानाचा अनुभव येईल. योजना गुप्त ठेवा. काही लोक बरोबर राहून विरोधात गुप्तपणे कारवाया करतील. त्या दृष्टीने सावध राहा. जीवनसाथी मर्जीनुसार वागेल. व्यवसायात नवीन प्रयोग करून पाहिले जातील. त्यात यशही मिळेल. गुरुवार, शुक्रवार घाईघाईत कामे करू नका, वाहन हळू चालवा. शनिवारी अनुकूल वातावरण राहील. सामाजिक कार्यात तुमच्यावर मोठी जबाबदारी राहील.

वृश्चिक: उत्तरार्धात यश मिळेल. व्यवसाय, प्रेम, आर्थिक प्राप्ती, मोठ्या व्यक्तींचे मार्गदर्शन व समर्थन इत्यादी बाबतीत अनुकूल परिस्थिती राहील. काही अडचणी असतील. सबुरीचे धोरण ठेवा. योजनांच्या बाबतीत गुप्तता पाळण्यातच हित राहील, हे विसरू नका. गुरुवार, शुक्रवार चांगले अनुभव येतील. जीवनसाथीशी सूर जुळतील. मात्र, किरकोळ मतभेद होऊ शकतात. शनिवारी वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.

धनु: मुलांची प्रगती होईल. ग्रहमानाची अनुकूलता बाजूने राहील. महत्त्वाची कामे आटोपून घ्या. नोकरीत एखादी नवीन जबाबदारी अंगावर पडेल. कामाचा ताण मुत्सद्दीपणाने हाताळा. घरात प्रारंभी थोडे गैरसमजाचे वातावरण राहील. आरोग्याची काळजी घ्यावी. त्या दृष्टीने गुरुवार, शुक्रवार थोडे सतर्क राहा. उपक्रमात काही झारीतले शुक्राचार्य छुप्या पद्धतीने नडतील. शनिवारी अडचणी दूर झालेल्या असतील.

मकर: लाभ होतील. प्रगतीसाठी अनुकूल वातावरण राहील. चंद्राचे भ्रमण लाभदायक ठरेल. मात्र शनिवारी चंद्र व वक्री गुरुचा तेथील प्रवेश थोडे सावधगिरीने वागण्याचे सुचवतो. सुरुवातीला व्यवसायात सतत व्यस्तता राहील. हाती पैसा येईल; पण गुंतवणूक जपून करा. भावंडांशी गैरसमज होतील. नोकरीत अनुकूल बदल होतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. जीवनसाथीशी मधुर संबंध राहतील.

कुंभ: उत्साह वाढवणाऱ्या घटना घडतील. ध्येय प्राप्त करण्यासाठी केलेले प्रयत्न सफल ठरतील. सतत व्यस्त राहाल. यश मिळत गेल्याने कामाचे काही वाटणार नाही. व्यवसायात अनुकूल परिस्थिती राहील. जवळच्या प्रवासाचा योग येईल. मालमत्तेच्या व्यवहारात विचारपूर्वक निर्णय घ्यावे. वडीलधाऱ्या मंडळींचा मान राखा. त्यांच्याशी चर्चा करा. नोकरीत अचानक परिवर्तन होऊ शकते. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना सफलता मिळेल. एखादी चांगली बातमी कळेल.

मीन: यशोशिखर गाठाल. दमदारपणे वाटचाल सुरू राहील. हळूहळू करीत यशाच्या शिखरापर्यंत संयमाने जाऊन पोहोचाल. धनलक्ष्मीची कृपा राहील. आवडत्या भोजनाचा आस्वाद घेता येईल. समाजात मान वाढेल. भावंडांच्या भेटीगाठी होतील. मात्र, नाते आणि व्यवहार यांची गल्लत करू नका. व्यवसायात भरभराट होईल. मात्र, मोठी गुंतवणूक करताना भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.