१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:25 IST2025-08-12T16:09:19+5:302025-08-12T16:25:40+5:30

Shani Mahadasha Effect And Impact: शनि साडेसाती साडेसात वर्ष असते. तर महादशा तब्बल १९ वर्षे चालते. कसा असतो शनिचा प्रभाव? जाणून घ्या...

Shani Mahadasha Effect And Impact: नवग्रहातील अत्याधिक आणि विशेष महत्त्वाचा मानला गेलेला ग्रह म्हणजे शनि. पुराणात शनिबाबत अनेक मान्यता, कथा प्रचलित आहेत. नवग्रहांमध्ये शनि ग्रह हा सर्वांत कमी वेगाने गोचर करणारा ग्रह आहे. शनिची साडेसाती ही सर्वाधिक प्रभावी मानली जाते. साडेसात वर्षांचा काळ अनेकार्थाने महत्त्वाचा मानला जातो. परंतु, शनिची महादशा तब्बल १९ वर्षे सुरू असते, असे सांगितले जाते.

शनि महादशा सुरू असतानाही सर्व ग्रहांच्या अंतर्दशाही त्याच वेळी सुरू असतात. नवग्रहांशी संबंधित १२० वर्षांच्या महादशा सांगितल्या आहेत. यामध्ये नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या रवि/सूर्याची ६ वर्षे, चंद्र ग्रहाची १० वर्षे, नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळाची ७ वर्षे, नवग्रहांचा राजकुमार मानल्या गेलेल्या बुध ग्रहाची १७ वर्षे, नवग्रहांचा गुरू मानला गेलेला बृहस्पती म्हणजेच गुरू ग्रहाची १६ वर्षे, शुक्र ग्रहाची २० वर्षे, शनि ग्रहाची १९ वर्षे, राहुची १८ वर्षे आणि केतुची ७ वर्षे यांचा समावेश आहे.

शनि हा मकर आणि कुंभ राशीचा स्वामी आहेत. तूळ ही शनिची उच्च रास आहे, तर मेष ही त्याची नीच रास मानली जाते. पुष्य, अनुराधा व उत्तराभाद्रपदा या तीन नक्षत्रांचे स्वामित्व शनिकडे आहे. अंकशास्त्राप्रमाणे ८ या मूलांकाचे स्वामित्व शनिकडे आहे. शनि महादशा १९ वर्षे असते. तसेच, शनिचीच अंतर्दशा यामध्ये येते. या काळात शनि चांगले आणि वाईट दोन्ही फळे देतात, असे मानले जाते.

एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत शनि नकारात्मक स्थितीत किंवा अशुभ किंवा शत्रू ग्रहांची दृष्टी असेल, तर त्या व्यक्तीला अनेक अडचणी, समस्यांचा सामना दीर्घकाळ करावा लागतो, पैशांचा अभाव जाणवतो. अनेक वेळा आरोग्याशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागते. दुसरीकडे, जर शनि कुंडलीत शुभ स्थितीत असतील तर तो व्यक्तीला प्रचंड संपत्ती प्रदान करतो, अशी मान्यता आहे.

कर्मकारक शनि महादशा परिणाम व्यक्तीवर १९ वर्षे असतो. शनि महाराज कोणत्या प्रकारचे फळ देतील, हे व्यक्तीच्या कुंडलीत शनि कोणत्या स्थानी आणि स्थितीत आहे, यावर अवलंबून असते. कुंडलीत शनि नकारात्मक किंवा नीच राशीत असेल तर शनि अशा परिस्थितीत व्यक्तीला मानसिक आणि आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते, असे म्हणतात.

अशा व्यक्तीला त्या व्यक्तीवर खोटे आरोप होऊ शकतात. शिक्षा होऊ शकतो. व्यवसायात नुकसान होऊ शकते. तसेच, जर शनि राहुशी युतीत असेल, तर व्यक्तीला अचानक नुकसान होऊ शकते. जर शनि आणि चंद्र एकत्र असतील तर विषयोग तयार होतो, ज्यामुळे व्यक्ती मानसिक आजारांना बळी पडू शकते, असे मानतात.

जर एखाद्या व्यक्तीच्या जन्मकुंडलीत शनि शुभ स्थानी किंवा उच्च राशीत असेल, तर शनि महादशेत व्यक्तीची आर्थिक स्थिती चांगली असते. अशी व्यक्ती धनवान बनते आणि संपत्ती मिळते. या व्यक्तीला मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळते.

जर व्यक्ती व्यापारी असेल तर ती व्यक्ती मोठी व्यापारी असते. कठोर परिश्रमासोबतच त्याला नशिबाचीही साथ मिळते. व्यवसाय चांगला चालतो. राजकारणाच्या क्षेत्रात यश मिळते. त्याच वेळी, या व्यक्ती शनि महादशेत खूप मेहनत करते. भरभराट भाग्योदय होऊ शकतो.

शनि हा माणसाचे मन स्वच्छ व शुद्ध करणारा, मनातील घाण व कुविचार टाकून उच्चप्रतिला नेणारा हा एकच ग्रह आहे. शिस्तीचा पाईक आहे. जीवनाचे मर्म जाणणारा व कटू सत्य उगड करून सांगणारा आहे. जे याची अवज्ञा करतात त्यांना तो खाली ओढतो व माणसाच्या अहंकाराचा नाश करतो.

जे शिस्तबद्ध, विनयशील, नम्र आहेत, त्यांना उच्च शिखरावर नेऊन बसवतो, अशी शनीची ख्याती सांगितली जाते. शनि हा गुरु ग्रहाला अध्यात्मिक गुरु मानतो. आताच्या घडीला शनि मीन राशीत आहे. मीन राशीचा स्वामी शनि आहे.

तसेच मीन राशीत शनि जून २०२७ पर्यंत असणार आहे. शनि मीन राशीत विराजमान असल्यामुळे कुंभ, मीन आणि मेष राशीची साडेसाती सुरू आहे. कुंभ राशीचा साडेसातीचा शेवटचा टप्पा, मीन राशीचा साडेसातीचा दुसरा/मधला टप्पा आणि मेष राशीचा साडेसातीचा पहिला टप्पा सुरू आहे.

- सदर दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.